Damage Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023: राज्यात पडझड सुरूच, वीज खात्याचेही मोठे नुकसान

65 दुर्घटनांची नोंद : चार धरणे फुल्ल : नद्यांना पूर

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Monsoon 2023 गेल्या सहा दिवसांपासून राज्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पडझडीचे सत्र सुरू असून अनेकांना त्याची झळ सोसावी लागली. खासकरून वीज खात्याचे मोठे नुकसान झाले. राज्यात रविवारी अग्निशमन आणि आपत्ती नियंत्रण कक्षाला एकूण ६७ कॉल्स आले.

त्यापैकी ६५ कॉल्स पडझडीशी संबंधित होते. एका दुर्घटनेत एकाला वाचवण्यात जवानांना यश आले. अन्य दोन गंभीर घटनांमध्येही दलाने मदतकार्य केले.

Damage

काही नद्यांना पूर आल्याने लगतच्या गावांचा संपर्क तुटला. घाटमाथ्यावर पाऊस जोरात सुरू असल्याने गगनबावडा आणि आंबोली घाटात दरडी कोसळल्या. त्यामुळे या दोन्ही मार्गांवरील वाहतूक खोळंबली होती.

या दोन घाटांमधून राज्यासाठी भाजीपाला, कडधान्य आणि पर्यटकांची वाहतूक होते. गगनबावडा रस्‍त्‍यावर दरड कोसळल्यामुळे गोव्यात येणारे दूध उशिरा पोहोचले. राज्यातील साळावली, गावणे, पंचवाडी यापाठोपाठ आमठाणे धरणही आज भरले.

मुसळधार पावसामुळे रविवारी अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचले होते. डिचोली, पेडणे आणि सत्तरी तालुक्यातील नद्यांना पूर आल्याने बंधारे पाण्याखाली गेले. बऱ्याच ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून गोवा वेधशाळेने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.

म्हापशात काही काळ वाहतूक झाली ठप्प

धुळेर-म्हापसा रोडवर कृषी विभागाच्या शेतजमिनीतील भले मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. आनंदी अपार्टमेंटजवळ ही घटना घडली असून, यामध्ये विजेच्या तारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. याची माहिती मिळताच वीज विभागाचे अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावरून झाड हटवण्याचे आणि वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने जीवितहानी टळली.

गोवा-बेळगाव महामार्गावरील पूल खचला

पावसाची संततधार सुरू असल्याने गोवा-बेळगाव महामार्गावर पुलाचा भाग खचल्याची घटना घडली. त्यामुळे हा महामार्ग वाहतुकीस बंद केला आहे. मात्र, पर्यायी मार्गाची व्यवस्था केल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. शनिवारी सायंकाळी बेळगाव ते गोव्यादरम्यानच्या चोर्ला घाटात कंटेनर व प्रवासी बस यांच्यात अपघात झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती.

२८ पर्यंत ऑरेंज अलर्ट; पुराचा धोका कायम

गेल्या २४ तासांत ८८.०४ मिमी. पाऊस पडला, तर राज्यातील आतापर्यंतचा एकूण पाऊस २०९८.०५ मिमी. नोंदवला गेला आहे. हवामान खात्याने राज्यात २८ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GCA: जीसीएच्या कर्मचाऱ्यांचा बोलका जल्लोष; क्रिकेट क्लबांनी शिकवलेले शहाणपण

Mhadei River: ‘म्हादई’ केवळ पाण्याचा स्रोत नव्हे, सांस्कृतिक वारसा! नदीच्या पैलूंचे सखोल दर्शन घडवणारे पुस्तक प्रकाशित

Omkar Elephant: 'ओंकार हत्ती' गोव्याच्या महामार्गावर! वाहतूक ठप्प; तोर्सेत पाडला बांबूचा फडशा

Mapusa Roads: नेहमीचीच रड! कोट्यवधी खर्चून डांबरीकरण केले, ते पावसात गेले वाहून; चतुर्थी उलटून गेली तरी म्हापशातील रस्ते 'जैसे थे'

PM Modi Birthday: "हॅपी बर्थडे, फ्रेंड", पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला ट्रम्पचा फोन

SCROLL FOR NEXT