Goa Mankurad Mango Dainik Gomantak
गोवा

Goa Mankurad Mango: 5 हजारांवरून दर थेट 800 रुपयांवर, स्वस्त झाला 'मानकुराद'! येत्या आठवड्यात दर अजून कोसळण्याची शक्यता

Mankurad mango price per dozen Goa: सध्या बाजारात मानकुराद, हापूस, सेंदुरी, मांगीलाल, बदामी आदी आंब्यांची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: सध्या बाजारात मानकुराद, हापूस, सेंदुरी, मांगीलाल, बदामी आदी आंब्यांची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. बाजारात मानकुराद आंब्याचा सुगंध दरवळू लागल्याने खरेदीदारांची गर्दी वाढली असून, गेल्या दोन आठवड्यांच्या तुलनेत दरात लक्षणीय घट झाली आहे.

मध्यम आकाराचे मानकुराद आंबे सध्या सुमारे ८०० रुपये डझन दराने विकले जात आहेत, तर हापूस आंब्याचे दर ६०० ते ७०० रुपये डझन दरम्यान आहेत. आवक वाढल्याने मध्यमवर्गीयांसह आंबा रसिकांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे.

विक्रेत्यांच्या मते, येत्या आठवड्यात बाजारात आणखी मोठ्या प्रमाणात आंब्यांची आवक होण्याची शक्यता असून, दरात आणखी काही प्रमाणात घट होऊ शकते. हंगामाच्या सुरुवातीला मानकुराद आंबा तब्बल ५ हजार रुपये डझन दराने विकला जात होता.

त्यानंतर ४ हजार, २,५००, १,२०० आणि आता ८०० रुपये डझनपर्यंत दर खाली आले आहेत. आंब्यासोबतच फणसाचे गरे, जांभळे, करवंद आदी रानमेव्यालाही चांगली मागणी आहे. फणसाचे गरे सुमारे १०० रुपये वाटा, तर करवंदे ५० रुपये दराने विकली जात आहेत.

घोटं (रायवळ) १५० रुपये

बाजारात विविध प्रकारच्या आंब्यांसोबत ‘घोटं’ (रायवळ) आंब्यांचीही मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. हे आंबे प्रामुख्याने रायते व पेये तयार करण्यासाठी खरेदी केले जात आहेत.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कलिंगड, संत्री, मोसंबी यांसारख्या गारवा देणाऱ्या फळांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT