Goa Water Crisis: ...तर सत्तरीवर पाण्याचे संकट, अंजुणेत 29 टक्‍के पाणी; इतर धरणांत 2 महिने पुरेल इतका साठा

Anjunem Dam water level April 2026: अंजुणे धरणातील पाण्‍याचा साठा कमी झाल्‍याने यंदाच्‍या उन्‍हाळ्यातही सत्तरीवासीयांना पाण्‍यासाठी वणवण करावी लागण्‍याची शक्‍यता आहे.
Goa Water Crisis
Goa Water Crisis्ोगलगक ुदसोलूोक
Published on
Updated on

पणजी: अंजुणे धरणातील पाण्‍याचा साठा कमी झाल्‍याने यंदाच्‍या उन्‍हाळ्यातही सत्तरीवासीयांना पाण्‍यासाठी वणवण करावी लागण्‍याची शक्‍यता आहे. मे महिन्‍याच्‍या मध्‍यापर्यंत पावसास सुरुवात न झाल्‍यास सत्तरीत पाणीबाणी निर्माण होऊ शकते, अशी माहिती जलस्रोत खात्‍याच्‍या सूत्रांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

साळावली, तिलारी, अंजुणे, चापोली, आमठाणे, पंचवाडी आणि गावणे या सात धरणांमधून गोमंतकीय जनतेला पाण्‍याचा पुरवठा केला जातो. त्‍यातील अंजुणे वगळता इतर सर्व धरणांमध्‍ये पुढील दोन ते अडीच महिने पुरेल इतका पाणी साठा आहे. राज्‍यात साधारण जूनच्‍या पहिल्‍या आठवड्यापासून मान्‍सूनच्‍या पावसास सुरुवात होते. त्‍यामुळे या सहा धरणांमधून ज्‍या तालुक्‍यांना पाण्‍याचा पुरवठा केला जातो, तेथील जनतेला पाण्‍यासाठी संघर्ष करावा लागणार नाही.

Goa Water Crisis
Goa Crime: बंद घरात माय-लेकीचा मृतदेह; केपेत खळबळ, तीन दिवसांनी प्रकार उघड

परंतु, अंजुणे धरणात सद्यस्‍थितीत २९ टक्‍के पाणी साठा असून, तो पुढील काहीच दिवस जाण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे मे महिन्‍यात सत्तरीतील जनतेसमोर पाण्‍याचे संकट उभारण्‍याची शक्‍यता असल्‍याचे सूत्रांनी सांगितले. अंजुणे धरणाव्‍यतिरिक्त सत्तरीतील जनतेला उन्‍हाळ्याच्‍या दिवसांत पाणी पुरवण्‍याची पर्यायी व्‍यवस्‍था सरकारने केलेली नाही. त्‍यामुळे दरवर्षीच्‍या उन्‍हाळ्यात तेथील जनतेला पाण्‍यासाठी वणवण करावी लागते. तशीच परिस्‍थिती यंदाही निर्माण होऊ शकते, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

दरम्यान, सध्या राज्यात प्रचंड उष्मा जाणवत आहे. वाढत्या तापमानामुळे धरणांतील पाणीसाठ्यावरही परिणाम होत आहे. दोन महिने तापमान असेच उच्च राहिल्यास पाण्याचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महाराष्‍ट्राच्‍या सहकार्यामुळे बार्देशला आधार

तिलारी धरणातून गोव्‍याला पाणी पुरवठा करणारा कालवा खराब झालेला असल्‍याने या कालव्‍याच्‍या दुरुस्‍तीसाठी तो या महिन्‍यात बंद करण्‍याचा निर्णय तिलारी धरणाच्‍या व्‍यवस्‍थापनाने घेतला होता. तशी माहितीही त्‍यांनी गोव्‍याच्‍या जलस्रोत खात्‍याला दिलेली होती. परंतु, तसे झाल्‍यास त्‍याचा बार्देश आणि आसपासच्‍या तालुक्‍यातील जनतेला फटका बसू शकतो.

त्‍यामुळे या कालव्‍याचे काम ऑक्‍टोबरमध्‍ये करण्‍यात यावे, अशी विनंती जलस्रोत खात्‍याने तिलारी प्रशासनाकडे केली. गोव्‍याच्‍या या विनंतीनंतर तिलारी प्रशासनाने आपला निर्णय मागे घेतल्‍याने बार्देशमधील जनतेला समाधान मिळाले आहे.

Goa Water Crisis
Goa Municipal Elections: पालिका निवडणुका ऑक्टोबरमध्ये? कायद्यात दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मंजुरी; वटहुकूम लवकरच जारी होणार

धरणांतील पाणी

साठा (टक्‍क्‍यांत)

साळावली : ४७

तिलारी : ४५

अंजुणे : २९

चापोली : ५३

आमठाणे : ४३

पंचवाडी : ४०

गावणे : ५१

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com