Goa Mango Price Dainik Gomantak
गोवा

Goa Mango Price: अवकाळी पावसामुळे 'मानकुराद'च्या दरात घसरण, आंबा बागायतदार संकटात

Goa Mankurad Mango Price: राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका स्थानिक शेती व बागायतींना बसला आहे.

Sameer Amunekar

पणजी: राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका स्थानिक शेती व बागायतींना बसला आहे. अवकाळी पावसामुळे झाडांवर असलेले आंबे वेळेपूर्वी गळू लागले, त्यामुळं बाजारात मोठ्या प्रमाणावर आंब्याची आवक झाली आहे.

दरात मोठी घसरण

पणजी बाजारात मानकुराद व हापूस आंब्याचे दर उतरले आहेत. गेल्या आठवड्यात ५,५०० रुपये डझनपर्यंत पोहोचलेला मानकुराद आंब्याची आता फक्त १,५०० ते २,००० रुपये डझन दराने विक्री होत आहे. मात्र, या आंब्यांचे आकारमान लहान ते मध्यम असून मोठ्या आकाराच्या दर्जेदार मानकुरादसाठी अद्याप मागणी कायम आहे.

दुसरीकडे, हापूस आंब्याच्या किमतीतही घट झाली असून, लहान हापूस आंबे ८०० रुपये डझन, तर मध्यम आकाराचे आंबे १,३०० रुपये डझन दराने विकले जात आहेत.

शेतकऱ्यांचे नुकसान

अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादकांना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. गोव्यात मार्च ते मे या कालावधीत आंब्याची मोठ्या प्रमाणावर लागवड आणि उत्पादन होतं. मात्र, हवामान बदलामुळं अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ज्याचा थेट परिणाम काजू, आंबा पिकांवर होऊ शकतो.

पावसाचा ईशारा

भारतीय हवामान विभागानं (IMD) गोव्यासाठी ३ एप्रिल पर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत काही भागात हलक्या ते मध्यम शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पावसामुळं नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, शेतकरी आणि बागायतदारांना याचा फटका सहन करावा लागत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT