Mandre Illegal Construcation Dainik Gomantak
गोवा

Goa Illegal Construcation: अखेर मांद्रेतील 'त्या' बांधकामाला 'कारणे दाखवा' नोटीस

Goa Illegal Construcation: मांद्रे येथील श्री आजोबा देवस्थान जवळच्या बेकायदेशीर बांधकामाला मांद्रे पंचायतीने नोटीस जारी केली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Illegal Construcation: आश्वे मांद्रे येथील श्री आजोबा देवस्थान जवळच्या बेकायदा पर्यटन कुटिरे बांधकाम पाडण्यासंबंधी अखेर मांद्रे पंचायतीने ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी केली. पंचायत मंडळाची विशेष बैठक सरपंच अमित सावंत यांच्या अध्यक्षतेखाली होऊन या कुटिरांची बांधकामे पाडण्यात यावीत, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. आणि तशी नोटीस पंचायतीने बांधकामस्थळी संबंधिताला दिली. सात दिवसात संबंधिताने उत्तर न दिल्यास पुढील कारवाई केली जाईल, असे नोटिशीत म्हटले आहे.

मांद्रे पंचायत क्षेत्रातील आश्वे येथील पुरातन असलेले श्री आजोबा मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे त्यात जलतरण तलाव यांचाही समावेश आहे. ‘सीझेडएमए’ किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाकडून हंगामी कुटीरे उभारण्यासाठी संबंधिताने परवाने घेतले होते.

परंतु त्या परवान्यांचा गैरवापर करून कुटिरे उभारलेली आहेत. त्यामध्ये काँक्रीट लोखंड आणि इतर साहित्याचा वापर करून सीआरझेड कायद्याचा भंग केल्याचा दावा पंचायतीने यापूर्वीच केला होता. बांधकामांची पाहणी करून ही बांधकामे का हटवू नयेत, अशी विचारणाही ‘कारणे दाखवा’ नोटिशीद्वारे केली आहे.

अमित सावंत, सरपंच मांद्रे-

अवैध बांधकामाविषयी पंचायतीने सीआरझेड विभाग उत्तर गोवा जिल्हाधिकारी, पेडणे उपजिल्हाधिकारी यांना अहवाल दिलेला आहे. आणि त्यानुसारच आता संबंधित व्यावसायिकाला अतिरिक्त बांधकामे मोडून टाकण्यासाठी त्यांना नोटीस पाठवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT