Fire Case Dainik Gomantak
गोवा

Goa Fire Case: नावेली- मांडपा येथील झोपडीवजा घर आगीच्या भक्ष्यस्थानी

Goa Fire Case: घरातील सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याचे सांगण्यात येतेय.

Ganeshprasad Gogate

Goa Fire Case: आज दुपारी नावेली- मांडपा येथे एका परप्रांतीय कामगाराच्या झोपडी वजा घराला भीषण आग लागल्याची घटना घडली असून या लागलेल्या आगीत एकजण किरकोळरित्या भाजलेला असल्याचे वृत्त हाती आले आहे.

या घरातील सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याचे सांगण्यात येतेय. सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत त्यांनी तात्काळ आग विझवली. सदर कुटुंबीय परप्रांतीय असून 3 ते 4 जण येथे राहत असल्याचे समजतेय.

या घराला माडांच्या झावळ्यांचे छप्पर असल्याने आगीत हे पूर्ण घर जळून खाक झाले. आगीची भीषणता एवढी होती की, या झोपडी वजा घरातील सर्व सामान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. झालेल्या नुकसानीचा आकडा समजू शकला नाहीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT