₹22 lakh fraud across India through ice cream franchise scam Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: ‘नॅचरल आईसक्रिमची फ्रँचायझी देतो’, म्हणत गोव्यातील व्यक्तीला 4.24 लाखांचा गंडा; देशभरात 22 लाख लुबाडले

Goa Crime News: नोंदणीच्या नावाखाली संशयिताने संबधित व्यक्तीकडून चाल लाख २४ हजार ९०० रुपये घेतले. यानंतर व्यक्तीला बनावट नोंदणी कागदपत्रे पाठवली.

Pramod Yadav

पणजी: नॅचरल आईसक्रिमची फ्रँचायझी देतो, म्हणत गोव्यातील व्यक्तीला ४.२४ लाख रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी बिहारमधून १९ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. कोलवाळ पोलिसांनी बिहारमध्ये जाऊन ही कारवाई केली. देशभरात या पठ्याने सुमारे २२ लाख रुपयांचा विविध लोकांना गंडा घातला आहे.

अलोक जयप्रकाश कुमार (१९, रा. पाटणा, बिहार) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.  बिहार येथील न्यायालकाडून ट्रान्झीट रिमांडवर त्याला गोव्यात आणून, डिचोली न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला पाठविण्यात आलेल्या एकूण रक्कमेपैकी दोन लाख रुपये पोलिसांच्या विनंतीनंतर बँकेने फ्रीज केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने मे ते ०९ जून २०२५ या काळात गोव्यातील व्यक्तीला संपर्क साधून, नॅचरल आईसक्रिमची फ्रँचायझी देण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनाला बळी पडून व्यक्तीने संशयिताने मागितलेली सर्व माहिती दिली. नोंदणीच्या नावाखाली संशयिताने संबधित व्यक्तीकडून चाल लाख २४ हजार ९०० रुपये घेतले. यानंतर व्यक्तीला बनावट नोंदणी कागदपत्रे पाठवली.

यानंतर फ्रँचायझी देण्यास असमर्थ ठरलेल्या संशयिताविरोधात गोमंतकीय व्यक्तीने थिवी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. गोवा पोलिसांनी पथक तयार करुन बिहारमध्ये संशयिताचा शोध घेऊन, संशयित अलोक कुमारला अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू; VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

SCROLL FOR NEXT