Goa Majhi Bus Scheme Dainik Gomantak
गोवा

Goa Majhi Bus Scheme: खासगी बस मालकांसाठी आनंदवार्ता! 'माझी बस योजने'तून मिळणार अनुदान, विमा आणि आर्थिक सहाय्य

Majhi Bus Scheme: राज्यात सार्वजनिक वाहतूक प्रणालीला चालना देण्यासाठी ‘माझी बस योजना २०२५’ लागू करण्यात आली आहे. नियमांची पूर्तता करणारे सर्व खासगी बस मालक त्‍याचा लाभ घेऊ शकतील.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : राज्यात सार्वजनिक वाहतूक प्रणालीला चालना देण्यासाठी ‘माझी बस योजना २०२५’ लागू करण्यात आली आहे. नियमांची पूर्तता करणारे सर्व खासगी बस मालक त्‍याचा लाभ घेऊ शकतील, अशी माहिती कदंबचे अध्‍यक्ष उल्‍हास तुयेकर यांनी दिली.

नव्‍या योजनेनुसार प्रत्येक किलोमीटरसाठी ३ रुपये अनुदान बस ऑपरेटरला दिले जाणार आहे. तसेच विमा अनुदान म्हणून वार्षिक विमा हप्त्याच्या ५० टक्‍क्‍यांपर्यंत (कमाल ३०,०००) अनुदान दिले जाईल. बस पुनर्बदल सहाय्य योजनामार्फत १५ वर्षांपेक्षा जुन्या बस बदलण्यासाठी १० लाख रुपयांपर्यंत साहाय्य करण्‍यात येईल.

ही योजना गोवा परिवहन संचालनालय आणि कदंबा परिवहन महामंडळ यांच्यामार्फत अंमलात आणली जाणार आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्यांना बसेस ‘कदंब’च्याच रंगात रंगवाव्‍या लागतील.

ही योजना गोवा परिवहन संचालनालय आणि कदंबा परिवहन महामंडळ यांच्या मार्फत अंमलात आणली जाणार आहे. योजनेचा उद्देश खासगी स्टेज कॅरेज बस ऑपरेटर्सना आर्थिक व पायाभूत सहाय्य देणे असून, प्रवाशांना अधिक सुरक्षित, परवडणारी आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देणे, हा असल्याचे अधिसूचनेत नमूद केले आहे.

योजनेसंदर्भात आज अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार अर्जदाराचे वैध स्टेज कॅरेज परवाने गोव्यातील सक्षम प्राधिकरणाकडून मिळालेले असावेत, बस नोंदणीपासून १५ वर्षांपेक्षा जुनी नसावी.

‘केटीसीएल’ पास आणि कार्ड वापर

योजनेतील सर्व बसमध्ये ‘केटीसीएलचे स्मार्ट ट्रान्झिट पास आणि कार्ड वैध राहतील. या माध्यमातून गोळा झालेली रक्कम केटीसीएलमार्फत ऑपरेटरला परत दिली जाईल. तसेच बसवर लावलेल्या जाहिरातींमधून मिळणाऱ्या महसुलांपैकी ५० टक्के रक्कम बस ऑपरेटरला, तर उर्वरित ५० टक्के ‘केटीसीएल’कडे प्रशासकीय खर्चासाठी राहील.

अटींची पूर्तता करणाऱ्या सर्व खासगी बसेसना सवलत संधी

या योजनेंतर्गत प्रत्येक किलोमीटरसाठी ३ रुपये अनुदान बस ऑपरेटरला दिले जाणार आहेत. तसेच विमा अनुदान म्हणून वार्षिक विमा हप्त्याच्या ५० टक्के पर्यंत (कमाल ३०,०००) अनुदान दिले जाईल.

बस पुनर्बदल सहाय्य योजनामार्फत १५ वर्षांपेक्षा जुन्या बस बदलण्यासाठी १० लाख रुपयांपर्यंत सहाय्य योजनेंतर्गत केले जाणार आहे.

नवीन बसमध्ये किमान २७ प्रवासी क्षमतेची आसने असावीत, अशी एकमेव अट यामध्ये समाविष्ट आहे.

सर्वांत महत्वाचे म्हणजे प्रवाशांकडून गोळा केलेले पूर्ण भाडे ऑपरेटरकडेच राहील; कदंबा महामंडळाकडे कोणतेही भाडे जमा करावे लागणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT