Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: कला, संस्कृतीच्या उत्कर्षासाठी नवनवीन उपक्रमांवर भर देणार- मुनगंटीवार

Goa News: मुनगंटीवार : महाराष्ट्र , गोवा सरकारचा पुढाकार

दैनिक गोमन्तक

Goa News: महाराष्ट्र आणि गोवा सरकारच्या माध्यमातून नाट्यक्षेत्राच्या उभारीसह कला व संस्कृतीच्या उत्कर्षासाठी नवीन उपक्रम सुरू करण्यात येतील, असे महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले. फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिरात काल एकोणसाठाव्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर ज्येष्ठ कलाकार विजय गोखले, ‘महाराष्ट्र सांस्कृतिक विभागाचे संचालक बिभिषण चवरे व उपसचिव विलास थोरात आदी उपस्थित होते. मुनगंटीवार म्हणाले की, गोव्यात आल्यावर महाराष्ट्रातच असल्याचा आभास होतो. कारण येथील कला संस्कृतीशी महाराष्ट्राचे साम्य आहे. गोव्यातील गावागावात शेकडो नाट्यप्रयोग होतात.

येथील नाट्यकलाकार आणि कला रसिकांमुळे नाट्य कला बहरली. गोवा आणि महाराष्ट्राच्या माध्यमातून नाट्य संस्कृती अधिकाधिक फुलवण्यासाठी विविध उपक्रम आखण्यात येतील.’ यावेळी विविध नाट्य स्पर्धांतील पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक विलास थोरात यांनी केले. सूत्रसंचालन ओंकार कर्वे व पल्लवी वैद्य यांनी केले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही सादरीकरण करण्यात आले.

महाराष्ट्र सरकार आयोजित नाट्य स्पर्धेत पणजीच्या रूद्रेश्‍वरतर्फे ‘पालशेतची विहीर'' या नाटकाला प्रथम पुरस्कार मिळाला होता. ज्या केंद्रात नाटक प्रथम येते, त्या केंद्रात बक्षीसवितरण सोहळा आयोजित करण्यात येतो, त्यामुळे हा मान पालशेतच्या विहिरीमुळे गोव्याला मिळाला, असे यावेळी सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AC Compressor Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू; पालकांचा काळीज पिळवटणारा आक्रोश VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

SCROLL FOR NEXT