Goa News |  Dainik Gomantak
गोवा

Goa News: महाराष्ट्राच्या सभापतींनी घेतली 'ई विधानसभा' कामाची माहिती!

Goa News: गोव्यातील विधानसभा कामकाज आणि विधीमंडळ प्रक्रिया तसेच 'ई विधानसभा' यासंदर्भात त्यांनी माहिती जाणून घेतली.

दैनिक गोमन्तक

Goa News: गोवा विधानसभेच्या डिजिटलाईज्ड कामकाजाची (ई विधानसभा) तसेच अवलंबिण्यात आलेल्या विधीमंडळ प्रक्रिया व त्याच्या वापरासंदर्भातची माहिती महाराष्ट्राचे सभापती राहुल नार्वेकर यांनी काल गोव्याचे सभापती रमेश तवडकर यांची सदिच्छा भेट घेऊन जाणून घेतली.

गोवा व महाराष्ट्र या दोन राज्‍यांतील संसदीय लोकशाही मजबूत करण्यासाठी व जास्तीत जास्त या डिजिटलाईज्ड सोयीसुविधा दोन्ही राज्यांतील सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी दोन्ही सभापतींमध्ये झालेल्या सुसंवादावेळी प्रयत्न करण्याची चर्चा झाली.

मूळ गोमंतकीय व महाराष्ट्राचे सभापती राहुल नार्वेकर यांनी काल पर्वरी विधानसभा संकुलात सभापती रमेश तवडकर यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी गोव्यातील विधानसभा कामकाज व विधीमंडळ प्रक्रिया तसेच ‘ई विधानसभा’ यासंदर्भात चर्चा करून त्या कशाप्रकारे महाराष्ट्रातील विधानसभेसाठी लागू करता येतील यावर चर्चा केली.

तसेच, त्यानंतर पत्रकाराशी बोलताना ते म्हणाले की, गोव्यातील विकासकामे तसेच डिजिटलाईज्ड होत असलेल्या विधानसभेच्या कामकाजाबाबत माहिती सभापती तवडकर यांच्याकडून जाणून घेतली. मूळ गोमंतकीय पण मुंबईत राहून मी महाराष्ट्राचा सभापती बनलो.

हे सर्व काही गोव्यातील देवदेवतांच्या आशीर्दावादमुळेच शक्य झाले. तवडकर यांनी शिक्षणसंदर्भात तसेच दिलेल्या सल्ल्याचा वापर महाराष्ट्राच्या लोकहितासाठी, सुविधांसाठी केला जाईल असे ते नार्वेकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT