Goa Made Liquor Smuggling Dainik Gomantak
गोवा

गोव्यातून होणाऱ्या दारू तस्करीबद्दल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना प्रमोद सावंत उत्तर देणार का? युरी आलेमाव यांचा सवाल

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गोव्यातून कर्नाटकात होणारी दारूची तस्करी थांबवावी असे आदेश आपल्या अधिकाऱ्याना दिले आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Made Liquor Smuggling: कर्नाटकात आजही भ्रष्ट भाजप सरकारच राज्य करत असल्याचा भास गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांना होत असावा. कर्नाटकातील जनतेने भ्रष्टाचार संपवण्यासाठी काँग्रेसचे सरकार निवडून दिले आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गोव्यातून कर्नाटकात होणारी दारूची तस्करी थांबवावी असे आदेश आपल्या अधिकाऱ्याना दिले आहेत. डॉ. प्रमोद सावंत याची दखल घेवून दारू माफीयांवर कारवाई करतील का? असा सवाल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गोव्यातून अवैध दारूची तस्करी रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निर्देशांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना युरी आलेमाव यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील गोव्यातील भाजप सरकारने गोव्याचे मानवी तस्करी, ड्रग्ज, प्रदूषणकारी आणि घातक पदार्थांची वाहतूक आणि दारूची तस्करी करणारे "ट्रांसीट हब" बनविल्याचा गंभीर आरोप केला.

आज राज्याच्या सीमांवर सरकारचे नियंत्रण राहीलेले नाही. काळ्या काचेच्या वाहनांमध्ये मृतदेह सीमेपलीकडे नेले जातात आणि अधिकाऱ्यांना त्याचा थांगपत्ता नसतो. यावरून सरकार आणि गुन्हेगार यांच्यात संगनमत असल्याचे स्पष्ट दिसून येते, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

कर्नाटकात भाजपचे सरकार असताना गोव्यातून अवैध दारूच्या वाहतुकीकडे भाजप सरकारने जाणीवपूर्वक डोळेझाक केली हे स्पष्ट आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कर्नाटकातील भाजप सरकारचा आशिर्वाद असलेल्या दारू माफियांना मदत करण्यासाठी गोव्याच्या आर्थिक नुकसानाकडे दुर्लक्ष केले, असा दावा युरी आलेमाव यांनी केला.

गोव्यातून होणारी अवैध दारूची तस्करी रोखण्यासाठी सक्रिय पाऊल उचलल्याबद्दल मी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे आभार मानतो. त्यांचा हा निर्णय एक प्रकारे गोव्याला महसुल प्राप्तीसाठी फायद्याचा ठरेल, असे युरी आलेमाव म्हणाले.

उत्पादन शुल्क विभागातील विविध घोटाळे कॅगने निदर्शनास आणूनही भाजप सरकारने अजूनही धडा घेतलेला नाही हे दुर्दैवी आहे. उत्पादन शुल्क विभागाचे कामकाज सुरळीत करण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: जो खिलाफ है मेरे मैं उनके विरुद्ध तो नही, पर हाँ... प्रदर्शन करणाऱ्या महिलेसमोर उभा ठाकला तिचाच पोलिस पती; पाहा सुंदर व्हिडिओ

North Goa: सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, धूम्रपान करणाऱ्यांची खैर नाही! 66 जण ताब्यात; उत्तर गोव्यात पोलिसांची मोठी कारवाई

Viral Video: प्रवाशांच्या जीवाशी खेळ! एसी डब्यात सिगारेट ओढणाऱ्या तरुणीचा हंगामा; प्रवाशांनी विरोध करताच सुरु झाली बाचाबाची

Duleep Trophy 2025 Final: 11 वर्षांनंतर सेंट्रल झोनच्या झोळीत दुलीप ट्रॉफी, अंतिम सामन्यात दक्षिण विभागाचा 6 विकेट्सने पराभव

"99 प्रॉब्लेम्स आहेत, पण नवऱ्याची कटकट नाही", दक्षिणी अभिनेत्रीचे डिवोर्स फोटोशूट; नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT