Goa Liquor Seized in Chhattisgarh  
गोवा

Goa Liquor Seized: 'जय माँ लक्ष्मी' होता कोड, छत्तीसगडमध्ये 1 कोटीची गोवा बनावटीची कंटेनर भरुन दारु जप्त; भूतान परमिटचा वापर

Chhattisgarh Crime News: आगामी महापालिका निवडणुकीत वापरासाठी हे मद्य छत्तीसगडमध्ये आणल्याचे उघड झाले आहे.

Pramod Yadav

छत्तीसगड: महापालिका निवडणुकीपूर्वी उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. गोव्यातून आलेले एक कोटीहून अधिक किमतीची अवैध विदेशी मद्य जप्त करण्यात आलंय. राज्य आणि विभागीय पथकाने संयुक्त पद्धतीने ही कारवाई केली.

कंटेनरमधून इंग्रजी दारूचे 1000 बॉक्स जप्त करण्यात आलेत. संशयितांनी मद्य वाहतुकीसाठी बनावट भूतान परमिट वापरल्याचे उघडकीस आले आहे.

आगामी महापालिका निवडणुकीत वापरासाठी हे मद्य छत्तीसगडमध्ये आणल्याचे उघड झाले आहे. यात होलोग्राम नसलेल्या बॉक्सेसचाही समावेश होता. बिलासपूरमध्ये दारू उतरवण्यासाठी 'जय माँ लक्ष्मी' कोड वापरला जात होता. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई करत छटौनाजवळ कंटेनर थांबवला. यानंतर कंटेनरची झडती घेण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा साठा करण्यात आला.

यानंतर पथकाने ड्रायव्हर आणि डिलिव्हरी बॉयला अटक केली. चौकशीत ही दारू पंकज सिंह आणि जय बघेल यांच्या नावाने बिलासपूर येथे पोहोचवली जाणार होती, अशी माहिती समोर आली आहे. छत्तीसगडमधील अवैध दारू धंद्यावरील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

पंकज आणि जय बघेल हे बिलासपूरचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप या लोकांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलेले नाही. अवैध दारूप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक वृत्तपत्राला दिली आहे.

महापालिका निवडणुकीत मतदानापूर्वी भाजपचे नगरसेवक श्याम कार्तिक यांना स्थानिक लोकांनी पैसे वाटताना पकडले. घाबरलेल्या उमेदवार श्याम यांनी पैशांनी भरलेला लिफाफे नाल्यात फेकले, त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. स्थानिकांनी नाल्यातून लिफाफे बाहेर काढले. 10-15 लिफाफ्यात 200-200 च्या नोटा आढळून आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT