Goa Police: गोव्यात येऊन गुंडगिरी कराल तर खबरदार; हुल्लडबाज पर्यटकांना DGP यांचा सज्जड दम

Goa Tourism: पर्यटकांनी गोव्यात केलेल्या मारहाणीच्या घटनांनंतर पोलिस महसंचालकांनी गैर प्रकार करणाऱ्या पर्यटकांविरोधात झिरो टॉलरन्स धोरण अवलंबवे आहे.
Goa DGP Alok Kumar
Goa DGP Alok KumarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यात येऊन गुंडगिरी करणाऱ्या पर्यटकांना पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी सज्जड दम दिला आहे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कारवाईचा सामना करावा लागेल, असे कुमार यांनी म्हटले आहे. गेल्या आठवड्यात घडलेल्या मारहाणीच्या दोन घटनानंतर पोलिस महासंचालकांनी पर्यटकांना इशारा वजा सूचना केलीय.

"दिवसा पर्यटक पट्ट्यात स्थानिक पोलिस, पर्यटक पोलिस, वाहतूक पोलिस तौनात करण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळेस समुद्रकिनारी भागात नाकाबंदी केली जात आहे. कोणत्याही प्रकारची घटना घडल्यास योग्य कारवाई केली जात आहे. आवश्यक असल्यास अटक देखील केली जात आहे. कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या विरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी आम्ही अवलंबली आहे."

Goa DGP Alok Kumar
Curchorem Helmet Man: डोक्यावर हेल्मेट, अंगावर कपडे नाही; कुडचड्यात नग्नावस्थेत फिरून महिलांना करतोय लक्ष्य; Video Viral

"गोवा शांतताप्रिय राज्य आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांनी गोव्यातील पर्यटनाचा आस्वाद घ्यावा, काही अनुचित करण्याचा प्रयत्न करुन नये. एक - दोन ज्या घटना उघडकीस आल्या त्याविरोधात पोलिसांनी तात्काळ आवश्यक कारवाई केलीय. स्थानिक आणि पर्यटकांनी जबाबदारीने वागावे. काही गैर घडत असल्यास पोलिस आवश्यक ती कारवाई करतील", असे पोलिस महासंचालक अलोक कुमार म्हणाले.

Goa DGP Alok Kumar
Cash For Job Scam: "ही गोयेंच्या लोकांच्या दोळ्यांक उदक लावपाची कामां" नोकरी घोटाळा प्रकरणी सरदेसाई आक्रमक

गेल्या आठवड्यात गोव्यात दोन हाणामारीच्या घटना उघडकीस आल्या. दुचाकीला कारची धडक बसली म्हणून स्थानिक गोंमतकीय व्यक्तीला नाशिक येथून आलेल्या पर्यटकांनी जबर मारहाण केली. तर, एका रिसॉर्टमध्ये सुरक्षा रक्षकांना मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली. या दोन्ही प्रकरणाची पोलिसांनी तात्काळ दखल घेत कारवाई केली. यानंतर पोलिसांनी पर्यटकांना जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com