Goa Made liquor sealed Dainik Gomantak
गोवा

Goa liquor: गोवा टू बिहार व्हाया मध्यप्रदेश; लाखो रूपयांच्या विदेशी मद्य तस्करीसाठी लढवली शक्कल पण...

दोन दिवसांत पोलिसांनी पकडली 01 कोटी 25 लाख रूपयांचे विदेशी मद्य

Pramod Yadav

Goa Made liquor sealed: मिर्झापूरमध्ये दारू माफियांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत दुसऱ्या दिवशी पोलिसांनी 65 लाख रुपयांची दारू जप्त केली. त्यापूर्वी 60 लाखांची दारू पकडण्यात आली.

पोलिसांनी विदेशी मद्याच्या 1,100 बाटल्या जप्त करत, दोन मद्य तस्करांना अटक केलीय. ट्रकमधून गोव्यातून बिहारमध्ये दारूची तस्करी केली जात होती.

राजगड पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत मद्य तस्करांना अटक केली आहे. अशी अप्पर पोलिस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. जिल्ह्यात विधानसभा पोटनिवडणूक आणि आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन सखोल तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या कारवाईत 65 लाख रुपये किंमतीची दारू असलेला ट्रक जप्त करण्यात आला आहे.

गोवा राज्यात निर्माण केलेली विदेशी दारू अरुणाचल प्रदेशात घेऊन जात असल्याचे सांगत, बिहारमध्ये नेली जात होती. विशेष म्हणजे या ट्रकची नंबर प्लेट देखील बदलण्यात आली होती. दरम्यान, हा ट्रक उत्तर प्रदेशमार्गे बिहारला जात असताना पोलिसांनी ट्रकची तपासणी करून, आरोपींना अटक केलीय.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता, तस्करीत दारू बिहारमध्ये चढ्या भावाने विक्री करण्यासाठी नेली जात होती आणि विक्री केली जात असल्याचे आढळून आले. बिहारमध्ये आगामी पोटनिवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मद्याची तस्करी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी रमाशंकर मंडारी (रा. कौशांबी) आणि नितीन उर्फ ​​प्रिन्स कोरथ (रा. आग्रा) यांना अटक केली आहे. पोलिसांकडून दारू तस्करी करणाऱ्या रॅकेटमधील इतर लोकांचाही शोध घेतला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT