Xeldem Sarpanch: शेल्डेच्या सरपंच दीप्ती नाईक यांच्यावरील अविश्वास ठराव 8-3 मतांनी संमत

उपसरपंच प्रमोद गावस देसाई यांनी सरपंच दीप्ती नाईक पंच सदस्यांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेत होत्या असे सांगितले.
Xeldem Sarpanch
Xeldem SarpanchDainik Gomantak
Published on
Updated on

Xeldem Sarpanch: शेल्डेच्या सरपंच दीप्ती नाईक यांच्यावर आणलेला अविश्वास ठराव आज 08 विरुद्ध 03 मतांनी संमत झाला. आज झालेल्या खास बैठकीला अकराही पंच सदस्य उपस्थित होते.

(No Confidence Motion Against Xeldem Sarpanch Dipti Naik )

शेल्डे पंचायतीच्या सरपंच दीप्ती नाईक यांच्यावर आठ पंच सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. या ठरावावर चर्चा करण्यासाठी आज (दिं.10) सकाळी खास बैठक बोलावण्यात आली होती यावेळी निर्वाचन अधिकारी म्हणून केपेचे गटाधिकारी अनिल नाईक हजर होते. ज्या आठ पंच सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता त्यांनी हात उंचावून अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने हा ठराव आठ विरुद्ध तीन मतांनी संमत करण्यात आला.

उपसरपंच प्रमोद गावस देसाई यांनी सरपंच दीप्ती नाईक पंच सदस्यांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेत होत्या असे सांगितले. सदर पंचायतीत सरपंचपद महिला साठी राखीव असून आता सरपंच पदाची माळ कविता गावस देसाई यांच्या गळ्यात पडणार असल्याची चर्चा असली तरी कुडचडेचे आमदार निलेश काब्राल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील सरपंच निवडण्यात येणार असल्याचे प्रमोद गावस देसाई यांनी सांगितले.

पंच सदस्यांच्या इमारतीचे राजकारण

नवीमडडी तीळामळ येथे पंच सदस्य जोहान फेर्नांडिस यांच्या रहिवाशी प्रकल्पाचे काम चालू असून काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या प्रश्नावरून या प्रकल्पाविरोधात नवीमडडी येथील लोकांनी पंचायतीवर मोर्चा नेला होता व यावेळी सरपंच दीप्ती नाईक यांनी बाकी पंच सदस्यांना विश्वासात न घेता सदर प्रकल्पाचे काम पंधरा दिवस बंद करण्याचा आदेश दिला होता. याच निर्णयामुळे हा अविश्वास ठराव आणला गेल्याचे सांगितलें जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com