Goa Made Illegal Liquor Seized
Goa Made Illegal Liquor Seized Dainik Gomantak
गोवा

Goa Illegal Liquor: मडगावात 77 हजारांचे मद्य पकडले; चार दिवसांत राज्यात एक लाखांचा मद्यसाठा जप्त

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Made Illegal Liquor Seized

मडगाव रेल्‍वे स्‍टेशन परिसरात एका बेकायदेशीर गोदामात साठवून ठेवलेली सुमारे 77 हजार रुपयांची अवैध दारु मडगावच्‍या अबकारी खात्‍याने काल घातलेल्‍या धाडीत पकडली. ही एकूण दारु 170 लिटर एवढ्या प्रमाणात होती अशी माहिती मडगावचे अबकारी निरीक्षक दुर्गादास नाईक़ यांनी दिली.

या गाेदामात बेकायदेशीर दारु साठवून ठेवल्‍याची माहिती मिळाल्‍यानंतर काल रात्री ही कारवाई करण्‍यात आल्‍याचे शिरोडकर यांनी सांगितले. त्‍यांना यात उपनिरिक्षक जितेंद्र आडपईकर आणि अबकारी गार्ड मनोज जामुनी आणि संतोष शेटकर यांचा समावेश होता असे त्‍यांनी सांगितले.

अवैध दारुचा व्‍यवहार रोखण्‍यासाठी अबकारी खात्याने दिवस रात्र धर्तीवर गस्‍ती सुरु केली असून त्‍यामुळेच ही दारु हाती लागली असे त्‍यांनी सांगितले. हा गोदाम कुणाच्‍या मालकीचा आणि बेकायदेशीर दारु कुणाच्‍या मालकीची या संबंधीत माहिती मिळाली नाही. यासंबंधी आमचा तपास चालू आहे असे त्‍यांनी सांगितले.

गेल्या चार दिवसांत एक लाख रुपयांचे अवैध मद्य जप्त

गोव्यात गेल्या चार दिवसांत सुमारे एक लाख रुपयांचे अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. काही गेल्या आठवड्यात कोकण रेल्वे पोलिसांनी मुंबईच्या व्यक्तीकडून 8,806 रुपये किमतीचा 61.380 लिटर मद्यसाठा जप्त केला होता. तसेच, मोले जंगलातून 12.470 लिटर मद्यसाठा कुळे पोलिसांनी जप्त केला होता.

गोव्यातून कर्नाटकच्या दिशेने जाणाऱ्या बसमध्ये आठ हजार 319 रुपयांचे 41.25 लिटर अवैध मद्य जप्त करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa Today News Live: कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी अखेर खूनाचा गुन्हा नोंद

Stray Dogs In Goa: भटक्या कुत्र्यांचे वाढते हल्ले; किनारे बनले असुरक्षित

Shiroda News: शिरोड्यात खड्ड्यांत पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा

Cape News: सांडपाण्याची डबकी, सोकपिट भरले, झाडेझुडपे वाढली; केपे बाजार दुर्गंधीमय

SCROLL FOR NEXT