Panaji:...तरच देशात लोकशाही टिकेल, सरदेसाईंची NDA वर टीका; इंडि आघाडीच्या नेत्यांना आझाद मैदानावर रोखले

Panaji Azad Maidan:केजरीवाल यांच्या अटक निषेधार्थ इंडि आघाडीकडून देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
Panaji Azad Maidan
Panaji Azad MaidanDainik Gomantak

Panaji Azad Maidan

कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबाजवणी संचलनालयाकडून अटक करण्यात आली आहे. केजरीवाल यांच्या अटक निषेधार्थ इंडि आघाडीकडून देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

केजरीवालांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी आझाद मौदानावर आलेल्या इंडि आघाडीच्या नेत्यांना पोलिसांनी रोखले. आंदोलनास परवानगी नसल्याचे कारण देत पोलिसांनी नेत्यांना मैदानावर प्रवेश करण्यापासून मज्जाव केला.

यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार विजय सरदेसाई, क्रुझ सिल्वा, आल्टन डिकॉस्ता, अमित पालेकर, दुर्गादास कामत यांच्यासह आघाडीतील पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित अबकारी घोटाळा प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली. ईडी त्यांना नऊ वेळा चौकशीसाठी नोटीस बजावली होती. दहाव्या नोटीसीनंतर त्यांना अटक करण्यात आली.

केजरीवालांच्या अटक निषेधात इंडिया आघाडीकडून देशव्यापी आंदोलन केले जात आहे. गोव्यात देखील आघाडीच्या नेत्यांकडून निषेध आंदोलन केले जाणार होते. दरम्यान, आझाद मैदानावर प्रवेश करण्यापासून नेत्यांना रोखण्यात आले.

Panaji Azad Maidan
Goa Road Accident: गोव्यात 2023 मध्ये 2,846 अपघातांची नोंद; दर आठवड्याला पाच जणांचा मृत्यू

आंदोलनासाठी परवानगी नसल्याचे कारण देत नेत्यांना रोखण्यात आले. सध्या आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

...तरच देशात लोकशाही टिकेल - सरदेसाई

देशात एडीए आघाडीचे सरकार आल्यास लोकशाही टिकेल याची खात्री कोण देणार? असा सवाल गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी उपस्थित केला.

लोकशाही टिकेल असे आश्वासन ते देत नाहीत, एडीएच्या सरकारनंतर देशात हुकूमशाही असेल. पण, देशात इंडिया आघाडीचे सरकार आल्यास लोकशाही टिकेल, असा विश्वास सरदेसाई यांनी व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com