म्हापसा: हडफडे येथील बहुचर्चित ‘बर्च बाय रोमियो लेन’ रेस्टॉरंटला लागलेल्या भीषण आगप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायालयाने बुधवारी सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा या दोन्ही भावांना सशर्त जामीन मंजूर केला.
६ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या या दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला होता. न्यायालयाने प्रत्येकी एक लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका आणि तेवढ्याच रकमेचे दोन हमीदार सादर करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला.
दोन्ही हमीदारांपैकी एक आरोपीचा जवळचा नातेवाईक असावा आणि त्यांच्यावर कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसावा, अशी अट न्यायालयाने घातली आहे. साक्षीदारांवर दबाव किंवा प्रलोभन आणणे तसेच पुराव्यांशी छेडछाड करण्यास मनाई करण्यात आली आहे. न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय देश सोडता येणार नसून, पासपोर्टसाठी न्यायालयाचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे. आरोपींनी आपला सध्याचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक न्यायालय तसेच हणजूण पोलिसांकडे जमा करावा आणि प्रत्येक सुनावणीला उपस्थित राहावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
१३ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लुथरा बंधूंनी १४ सप्टेंबर रोजी अजय गुप्तासह म्हापसा न्यायालयात आत्मसमर्पण केले होते. उच्च न्यायालयाने जामीन रद्द केल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. हणजूण पोलिसांनी तपास पूर्ण करून एकूण १३ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.