Womens Cricket News Dainik Gomantak
गोवा

T20 Tournament: झारखंडच्या महिला पडल्या भारी! गोव्याचा 7 विकेट राखून पराभव; फलंदाजीत निराशाजनक कामगिरी

Goa Vs Jharkhand Cricket News: फलंदाजीतील निराशाजनक कामगिरीमुळे गोव्याला गुरुवारी सीनियर महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत झारखंडकडून सात विकेट राखून पराभव पत्करावा लागला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: फलंदाजीतील निराशाजनक कामगिरीमुळे गोव्याला गुरुवारी सीनियर महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत झारखंडकडून सात विकेट राखून पराभव पत्करावा लागला. एलिट ड गटातील सामना छत्तीसगडमधील रायपूर येथे शहीद वीर नारायण सिंग स्टेडियमवर झाला.

गोव्याने पहिल्या लढतीत उत्तराखंडला नमविले होते, त्याची पुनरावृत्ती त्यांना गुरुवारी करता आली नाही, कारण आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली नाही. गोव्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, पण त्यांचा डाव अवघ्या ७८ धावांत संपुष्टात आला. नंतर झारखंडने १३.४ षटकांतच ३ बाद ८२ धावा करून सामना सहजपणे जिंकला.

संक्षिप्त धावफलक ः गोवा ः १९.२ षटकांत सर्वबाद ७८ (हर्षिता यादव ४, पूर्वजा वेर्लेकर ७, तनिशा गायकवाड १५, पूर्वा भाईडकर २, तनया नाईक २, सुनंदा येत्रेकर २०, विनवी गुरव ३, श्रेया परब नाबाद १५, उस्मा खान १, मेताली गवंडर २, विधी भांडारे २, देवयानी २-१४, आरती ३-१५)

पराभूत वि. झारखंड ः १३.४ षटकांत ३ बाद ८२ (शशी माथूर नाबाद ४६, दुर्गा मुर्मू नाबाद २४, श्रेया परब २.४-०-१४-१, मेताली गवंडर २-०-१३-१, सुनंदा येत्रेकर ३-०-११-१, तनया नाईक ३-०-१३-०, विधी भांडारे २-०-१६-०, उस्मा खान १-०-१५-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Butterflies In Goa: 'ताकदवान क्रूजर युद्धनौकांवरुन नाव दिलेले, गोव्यात सर्वत्र आढळणारे फुलपाखरु'; फुलपाखरांतील राजेशाही

Goa Temples: ‘कोकणाख्याना’त गोव्याचे निर्माण परशुरामाने बाण मारून केल्याचा उल्लेख होतो; धर्मस्थानांच्या दंतकथा

Goa Live News: पुढील 15 दिवसांत 'खड्डा' हा शब्द ऐकू येणार नाही: बांधकाम मंत्री दिगंबर कामत

IFFI 2025: 'कोमात असताना स्वप्नात खोल समुद्र, घनदाट जंगल दिसायचे', पेस्कॅडोर चित्रपटाच्या दिग्दर्शकाने सांगितली निर्मितीमागची रंजक कथा

Goa Revenue: स्‍टँप ड्युटीतून मिळणाऱ्या महसुलात घट! अहवालातील आकडेवारीतून उघड; GST वरील करांत मात्र वर्षभरात वाढ

SCROLL FOR NEXT