goa london flight news Dainik Gomantak
गोवा

Goa–London Flight: गोवा-लंडन विमानसेवा पुन्हा सुरु होणार! गोमंतकीयांसाठी खुशखबर; Air Indiaची मिळणार सेवा

Mopa to Gatwick Flight: गोव्याचे राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली

Akshata Chhatre

पणजी: गोव्याच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनसाठी थेट सुरू असलेली विमानसेवा लवकरच पुन्हा सुरू होणार आहे. गेल्या महिन्यात अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातानंतर ही सेवा तात्पुरती थांबवण्यात आली होती, मात्र आता ती यंदाच्या हिवाळी हंगामात पुन्हा सुरू होईल, अशी माहिती केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने राज्यसभेत दिली आहे. गोव्याचे राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली.

काही दिवसांपूर्वीच यासंदर्भात राज्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी देखील विधानसभेत महत्त्वाचे विधान केले होते. २९ जुलै रोजी आपल्या विभागाच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेदरम्यान बोलताना खंवटे म्हणाले होते की, "गोव्याला विविध ठिकाणांहून चांगले हवाई संपर्क मिळणे हे राज्याच्या पर्यटन क्षेत्रासाठी एक मोठा बदल ठरत आहे."

अपघातामुळे सेवा थांबली होती

१२ जून रोजी अहमदाबादमध्ये लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला होता. या अपघातामुळे गोव्याच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (मोपा) लंडनच्या गॅटविक विमानतळापर्यंतची (Goa to London-Gatwick) उड्डाणे तात्पुरती थांबवण्यात आली होती. या घटनेनंतर पर्यटक आणि गोमंतकीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता ही सेवा लवकरच सुरू होणार असल्याच्या माहितीमुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे.

ऑक्टोबरपासून हिवाळी वेळापत्रक

सामान्यतः, आंतरराष्ट्रीय हवाई सेवांचे हिवाळी वेळापत्रक ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होते. त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ही सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे, असे पर्यटनमंत्री खंवटे यांनी विधानसभेत स्पष्ट केले. गोव्यासारख्या पर्यटनप्रधान राज्यासाठी थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा अत्यंत महत्त्वाची आहे. युरोपातील अनेक पर्यटक थेट गोव्यात येण्यास प्राधान्य देतात. थेट विमानसेवा पुन्हा सुरू झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांना मोठा फायदा होणार असून, गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला पुन्हा एकदा मोठी चालना मिळेल.

ही विमानसेवा सुरू झाल्यामुळे गोमंतकीय नागरिक, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना देखील मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे ही सेवा पुन्हा सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून या सेवेच्या पुनरुज्जीवनासाठी केले जात असलेले प्रयत्न निश्चितच स्वागतार्ह आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Pakistan Nuclear List: तणावाच्या वातावरणातही भारत-पाकिस्तानने जपली 35 वर्षांची परंपरा; अणुयादीच्या देवाणघेवाणीने जगाचे वेधले लक्ष

बांगलादेशात क्रूरतेचा कळस! 50 वर्षीय हिंदू व्यक्तीवर धारदार शस्त्रांनी हल्ला करुन दिलं पेटवून; 31 डिसेंबरची रात्र ठरली 'काळरात्र'

VIDEO: कळंगुटमध्ये पर्यटकांपेक्षा तंबाखू-दारु पिऊन फिरणाऱ्यांचीच 'तोबा' गर्दी, सरत्या वर्षाला अशा प्रकारे निरोप; गर्दीचे विदारक वास्तव मांडणारा व्हिडिओ चर्चेत

New Year 2026: इंग्रजी वर्षाची सुरुवात सूर्यनमस्कार आणि योगाभ्यासाने! तांबडी सुर्ला महादेव मंदिरात शेकडो तरुणांचा उत्साह

पर्यटकांच्या फटाक्यांमुळे मच्छिमाराचे 'रापण' खाक; मोठ्या आर्थिक नुकसानानंतर भरपाईची मागणी!

SCROLL FOR NEXT