Goa Lokotsav 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Lokotsav 2023: ‘लोकोत्सव 2023’चा शानदार समारोप

गेले दहा दिवस कला अकादमी येथे दर्या संगमावर सुरू असलेल्या ‘लोकोत्सव 2023’चा शानदार समारोप झाला.

दैनिक गोमन्तक

Goa Lokotsav 2023: गेले दहा दिवस कला अकादमी येथे दर्या संगमावर सुरू असलेल्या ‘लोकोत्सव 2023’चा शानदार समारोप झाला.

सुंदर अशा कलात्मक रंगमंचावर विविध राज्यांतील वैशिष्ट्यपूर्ण लोककलांचे, लोकसंगीताचे सादरीकरण आणि वैविध्यपूर्ण हस्तकलांचे स्टॉल्स यांनी बहरलेल्या या लोकोत्सवाला काल समारोपाच्या दिवशी मोठी गर्दी होती.

सायंकाळपासूनच लोकांनी गर्दी केली होती. त्यामुळे पार्किंगची समस्याही निर्माण झाली होती. विविध स्टॉल्सवर मात्र विक्रमी खरेदी झाल्याचे आढळून आले. लोकोत्सवातील उलाढाल दोन कोटींच्या घरात गेल्याचा अंदाज वर्तविण्यात येतो. दोन वर्षांनंतर हा लोकत्सव भरल्याने लोकांनी त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.

मोजडी, बांधणी, पॅच वर्क, बीड वर्क, हातमाग, मिनिएचर, पेंटिंग्स, फॅब्रिक्स, लाकडी खेळणी, ज्वेलरी, खादी कपडे, टेराकोटा, शिंपल्यांच्या हस्तकला अशी विविधता स्टॉल्सवर होती. खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर तर खवय्यांनी विविध राज्यांतील खाद्यपदार्थांचा मनमुराद आस्वाद घेतला.

लोककलाकारांचा गौरव

समारोप सोहळ्याला व्यासपीठावर कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते विविध हस्तकारागिरांचा, लोककलाकारांचा प्रातिनिधिक सन्मान करण्यात आला. त्यात पोलिस खाते, अग्निशमन दल, वाहतूक खाते, इव्हेंट मॅनेजमेंट, कला संस्कृती खात्याचे अधिकारी, कर्मचारी आदींचा समावेश होता.

यावेळी कला संस्कृती खात्याचे सचिव मिनिनो डिसोझा, संचालक सगुण वेळीप, उपसंचालक अशोक परब, सर्वोत्तम सातर्डेकर, दिनेश पवार उपस्थित होते.

या लोकोत्सवाच्या भव्य अशा आयोजनात काही चुका होणे साहजीकच होते. पण पुढच्यावेळी त्या सुधारल्या जातील.

लोककलाकार, हस्तकारागीर, खात्याचे कर्मचारी या सर्वांच्या योगदानामुळे हा लोकोत्सव यशस्वी झाला आहे. लोकांचा उदंड प्रतिसाद लाभल्याने कलाकारांचा व हस्तकारागिरांचा उत्साह वाढला आहे. - गोविंद गावडे, कला व संस्कृती मंत्री

शेवटच्या दिवशी चोरी

आज शेवटचा दिवस असल्याने स्टॉल्सवर खरेदीसाठी उशिरापर्यंत लोकांची वर्दळ होती. पूनम परमार यांच्या स्टोन ज्वेलरी स्टॉलवर प्रथमच काल चोरी झाली. दोन ते तीन हजार किमतीचे काही सेट चोरीला गेले. गोव्याचे लोक पडलेली वस्तूही आणून देतात, हा अनुभव आहे. ते कधी चोरी करणार नाहीत, असे त्या म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT