Justice Sandeep Shinde Lokayukta Dainik Gomantak
गोवा

लोकायुक्त अजूनही विदेशात, आणखी आठवडाभर प्रतीक्षा; सुनावण्या लांबणीवर

Justice Sandeep Shinde Lokayukta: लोकायुक्तांसमोर प्रलंबित असलेल्या खटल्यांच्या सुनावण्या सुरू होण्यासाठी नागरिकांना आणखी आठवडाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: लोकायुक्तांसमोर प्रलंबित असलेल्या खटल्यांच्या सुनावण्या सुरू होण्यासाठी नागरिकांना आणखी आठवडाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. लोकायुक्तपदी नियुक्त झालेले निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे हे अजूनही विदेशात आहेत.

लोकायुक्तपदी शपथ घेतल्यानंतर लगेचच संदीप शिंदे विदेशात रवाना झाले. अजूनही ते तेथेच आहेत. ते १३ एप्रिल रोजी परत येतील, अशी माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली होती. मात्र, ते अद्याप विदेशातच असल्याने कामकाज सुरू होण्यास विलंब होत आहे. दरम्‍यान, लोकायुक्त सचिवपदी अरविंद बुगडे यांची बदली करण्यात आली आहे.

लोकायुक्त अंबादास जोशी यांच्या गेल्या वर्षी मार्चमध्ये झालेल्या निवृत्तीनंतर जवळपास वर्षभर हे पद रिक्त होते. या कालावधीत सुमारे ३० तक्रारी दाखल झाल्या; मात्र लोकायुक्तच नसल्याने त्या चौकशीविना आणि सुनावणीविना प्रलंबित राहिल्या आहेत. मी सध्या विदेशात आहे. आठवडाभरानंतर मी भारतात परतल्यानंतर या विषयावर बोलू शकेन.

- संदीप शिंदे

लोकायुक्त

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

प्राणवायूचे प्रमाण एकदम घटल्‍याने हजारो मासे मृत, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तपासणीचा निष्‍कर्ष

गोळी झाडली ती बंदूक बेकायदेशीर, श्‍‍वेत गावडेला खुनाच्‍या आरोपाखाली अटक; 4 दिवसांची पोलिस कोठडी

Drowning Death: भावासाठी जीवाची बाजी लावूनही बहिणीचा अंत, कुडचडेत शोककळा; समुद्राने हिरावले दोन निष्पाप जीव

विरोधापुढे झुकणार नाही, भूरूपांतर वादावर सरकार ठाम; विशेष अधिवेशनाला अनुत्‍सुक

Daily Horoscope: मंगळवार ठरणार मंगलमयी! 'या' राशींच्या नशिबात धनलाभाचे योग; घरात नांदणार सुख, शांती आणि समृद्धी

SCROLL FOR NEXT