Goa Lokayukta Dainik Gomantak
गोवा

Goa Lokayukta: गोव्यातील लोकायुक्त निवड आणखी लांबली! 16 जानेवारीनंतर बैठक होण्याची शक्यता; सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Goa Lokayukta Appointment: न्यायालयात दिलेल्या आश्वासनानंतरही अद्याप निवड प्रक्रिया पूर्ण न झाल्याने सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोव्यातील लोकायुक्त पदाची निवड प्रक्रिया पुन्हा एकदा लांबणीवर पडली असून, आता ही प्रक्रिया विधानसभेच्या येत्या अधिवेशनानंतरच पुढे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे १६ जानेवारीनंतरच लोकायुक्त निवडीसाठी आवश्यक बैठक होण्याची शक्यता आहे.

लोकायुक्त पद वेळेत भरण्याची हमी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दिली होती. मात्र न्यायालयात दिलेल्या आश्वासनानंतरही अद्याप निवड प्रक्रिया पूर्ण न झाल्याने सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षता खात्याने लोकायुक्त पदासाठी पात्र व्यक्तींची नावे तब्बल तीन महिन्यांपूर्वीच सरकारकडे सादर केली होती. तरीही त्यावर निर्णय न झाल्याने निवड प्रक्रियेला विलंब लागत असल्याचे चित्र आहे.

लोकायुक्त पद रिक्त असल्यामुळे भ्रष्टाचारविरोधी तक्रारींच्या चौकशीवर परिणाम होत असून नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त केला जात आहे. विधानसभेच्या अधिवेशनानंतर सरकार या विषयावर नेमकी काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa: म्‍हापशात विक्रेत्यांचा रस्त्यावर 'कब्जा'; सगळीकडे अतिक्रमण, बेशिस्‍त पार्किंग; वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा

Surya Gochar 2026: नोकरदारांना प्रमोशन अन् व्यापाऱ्यांना बंपर नफा! सूर्याचं नक्षत्रांतर 5 राशींसाठी ठरणार लकी; काठोकाठ भरणार तिजोरी

Sexual Assault: पडदे लावले अन्... चालत्या स्लीपर बसमध्ये 16 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; चालक-कंडक्टर पोलिसांच्या ताब्यात

Goa Crime: गोव्यात गुन्हे वाढतायत, गोमंतकीयांच्या सुरक्षेचे काय? गुन्हेगारांना वचक राहिलेला नाही, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

Nepal Flood: चीनची 'ती' एक चूक अन् 900 जणांनी गमावला जीव! नेपाळची आपत्ती टळू शकली असती? रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा

SCROLL FOR NEXT