Goa Lok Sabha Election 2024 Dainik Gomantak
गोवा

Goa Lok Sabha Election: बैठका, अंतर्गत प्रचार सुरू; मतदार मात्र विकास आणि रोजगाराच्या मुद्द्यावर ठाम

Goa Lok Sabha Election: ‘वाळपई’तील जनतेचे विकास, रोजगारावर लक्ष भाजपचेच वर्चस्व अधिक

Ganeshprasad Gogate

Goa Lok Sabha Election: वाळपई मतदारसंघातील जनता फक्त विकास आणि रोजगाराचा विचार करते. येथे भाजपमुळेच खऱ्या अर्थाने विकास झाला आहे आणि होत आहे. त्याचबरोबर भाजपचे आमदार असल्याने मतदार त्यांच्या बाजूने उभे आहेत.

ज्या पक्षाचा उमेदवार असतो त्याच पक्षाला मते मिळतात. यापूर्वी वाळपई मतदारसंघात भाजपचे श्रीपाद नाईक यांनाच मनाधिक्य मिळाले आहे आणि उत्तर गोव्यातून नेहमी वाळपईतूनच त्यांना आघाडी प्राप्त झालेली आहे.

वाळपई मतदारसंघात भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरवात गेल्या एक वर्षापासून झाली आहे.

विविध विकासकामांच्या माध्यमातून त्याचबरोबर विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून भाजपने आपला प्रचार सुरूच ठेवला आहे. उत्तर गोव्याची उमेदवारी जाहीर होण्याआधीपासूनच भाजपचा प्रचार सुरूच होता.

काॅंग्रेस पक्षाचा उमेदवार अजून जाहीर झाला नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढलेली आहे. बहुसंख्य कार्यकर्त्यांकडून रमाकांत खलप यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणीही होताना दिसते.

अद्याप काॅंग्रेसचा उमेदवार जाहीर झाला नसला तरी त्यांचा अंतर्गत प्रचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. वेगवेगळ्या कोपरा बैठका सुरू आहेत. मात्र, अजून उघडपणे काॅंग्रेसने प्रचार सुरू केलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT