Lok Sabha Election Dainik Gomantak
गोवा

Goa Lok Sabha Election: जिंकण्यासाठी ‘मोदी’, ‘कमळ’ हेच मुद्दे

Goa Lok Sabha Election: पल्लवींना निवडून आणणार; दक्षिण गोव्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Lok Sabha Election: उमेदवार कोणीही असला तरी आम्ही जीवाचे रान करून त्याला निवडून आणू, अशा आशयाच्या होत्या. दुसऱ्या बाजूने आम्ही ज्या उमेदवाराला ओळखतच नाही, त्या नवख्या उमेदवाराला आमच्यावर लादण्याचा हा प्रयत्न का, अशा प्रतिक्रिया होत्या.

पल्लवी धेंपे या उद्योगपती श्रीनिवास धेंपे यांच्या पत्नी असल्या, तरी त्या मूळ मडगाव येथील असून खनिज उद्योजक प्रमोद तिंबले यांच्या कन्या आहेत. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण मडगाव येथे झाले असले, तरी लग्न होऊन पणजीत गेल्यावर त्यांचा दक्षिण गोव्यातील संपर्क कमी झाला होता.

दक्षिण गोव्याचे भाजप प्रचारप्रमुख आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत यांची प्रतिक्रिया विचारली असता, सध्याची निवडणूक ही मोदी लाटेतली निवडणूक आहे.

त्यामुळे उमेदवार कोण याला कुणी फारसे महत्त्व देणार नाहीत. त्यामुळे पल्लवी धेंपे दक्षिण गोव्यातून सहजपणे जिंकून येतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. 

पल्लवी ही मडगावची कन्या असल्याने ती दक्षिण गोव्यात तशी नवीन नाही, ही गोष्ट ध्यानात घ्यावी लागेल. आम्ही दक्षिण गोव्यात भाजप उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी काम करू.

- दिगंबर कामत, आमदार, मडगाव

भाजप कार्यकर्त्यांची फौजच एवढी मोठी आहे की, दक्षिण गोवा आम्ही सहज काबीज करू, याची आम्हाला खात्री आहे.

कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही दक्षिण गोव्यात सगळीकडे पोहोचलो आहोत. त्यामुळे कुठल्याही उमेदवाराला आम्ही निवडून आणू.

- उल्हास तुयेकर, आमदार, नावेली

पल्लवी धेंपे या वृत्तपत्र आणि शैक्षणिक क्षेत्राशी निगडित आहेत. धेंपो चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी उत्तर गोव्यातील सरकारी शाळा दत्तक घेतल्या आहेत. धेंपे कुटुंब राज्याला नवे नाही.

जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन नरेंद्र मोदी यांनी विचार करून ही उमेदवारी दिली आहे. श्रीनिवास धेंपे यांचे सामाजिक कार्य सर्वपरिचित आहे.

मातृछाया ट्रस्टच्या माध्यमातून ते काम करतात. सुरवातीपासून पल्लवी धेंपे या भाजपच्या सदस्या आहेत. दक्षिण गोव्यात त्यांचे माहेर आहे, त्या ६० हजार मताधिक्क्याने निवडून येतील.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

काँग्रेसच्या गोटातही आनंद

पल्लवी धेंपे यांच्या रूपाने नवखा उमेदवार रिंगणात उभा असल्याने काँग्रेसच्या गोटातही उमेदीचे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेस गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनाच उमेदवारी मिळणार, अशी खात्री व्यक्त केली जात आहे.

सावईकर समर्थक निराश

पल्लवी धेंपे यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे नरेंद्र सावईकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली आहे. अनुभवी दक्षिण गोव्यातील सर्व लोकांशी संपर्क असलेला उमेदवार असताना ही नवखी उमेदवार आमच्यावर का लादली, असा सवाल त्यांच्याकडून केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT