गोवा

Goa Corona Update: गोव्यात आज 76 नवे कोरोनाबाधित, 127 जणांना डिस्चार्ज

राज्यात 588 सक्रिय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात आज (02 ऑगस्ट) दिवसभरात 76 नवे कोरोनाबाधित आढळून आले असून, 127 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज एकाही कोरोना रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. गोव्यातील सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली असून, सध्या राज्यात 588 सक्रिय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज दिवसभरात नव्यान तीन रूग्ण रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, दोन रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यातील एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 2 लाख 56 हजार 300 एवढी झाली आहे. त्यापैकी 2 लाख 51 हजार 749 जण यशस्वी उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 98.22 टक्के एवढा झाला आहे.

आज दिवसभरात 515 प्रयोगशाळा नमुने तापसले आहेत. गोव्यात आजवर 3963 कोरोना रूग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. दिवसभरात 73 रूग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

मागील दोन दिवसांपासून नव्यानं वाढ होणाऱ्या रूग्णांची संख्या घटली असून, बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे राज्यातील सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT