Coronavirus Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: बाधितांच्या संख्येत वाढ डिस्चार्ज घटले; सक्रिय रूग्णसंख्या पुन्हा शंभरीपार

राज्याचा रिकव्हरी रेट 98.41 टक्के एवढा आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Corona Update: गोव्यात कोरोना रूग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली आहे. सोमवारी नव्यानं नोंद झालेल्या रूग्णांची संख्या अधिक असून, डिस्चार्ज झालेल्यांची संख्या कमी आहे. सोमवारी 429 नमूने तपासण्यात आले, त्यापैकी 20 रूग्ण सकारात्मक आले आहेत. आज दिवसभरात केवळ सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासह राज्यातील सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा शंभरीपार गेली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 98.41 टक्के एवढा आहे.

गोवा आरोग्य विभागाच्या (Goa Health Department) वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात सध्याच्या घडीला 102 अॅक्टिव्ह कोरोना रूग्णांवर (Active Corona Cases in Goa) उपचार सुरू आहेत. राज्यात आजवर 2 लाख 58 हजार 726 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 2 लाख 54 हजार 611 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजवर राज्यात 4,013 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात 17,912 सक्रिय कोरोना रूग्ण

भारतात सध्याच्या घडीला 17,912 सक्रिय कोरोना रूग्णांवर (Active Corona Cases) उपचार सुरू आहेत. गेल्या चोवीस तासांत 1,326 नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली असून, 1,723 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा रिकव्हरी रेट 98.78 टक्के एवढा आहे. देशात आजवर 219.63 कोटी नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. त्यापैकी, 95.02 कोटी नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तर, 22.08 कोटी नागरिकांनी सुरक्षात्मक डोस घेतले आहेत. (Covid-19 Cases in India)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Temba Bavuma Record: बावुमाचे 'मिशन वर्ल्ड रेकॉर्ड'! गुवाहाटीत भारताला हरवून इतिहास रचण्याची संधी, जे कुणालाच नाही जमलं ते करुन दाखवणार

नावेलीत मांस दुकानात गायीचे कापलेले शिर आढळल्याने खळबळ, दुकानदाराला अटक, नंतर जामिनावर सुटका; काय नेमकं प्रकरण?

लहानग्या 'अमूर फाल्कन'ची थक्क करणारी भरारी! एका दिवसात 1000 किमी प्रवास करुन रचला नवा कीर्तिमान; वन्यजीव संशोधकही हैराण

Dacoity Case Goa: तोंडावर मास्क, हातात शस्त्र, घरातल्यांना केली जीवघेणी मारहाण; बायणात सव्वाकोटींचा ऐवज घेऊन 8 दरोडेखोर पसार

New Rent Rules: भाडेकरु आणि घरमालकांसाठी 'नवीन रेंट करार नियम 2025' लागू, वाद मिटवण्यासाठी विशेष न्यायालये; वाचा काय आहेत नवे नियम?

SCROLL FOR NEXT