Goa vegetable production increase Dainik Gomantak
गोवा

Goa: गोव्यातील भाजी उत्पादनात मोठी वाढ; राज्याला आत्मनिर्भरतेकडे पाऊल; बेळगावातून येणाऱ्या आवकीत दरदिवशी तब्बल 40 टनची घट

Goa Horticulture Corporation: राज्‍यातील भाजी उत्‍पादनात गेल्‍या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्‍याने बेळगावातून दरदिवशी फलोत्‍पादन महामंडळाला मिळणाऱ्या भाजीत ४० टनने घट झाली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: राज्‍यातील भाजी उत्‍पादनात गेल्‍या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्‍याने बेळगावातून दरदिवशी फलोत्‍पादन महामंडळाला मिळणाऱ्या भाजीत ४० टनने घट झाली आहे. दुसरीकडे, इंधन दरवाढीमुळे खुल्‍या बाजारातील भाज्‍यांच्‍या दरांत वाढ झाली असली, तरी फलोत्‍पादनच्‍या भाज्‍यांचे दर मात्र नियंत्रणात आहेत. त्‍यामुळे सर्वसामान्‍य जनतेला दिलासा मिळाला आहे.

‘‘राज्‍यातील भाजी उत्‍पादनाला चालना देण्‍याचे प्रयत्‍न राज्‍य सरकारकडून सातत्‍याने होत आहेत. त्‍यामुळे युवा पिढी कृषी क्षेत्राकडे आकर्षित होत असून, त्‍यांच्‍याकडून विविध प्रकारच्‍या भाज्‍यांच्‍या उत्‍पादनाला प्राधान्‍य देण्‍यात येत आहे. भाजी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्‍या वाढल्‍यामुळे उत्‍पादन क्षेत्रही वाढले आहे.

हे शेतकरी भाज्‍या फलोत्‍पादन महामंडळाला देत असतात. त्‍यामुळे गेल्‍या काही महिन्‍यांत बेळगावातून फलोत्‍पादन महामंडळाला मिळणाऱ्या भाजीत दरदिवशी ४० टनची घट झाली आहे’’, अशी माहिती महामंडळाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक चंद्रहास देसाई यांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली. ‘‘पूर्वी फलोत्‍पादन महामंडळ बेळगावमधून प्रत्‍येक दिवशी ११० ते १२० टन

इंधन दरवाढीमुळे खुल्‍या बाजारातील भाज्‍यांचे दर वाढले आहेत. परंतु, फलोत्‍पादन महामंडळाने भाज्‍यांच्‍या दरांवर नियंत्रण ठेवले आहे. मात्र, राज्‍याला भाज्‍यांचा पुरवठा करणारे कंत्राटदार वाहने भाड्याने घेतात. त्‍यामुळे इंधन दरात सातत्‍याने वाढ झाल्‍यास फलोत्‍पादनच्‍या भाज्‍यांच्‍या दरांतही काही प्रमाणात वाढ होऊ शकते.

- चंद्रहास देसाई, व्‍यवस्‍थापकीय संचालक, फलोत्पादन महामंडळ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT