LLB admission scam Principal Silva Dainik Gomantak
गोवा

LLB Admission Scam: पुत्रप्रेमाचा ‘तो’ कारनामा सिल्‍वा यांना भोवला

दोघांनीही मडगाव सोडून दुसरीकडे जाऊ नये आणि परवानगीशिवाय महाविद्यालयात पाऊल ठेवू नये- व्यवस्थापन

गोमन्तक डिजिटल टीम

LLB Admission Scam पुत्रप्रेमाने आंधळे होऊन बीए-एलएलबी प्रथम वर्ष प्रवेशाची पद्धतीच बदलणारे कारे विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साबा दा सिल्‍वा यांना तसेच या कृत्‍यात त्‍यांना सहकार्य केल्याचा आरोप असलेले ग्रंथपाल आनंद साळवे या दोघांनाही निलंबित करण्‍याचा आदेश आज या महाविद्यालयाची शिक्षण संस्‍था विद्या विकास मंडळ यांच्‍या कार्यकारी समितीने जारी केला.

यासंदर्भात विद्या विकास मंडळ लवकरच तज्ज्ञांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून शिस्तभंग कारवाई करण्यासाठी सुनावणी सुरू करणार आहे.

तोपर्यंत या दोघांनीही मडगाव सोडून दुसरीकडे जाऊ नये आणि व्यवस्थापनाच्या आगावू परवानगीशिवाय महाविद्यालयात पाऊल ठेवू नये, अशी ताकीद दिली आहे. गाेवा विद्यापीठाने दिलेल्‍या निर्देशानुसार ही कारवाई करण्‍यात येत आहे.

बारावीत कमी गुण मिळालेल्‍या आपल्‍या मुलाला या अभ्‍यासक्रमासाठी प्रवेश मिळणे सुकर व्‍हावे, यासाठी डॉ. दा सिल्‍वा यांनी गुणवत्ता यादी तयार करताना फक्‍त प्रवेश परीक्षेत मिळालेले गुणच गृहीत धरण्‍याचा एकतर्फी निर्णय घेतला होता.

तसेच या परीक्षेच्‍या प्रश्‍नपत्रिका त्यांनी स्‍वत:च तयार केली होती. या प्रश्‍नपत्रिकांचे उत्तर पेन्‍सिलने लिहायची विद्यार्थ्यांना सक्‍ती केली.

त्‍यानंतर आपल्‍या मुलाच्‍या उत्तरपत्रिकेतील गुणांमध्‍ये फेरफार केल्‍याचा आरोप त्यांच्यावर असून गोवा विद्यापीठाने डॉ. सविता केरकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली नेमलेल्‍या समितीने केलेल्‍या चौकशीत हे सर्व मुद्दे उजेडात आले आहेत.

विद्या विकास मंडळाने आज जारी केलेल्‍या निलंबनाच्‍या आदेशात चौकशी समितीने दिलेल्‍या अहवालात काही गंभीर मुद्यांकडे लक्ष वेधले असून त्‍यानुसार कारवाई करण्‍याचा आदेश व्‍यवस्‍थापनाला दिला आहे.

विद्यापीठाच्‍या आदेशानुसार यासंबंधी व्‍यवस्‍थापन चौकशी समिती नेमून शिस्‍तभंग कारवाई करणार असल्‍याचे म्‍हटले आहे.

प्राचार्यांना बडतर्फ करा : एनएसयूआय

प्राचार्य साबा दा सिल्‍वा यांनी शिक्षकी पेशाशी प्रतारणा केली असून ते या पदावर पुन्‍हा येण्‍यास लायक नाहीत. त्‍यामुळे केवळ निलंबनाची कारवाई न करता त्‍यांना बडतर्फच करावे, अशी मागणी ‘एनएसयूआय’चे अध्‍यक्ष नौशाद चौधरी यांनी केली आहे.

हे कृत्‍य करताना त्‍यांनी जे बेकायदेशीर मार्ग अवलंबले, ते गुन्‍हेगारी स्‍वरूपात मोडणारे असल्‍याने त्‍यांच्‍या विरोधात विद्या विकास मंडळाने पोलिसांत फौजदारी तक्रार दाखल करण्‍याची गरज आहे. व्‍यवस्‍थापनाने अशी तक्रार त्‍वरित दाखल करावी, अशी मागणी चौधरी यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारतासाठी टेन्शन फ्री बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदीवरील कडक निर्बंध केले शिथिल; जागतिक बाजाराला दिलासा

Smart Meter Scheme: स्मार्ट वीज मीटरवर मानवाधिकार आयोगाचा हिरवा कंदील; तरी गोव्यात योजना तूर्तास स्थगितच

Horoscope: नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची कृपा! मेष ते मीन, 12 राशींचे आजचे राशिभविष्य; कोणाला मिळणार धनलाभ?

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

SCROLL FOR NEXT