Goa Live Updates | Goa Rain Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Updates : गोव्यात 'रेड अलर्ट' जारी; तिलारी धरण ओव्हरफ्लो, सतर्कतेच्या सूचना

हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा; पुढील 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता

दैनिक गोमन्तक

साळावली धरण पूर्ण भरले आहे.

तिलारी धरण 77%

हणजुणे धरण 30%

इतर धरणे अजून ओव्हरफ्लो झाले नाहीत. तरी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांकडून गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तिलारी धरण ओव्हरफ्लो; जिल्हाधिकार्‍यांकडून सतर्कतेच्या सूचना

तिलारी धरण ओव्हरफ्लो झाल्याने जिल्हाधिकार्‍यांच्या शापोरा नदीकाठच्या पेडणे, डिचोली व बार्देश तालुक्यातील गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी आपत्तीग्रस्तांच्या मदतीकरता यावेळी क्षेत्रानुसार संपर्क क्रमांक ही देण्यात आहेत.

मदतीसाठी संपर्क

तिसवाडी : 0832-2225611, बार्देश : 0832-2262038, डिचोली : 0832-2362058, पेडणे : 0832-2201142, सत्तरी : 0832-2374090

Tilari Dam Overflow

गोव्यातील 1,461 चौरस किमी क्षेत्र पश्चिम घाट पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने एक मसुदा अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये गोव्यातील 1,461 चौरस किलोमीटर क्षेत्र पश्चिम घाट पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र (ESA) म्हणून ओळखले जाणार आहे.

गोवेकरांच्या आपत्कालीन सेवेसाठी सरकार सज्ज; आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे संपर्क क्रमांक जारी

"गोव्यात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली. नागरिकांना पूरग्रस्त भागात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. राज्यातील नागरिकांना कोणत्याही आपत्कालीन स्थितीत मदत आवश्यक वाटल्यास संपर्क साधा असा संदेश आज गोवेकारांना एसएमएसच्या माध्यमातून पाठवण्यात आला आहे.

नियंत्रण कक्षांशी संपर्क साधाण्यासाठी राज्य 08322419550, उत्तर गोवा 08322225383, दक्षिण गोवा 08322794100. गोवा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे सार्वजनिक हितासाठी जारी केलेले."

केपेचे मामलेदार 'ऑन धी टोज'

मामलेदारांनी पुराच्या पाण्यात शिरत पुरबाधितांना काढले बाहेर

केपेचे मामलेदार प्रताप गावकर याना धडाडीचे अधिकारी म्हणून ओळखले जाते. अडचणीला धावून जाणारे अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते. काल केपे येथे कुशावती नदीला पूर आला आणि लोकांना आपत्कालीन मदत देण्याची वेळ आली तेव्हा त्यांची धडाडी आणखी एकदा दिसून आली.

रावाभाट केपे येथे पुराच्या पाण्याच्या विळख्यात दोन घरे सापडली त्यावेळी मागचा पुढचा विचार न करता गावकर हे सरळ पुराच्या पाण्यात आत शिरून त्यांनी आत घरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात पुढाकार घेतला. लोकांना मदत करण्यात ते रात्रभर 'ऑन धी टोज' म्हणतात तसे कार्यरत होते. त्यांचा हा व्हिडिओ भलताच व्हायरल झाला आहे.

पुरामुळे घरात अडकलेला मृतदेह अग्निशमन दलाने काढला बाहेर

केपे: गुडी पारोडा ते काराळीपर्यंत तसेच मडगाव ते केपे हा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने पारोडा येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यात काल रात्री पारोडा येथील जेष्ठ नागरिक गजानन पडियार यांचे निधन झाल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मडगाव स्मशानभूमीत नेण्यासाठी अखेर समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्याशी संपर्क साधला. व अग्निशामक दलाच्यामदतीने मृतदेह बाहेर काढला व मृतदेहावर मडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

आज दिवसभरात गोव्यात पावसाचा धुमाकूळ

आज सकाळ पासून गोव्यात पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. हवामान विगाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी 8.30 ते सायंकाळी 4.30 पर्यंत पेडण्यात 2.63, म्हापशात 1.57, मडगावात 1.53 , मुरगावात 1.06 इंच पाऊस. जुने गोवेत 24.5 आणि पणजीत 19.5 इंच पावसाची नोंद झालेली आहे.

आपत्कालीन स्थिती उदभवल्यास आपल्याशी थेट संपर्क साधा - विश्वजीत राणे

सत्तरीतील पावसाच्यास्थितीवर उपजिल्हाधिकारी नजर ठेवून आहेत. हवामान खात्याने जारी केलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर सत्तरी आणि उसगांवातील लोकांनी गरजेशिवाय बाहेर पडू नये. तसेच स्वतःची काळजी घ्यावी. कोणती ही आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास आपल्याशी थेट संपर्क साधावा असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे त्यांनी केले आहे.

 काळी नदीवरील कद्रा धरणाचे तीन दरवाजे उघडले

कारवार मधील काळी नदीवरील कद्रा धरणाचे तीन दरवाजे आज उघडले.पाणी नदी त्यापासून पांच मीटर अंतरावरून वाहू लागले आहे मात्र घरे नदी त्यापासून सुमारे पन्नास मीटर अंतरावर असल्याने सध्य स्थितीत कोणत्या ही घरांना धोका नाही. परिणामी, नदी किनाऱ्यापासून पाच मीटर अंतरावर वाहू लागली आहे. यावर स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की, या भागात पूर येण्याचा धोका नाही.

रावाभाट केपे येथील दोन कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी हलविले

रावाभाट केपे येथे दोन कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. कुशावती नदीला पूर आल्याने नदीच्या काठावर असलेल्या दोन घरांना पाण्याने वेढले होते.

रावाभाट येथे राहणाऱ्या दोन मुस्लिम कुटुंबियांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील कुटुंबियांना धोका निर्माण झाला होता याची माहिती केपेचे मामलेदार प्रताप गावकर यांना मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन कुटुंबियांना घराबाहेर सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला असता हे कुटुंबीय बाहेर येण्यास तयार नव्हते त्यांना मामलेदार गावकर यांनी स्थानिक नगरसेवक फिलू डीकॉस्ता यांच्या सहकार्याने समजावून अखेर सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.

एमईएस कॉलेज परिसरात एक गंभीर जखमी

मुसळधार पावसामुळे एमईएस कॉलेज परिसरात सिद्धार्थ कॉलनीतील एका निवासी संकुलाची कंपाऊंड वॉल कोसळली. या घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल

पावसाचा कहर! बेतीमधील भाड्याच्या घराची भिंत कोसळली; सुदैवाने जीवितहानी नाही

मुसळधार पावसामुळे बेती येथील सौझा कॉम्प्लेक्स शेजारील घराची भिंत कोसळली. या घरात संजित वागळे हे भाड्याने राहत होते. भिंत कोसळली त्यावेळी ते घरातच होते. अचानक मोठा आवाज झाल्याने ते धावत बाहेर गेले, आणि सुदैवाने त्यांचा जीव वाचला. यामध्ये त्यांना कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा; पुढील 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता

उत्तर आणि दक्षिण गोव्यात अति मुसळधार पाऊस येत्या 5 दिवसांपर्यंत सुरू राहील. 8 जुलै रोजी दोन्ही जिल्ह्यांमध्ये 1-2 ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. नागरिकांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

  • उत्तर गोव्यात पावसाने हाहाकार माजवला असून म्हादई नदी दुथडी भरुन वाहत आहे. भातशेती पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

  • खारेबांद ते तळेबांद पर्यंत जाणार रस्ता पाण्याखाली

  • मुसळधार पावसामुळे म्हापशातील गिरी भागातील शेती पाण्याखाली गेली आहे. पावसाचं पाणी भरल्याने म्हापसा परिसरातील घरांना पाण्याचा वेढा बसला आहे.

  • अवेडे येथील देसाई वाडा येथे पूरपरिस्थिती

  • बैलपार नदीला पूर आल्यामुळे जलस्त्रोत खात्याचा पंपहाऊस पाण्याखाली गेला आहे. पेडणे परिसरात तुफान पाऊस झाला असून भातशेतीमध्ये पाणी घुसलं आहे.

हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा; पुढील 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता

उत्तर आणि दक्षिण गोव्यात अति मुसळधार पाऊस येत्या 5 दिवसांपर्यंत सुरू राहील. 8 जुलै रोजी दोन्ही जिल्ह्यांमध्ये 1-2 ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. नागरिकांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

तिलारी धरणातून विसर्ग सुरु..

तिलारी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तिलारी धरणातून पेडणे, म्हापसा अशा ठिकाणी पाणीपुरवठा करण्यात येतो. आधीच गोव्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यात तिलारीतून विसर्ग सुरू केल्यामुळे गोव्यातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तिलारी धरण उद्यापर्यंत ओव्हरफ्लो होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या दोन्ही राज्यांतील गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Water Release from Tilari Dam

मडगावच्या सत्र न्यायालयाच्या आवारालाही तळ्याचे स्वरूप

मडगावच्या प्रथम वर्ग न्यायालयात पाणी भरल्याने वकिलांनी कागदाच्या होड्या सोडल्याचे वृत्त ताजे असतानाच आज शुक्रवारी सकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे सत्र न्यायालयाच्या आवारालाही तळ्याचे स्वरूप आल्याने अशील आणि वकील यांची तारांबळ उडाली.
या न्यायालयात संपूर्ण दक्षिण गोव्यातील प्रकरणे चालत असून त्यात फौजदारी स्वरूपाच्या सुनावण्या अधिक असतात. त्यामुळे पोलीस या पाण्यातून वाट काढीत आरोपींना न्यायालयात आणत असल्याचा आणखी एक व्हिडिओ आज व्हायरल झाला.

Water in the premises of Madgaon Sessions Court

गोव्यात मागील 24 तासात एकूण किती मिलीमीटर पाऊस झाला?

म्हापसा : 171 मिमी

पेडणे : 120.8 मिमी

फोंडा : 147 मिमी

पणजी : 151.3 मिमी

जुने गोवे : 168.6 मिमी

साखळी : 84.8 मिमी

वाळपई : 116.4 मिमी

काणकोण : 213.8 मिमी

दाबोळी : 193.8 मिमी

मडगाव : 188.6 मिमी

मुरगाव : 180.8 मिमी

केपे : 180.8 मिमी

सांगे : 233.4 मिमी

धुव्वाधार पावसाने साळावली धरण भरले

पर्यटकांचे आकर्षण असलेले साळावळी सांगे येथील धरण पूर्णपणे भरले असून सकाळी 10.55 वाजता ते ओसंडून वाहू लागले. 41 मीटर उंच हे धरण असून आज शुक्रवारी सकाळी पाण्याने ही उंची गाठली. हे धरण भरून वाहू लागल्यावर त्याच्यातून उडणारे तुषार पाहणे हे विहंगम दृश्य असते. हे तुषार पाहण्यासाठी हजारो स्थानिक आणि पर्यटक या धरणाला भेट देत असतात.

मुसळधार पावसाने कुशावतीला पुन्हा पूर

केपे येथील कुशावती नदीला पूर आला असून पारोडा येथे पुलावरून पाणी वाहू लागल्याने रस्ता आणि नदीचे पाणी समान पातळीवर आले आहे. या पाण्याचा प्रवाह प्रचंड असून या मुळे या नदीच्या काठावर असलेल्या पारोडा आणि अवेडे या गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे.

'रेड अलर्ट'मुळे राज्यात आपत्कालीन यंत्रणा सज्ज

संभाव्य धोका लक्षात घेत सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये गोवा पोलीस, हॉस्पिटल, ॲम्बुलन्स, अग्नीशमन दल, वीज तसेच पीडबल्यू अशा सर्वच स्तरातील यंत्रणांचा समावेश आहे.

मुसळधार पावसामुळे गोवेकरांची तारांबळ

हवामान विभागाने काल केलेल्या सूचनेप्रमाणे आज 8 जुलै रोजी राज्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आज सकाळपासूनच मुसळधार पावसाने आपली उपस्थिती दर्शवली आहे. राज्यभरामध्ये धो-धो पावसाने गोवेकरांची तारांबळ उडाली आहे.\

रेड अलर्ट जारी केल्यामुळे कुणीही कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, अशी सूचना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. त्याचप्रमाणे इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आज आणि उद्या अशी दोन दिवस सुट्टी देखील देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT