Goa Live Updates 24 December 2023 | Goa Breaking News  Dainik Gomantak
गोवा

Goa Updates 24 December: गोव्यातील दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी घ्या जाणून...

Goa News 24 December 2023: पणजी, म्हापसा, मडगाव तसेच महत्वाच्या शहरातील न्यूज...

Kavya Powar

केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करणारे गोवा पहिले राज्य

भाजप सरकारने संपूर्ण देशभरात नागरिकांच्या सोयीसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये 'हर घर नल से जल', 'हर घर शौचालय', 'हर घर वीज' या योजनांबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गोव्यातही अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत.

यापैकी 13 योजना उपक्रमात देशभरातील लहान व मोठ्या राज्यांमध्ये सुमारे दहा योजना यशस्वीपणे राबविणारे गोवा हे पहिले राज्य ठरले आहे.

झुआरी पुलाच्या आठही लेन वाहतुकीसाठी खुल्या!

झुआरी पूल आता पूर्ण क्षमतेने कार्यरत झाला असून पुलाच्या आठही लेन वाहतुकीसाठी खुल्या झाल्या आहेत. या पुलामुळे राज्यातील वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होईल.

म्हैशींचा कळप अडकला दलदलीत, एका म्हशीचा मृत्यू!

अडवई सत्तरीत शांतादुर्गा मंदिराच्या पाठीमागे सुमारे 10 म्हशींचा कळप दलदलीत अडकला. एका म्हशीचा मृत्यू. वाळपई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल.

गोव्यातील भाज्यांचे आजचे दर

बाजारातील भाजीचे दर

  • कोबी ३०

  • गाजर ५०

  • फ्लॉवर ४०

  • मिरची ७०

  • बटाटा ४०

  • कांदा ५०

  • टोमॅटो ४०

  • लसूण ३५० ते ४००

  • आले १५०- १८०

फलोत्पादनाचे दर

  • कोबी २१

  • गाजर ३८

  • फ्लॉवर २९

  • हिरवी मिरची ५०

  • कांदा ३५

  • बटाटा २८

  • टोमॅटो ३५

  • लसूण ३६३

  • आले १५०

पर्यावरणीय क्षेत्र- वन्यजीव- मानव; साहचर्य राखण्याची नितांत गरज

गोव्यात एकीकडे व्याघ्र प्रकल्पाचा मुद्दा गाजत असून दुसरीकडे वन्यजीव मानवी वस्तीत घुसण्याच्या घटना देखील वाढत आहेत. मागील काही दिवसांत मुळगावात दहशत माजविणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं होत.

हल्लीच धारबांदोडा पंचायत क्षेत्रात ब्लॅक पँथरचे दर्शन झाले होते. या घटनेला काही काळ गेल्यावर केपे मोरपिर्ला परिसरात दोन बिबट्यांनी दहशत माजवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

नाताळ आणि नववर्षासाठी गोवा सज्ज; तरूणाईचा उत्साह शिगेला

गोव्यात नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी झाली असून अवघ्या काही तासात विविध चर्च मधून क्राइस्ट्स मास अर्थात येशुच्या जन्मानिमित्त करण्यात येणारी सामूहिक प्रार्थना म्हटली जाऊन नाताळ सण साजरा करण्यात येणार आहे.

सर्वत्र नाताळाची लगबग सुरू झाली असून विद्युत रोषणाईच्या माळा, ख्रिसमस ट्री, सांताचे मुखवटे, स्नोबॉल, टोप्या, गोठे आणि रंगीबेरंगी चांदण्या यांनी चर्च आणि ख्रिस्ती बांधवांची घरं फुलून गेलेली पाहायला मिळत आहेत.

गोवेकरांनो सावधान! कोरोना वाढतोय, 'अशी' घ्या काळजी...

हिवाळ्यात अनेक आजारांचा वेगाने प्रसार आपल्याला दिसतोय. त्यातच सध्या कोरोनाने डोकं वर काढलाय. गोव्यात काल शनिवारी म्हणजेच 23 डिसेंबरला 10 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालीय.

गोव्यात काही दिवसांपूर्वी जेएन 01 व्हेरिएंटचे 19 रुग्ण आढळून आले होते. केरळनंतर गोव्यात आढळून आलेल्या नव्या व्हेरिएंटच्या रुग्णांमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण होते. मात्र, सर्व रुग्ण ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने म्हटले होते.

असं असलं तरी या सीझनमध्ये ख्रिसमस, नववर्षासारखे उत्सव साजरे करताना प्रत्येकाने आवश्यक ती खबरदारी घेणं आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT