Goa Live Updates | Goa Breaking News Dainik Gomantak
गोवा

Goa Updates: ताळगावमधील कृष्णा कुट्टीकर खून प्रकरणातील चारही आरोपींची निर्दोष मुक्तता

Goa Breaking News: उत्तर गोवा, पणजी, दक्षिण गोवा आणि महत्वाच्या शहरातील ब्रेकिंग न्यूज

Kavya Powar

ताळगावमधील कृष्णा कुट्टीकर खून प्रकरणातील चारही आरोपींची निर्दोष मुक्तता 

२०१९ मध्ये ताळगाव येथील कृष्णा कुट्टीकर खूनप्रकरणातील चारही आरोपी जॅक ऑलिव्हेरा, कमरेश कुंडईकर, मनिष हडफडकर व गौरीश गावस बांदोडकर यांना पणजी अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.

आरोपींनी कृष्णा कुट्टीकर याच्यावर तलवारीने वार केला होता. त्यात त्याचे मनगट तुटले होते. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला होता.

टेकडीवरील वादग्रस्त रस्त्याची परवानगी रद्द; पोंबुर्फा-ओळावली ग्रामसभेत ठराव

पोंबुर्फा-ओळावली ग्रामस्थांनी रविवारी एकमताने एकोशी येथील वादग्रस्त रस्त्याच्या बांधकामासाठी दिलेल्या परवानगी रद्द करण्याचा ठराव केला. जो २००९मध्ये पंचायत मंडळाने मंजूर केला होता. तसेच नगर नियोजन, वन व सीआरझेडला पत्र लिहिण्याचे ठरविले. याशिवाय गामस्थांनी मेगा प्रकल्पांना परवानगी न देण्याचा तसेच जंगल व टेकड्यांच्या र्‍हास होऊ न देण्याचा ठराव घेतला.

वेलिंग प्रियोळ कुंकळ्ये ग्रामसभा तापली, पंचायत मंडळाला ग्रामस्थांनी धरले धारेवर

ग्रामसभा व्हिडिओग्राफी, कचरा कर, हाऊस टॅक्स तसेच मंगेशी महामार्ग नजिक बेकायदा पोलजी मेगा कन्स्ट्रक्शन विषयावरून वेलिंग प्रियोळ कुंकळ्ये पंचायतीची रविवारी झालेली ग्रामसभा बरीच तापली.

ग्रामसभा व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हावी ही ग्रामस्थांची मागणी पंचायत मंडळाकडून नाकारण्यात येत होती, परंतु, पंचायतीचे ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते गौरेश गावडे यांनी डायरेक्टरेट ऑफ पंचायतचे सह संचालक पांगम यांनी स्वतः आपल्या तोंडून, कोणीच ग्रामस्थांना चित्रीकरण करण्यास अडवू शकत नाही असे म्हटल्याचे यावेळी सांगण्यात आले.

हॉकीत झारखंडकडून यजमान गोव्याचा पराभव

गोव्यात आयोजित 37व्या राष्ट्रीय खेळ 2023 मधील हॉकी स्पर्धा सोमवारपासून सुरू झाली. 7 नोव्हेंबरपर्यंत खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत आज हॉकी झारखंडच्या महिला संघाने यजमान गोव्याचा 4-0 असा पराभव केला. पेडे, क्रीडा संकुलातील हॉकी मैदानावर हा सामना रंगला.

National Games 2023

महिला सक्षमीकरणासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने महिलांची बाइक रॅली काढण्यात आली. दक्षिण गोवा जिल्हा युवक काँग्रेसने रविवारी हिरवा झेंडा दाखवून महिलांची बाइक रॅली काढली. काँग्रेसच्या देशव्यापी उपक्रम 'शक्ती - सुपर शी' या कार्यक्रमाचा हा एक भाग आहे.

Women Bike Ride

मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात; एक महिला ठार, सहाजण जखमी

मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला असून, यात एक महिला ठार झाली आहे. तर, अन्य सात जण जखमी झाले आहे. जखमींना वैद्यकीय उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आहे.

रविवार 29 ऑक्टोबर रोजी महाड तालुक्यातील नांगलवाडी परिसरात पिकअप टेम्पो दुभाजकाला धडकून सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला.

कुलवंती अशोक राऊत (वय 60, रा. मुठवाली महाड) असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

तर, सुहास मधुकर साळवी, अरुण लक्ष्मण चोरगे, ज्ञाननंदकुमार मेहता, नंदिनी नंदकुमार पालव, शीतल सुभाष राऊत, अमोल अनंत रेशीम सर्व राहणार मूठवली महाड हे सहाजण जखमी झाले आहेत.

मयांक चाफेकरची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्ण कामगिरी!

आशियाई क्रीडा स्पर्धेत दुखापतीमुळे चमक दाखवू न शकलेल्या मॉडर्न पेंटॅथलॉनपटू मयांक चाफेकरने आगामी ऑलिम्पिक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये सहा सुवर्ण आणि एक कांस्य अशी लक्षवेधी कामगिरी करणा-या मयांकचा महाराष्ट्राच्या पदकभरारीत महत्त्वाचा वाटा आहे. नुकत्याच चीनमध्ये झालेल्या एशियाडमध्ये त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

मुरगांव पालिकेची धडक कारवाई, २ दुकानांना ठोकले टाळे!

ट्रेड लायसनशिवाय चालणाऱ्या वास्कोतील २ दुकानांना मुरगांव पालिकेने ठोकले टाळे. आणखीनही काही दुकानांना ट्रेड लायसन नसल्याची नगराध्यक्ष गिरीश बोरकरांची माहिती. २५० पेक्षा जास्त दुकानांची लायसन्स फी भरण्यात आलेली नाही.

बोरीत 'Hit And Run'; तर फोंड्यात साखर कारखान्याजवळ तीन ट्रकचा अपघात

बायथाखोल - बोरी येथे रविवारी रात्री हिट अ‍ॅन्ड रनचा प्रकार समोर आला आहे. तर सोमवारी सकाळी संजीवनी साखर कारखान्यासमोर तीन मालवाहू ट्रकचा अपघात झाला आहे. या दोन्ही अपघातांमध्ये चालक जखमी झाले असून त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरु आहेत.

डिचोलीतील सामाजिक आरोग्य केंद्रात आवश्यक डॉक्टर आदी सुविधा उपलब्ध करा. काँग्रेसची मागणी. आरोग्याधिकाऱ्यांना निवेदन सादर. सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा इशारा.

Bicholim Health centre

गोवा हँडबॉल असोसिएशनने याचिका मागे घेतली

गोवा हँडबॉल असोसिएशनने याचिका मागे घेतली. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या स्पर्धा आयोजन तात्रिक समितीने गोव्यात राष्ट्रीय स्पर्धेत हँडबॉल व बीच हँडबॉल खेळासाठी संघ निवडीस दिली परवानगी. त्यासदर्भातील माहिती असोसिएशचे वकील गौरांग पाणंदीकर यांनी दिली.

Domino's Pizza च्या वास्को येथील दुकानाला आग; Video Viral

हॉकी सामन्यांना सुरुवात!

म्हापसा पेडे मैदानावर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या हॉकीच्या सामन्यांना सुरुवात. हळदोणेचे आमदार कार्लुस फेरेरा आणि व्हेन्यू कमांडंट सुधीर केरकरांच्या उपस्थितीत शुभारंभ.

Hockey
National Games 2023

गोव्याची आर्थिक स्थिती नाजूक! राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा घेण्याबाबत तज्ञ काय म्हणाले?

राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असताना 500 ते 600 कोटी रुपये खर्चाच्या राष्ट्रीय स्पर्धा राज्यात भरवणे, हे गोव्यासारख्या छोट्या राज्यासाठी हितावह नाही. कारण हा संपूर्ण खर्च राज्य सरकारला सोसावा लागेल, असे मत आर्थिक क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केले आहे.

गोव्यातील स्पर्धेसाठी, स्पर्धा नियोजनामध्ये सुरुवातीला 300 कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला होता. राज्य सरकारने आपल्या अर्थसंकल्पात अडीचशे कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. मात्र हा खर्च 600 कोटी रुपये पर्यंत जाईल, असा प्राथमिक अंदाज आहे.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गोव्यात दाखल झाले आहेत. मंत्री मॉविन गुदिन्होंनी केलं राजनाथ सिंहांच दाबोळी विमानतळावर स्वागत.

Rajnath Singh

जलतरण स्पर्धेत गोव्याचा संघ अंतिम फेरीत

३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जलतरणात महिलांच्या ४ बाय १०० मीटर मेडली रिलेत गोव्याचा संघ अंतिम फेरीत. संघात निरंजनी बोर्डे, श्रीजा गाड, सौरभी नाईक, अलाका ब्रिटो यांचा समावेश.

National Games Swimming Competition

पोलिस खात्यातील उपनिरीक्षक प्रदीप कुबल यांचे डिचोलीत निधन. मॉर्निंग वॉकवरून परतताना कोसळले. हृदय विकाराचा झटका. एक उत्कृष्ट नाट्य आणि भजनी कलाकार म्हणून परिचीत होते. मूळ खोकरल-महाराष्ट्र येथील मयत कुबल कुटुंबासहित डिचोलीत स्थायिक झाले होते

Police Death

व्याघ्र प्रकल्प प्रकरण: मुख्य याचिकाकर्ता गोवा फाऊंडेशनने आज उच्च न्यायालयासमोर नमूद केले की या न्यायालयाने दिलेली मुदत संपली आहे तरीही गोवा सरकारने म्हादई वन्यजीव अभयारण्य व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित केलेले नाही, बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

गोव्यातील बिट्स पिलानी कॅम्पस सर्व विद्यार्थ्यांसाठी होणार खुला

BITS पिलानी के के बिर्ला गोवा कॅम्पसची 20 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने गोव्यातील शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना BITS पिलानी कॅम्पस खुला केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना येथील सुविधांचा अनुभव घेण्यासह आणि संशोधन प्रकल्प पाहता येणार आहेत.

20 वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर संस्था वर्षभरात विविध कार्यक्रम आयोजित करणार आहे. 1 नोव्हेंबर ते 31 ऑक्टोबर 2024 या काळात यात सहभागी होता येईल.

13 टनाची बस दातांनी ओढण्याचा विश्वविक्रम नावावर असणारे 'सुमित' राष्ट्रीय क्रीड स्पर्धेत लगोरीला देणार प्रोत्साहन

 कधी काळी गल्ली आणि रस्त्यावर खेळल्या जाणाऱ्या लगोरी खेळाचा ऑलिम्पिकमध्येही समावेश करण्यात आला आहे. याला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी, झारखंडच्या पलामूच्या लगोरी असोसिएशनचे सचिव सुमित वर्मन 37 राष्ट्रीय खेळांमध्ये लगोरी खेळाला प्रोत्साहन देतील. 37 राष्ट्रीय खेळांमध्ये भाग घेण्यासाठी पलामूचा खेळाडू प्रथमच गोव्यात येणार आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र संघाने पार केली पदकांची सेंच्युरी! अव्वल स्थान मजबूत

तळागाळातील मराठमोळ्या युवा शिलेदारांनी प्रचंड मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर सर्वोत्तम कामगिरीतून महाराष्ट्र संघाचे ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकांचे शतक साजरे केले. आपल्या पदकांची मोहीम अबाधित ठेवताना महाराष्ट्र संघाने रविवारी १०६ पदकांचा पल्ला गाठला.

यामध्ये ४६ सुवर्णांसह २९ रौप्य आणि ३१ कांस्यपदकांचा समावेश आहे. राज्यातील ४१ युवा शिलेदार हे सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. महाराष्ट्र संघाने या शतकी पदकांसह पदकतालिकेतील आपले अव्वल स्थान अधिक मजबूत केले.

‘पेंचाक सिलाट’ मधल्या सुवर्णपदकाचे 'सिक्रेट' काय? करिना म्हणतेय...

पेंचाक सिलाट खेळातील करिनाचे सोनेरी यश गोव्यासाठीही ऐतिहासिक ठरले. काही महिन्यांपूर्वीच ‘पेंचाक सिलाट’ खेळात दाखल झालेल्या करिनाने भरपेट आणि आवडीचे अतिखाणे टाळले. सारे लक्ष खेळावर केंद्रित केले आणि त्याद्वारे ती विजेतेपदापर्यंत प्रगती साधू शकली.

करिनाची आई सेबत या खूपच आनंदित होत्या. त्यांनी सांगितले, की ‘करिना फूडी आहे. मात्र ‘पेंचाक सिलाट’ शिबिरात दाखल झाल्यानंतर राष्‍ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक जिंकायचेच या जिद्दीने ती पेटून उठली. आपल्या खाण्याच्या सवयींवर तिने कठोर बंधने आणली. आहाराच्‍या बाबतीत ती काटेकोर राहिली. करिनाचे वडील राजेश शिरोडकर हे ‘रियल ग्रुप’चे संचालक आहेत.

मंत्री श्रीपाद नाईक म्हणतात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी विचारात घेतले नाही...

गोव्यात सुरु असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भ्रष्टाचाराचा आरोप विरोधकांनी केला असताना, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी गोवा ऑलिम्पिक संघटनेने (GOA) स्पर्धेच्या तयारीसाठी त्यांना विश्वासात घेतले नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

फातोर्डा मैदानावर गुरुवारी 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी मैदानातून स्वयंपूर्ण फेरीतून प्रेक्षकांना अभिवादन करण्यात आले. स्वयंपूर्ण फेरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजप गोवा युनिटचे अध्यक्ष व राज्यसभा खासदार सदानंद तानावडे यांना स्थान देण्यात आले होते.

पणजीत पुढील आठवड्यात धावणार 22 ईव्ही बसगाड्या

स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत कदंब परिवहन महामंडळाला पहिल्या टप्प्यात मिळालेल्या 22 ईव्ही बसगाड्या पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहेत.

राजधानीतील सात मार्गांवर या बसगाड्या धावणार आहेत, तर दुसरीकडे महामंडळाने सुरू केलेल्या ‘माझी बस योजने’ला उत्तर गोव्यातून काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती महामंडळाचे चेअरमन उल्हास तुयेकर यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT