Car Fire Dainik Gomantak
गोवा

मोरजीत जमावाच्या मारहाणीत मनोरुग्ण तरुणाचा मृत्यू; कांदोळीत कार जळून खाक गोव्यातील ठळक बातम्या

Goa News Updates: दिवाळी, नरकासूर, इफ्फी आणि शव दर्शन सोहळ्याची तयारी, पर्यटन, दूधसागर वाद यासह राज्यात दिवसभर विविध श्रेत्रात घडणाऱ्या ताज्या घडामोडी.

Manish Jadhav

कांदोळीत कार जळून खाक, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

कांदोळीत GA 03 W 6201 क्रमांकाची कार जळून खाक झाली आहे. राफेल पीटर फर्नांडिस यांच्या मालकीची ही कार असल्याची माहिती समोर आली आहे. पिळर्ण अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. यात कोणीही जखमी झाले झाले नाही.

दूधसागर जीप टुर ऑपरेटर्सच्या समस्यांवर मुख्यमंत्री काढणार तोडगा!

सावर्डे भाजप मंडळ अध्यक्ष विलास देसाई, दीपक पाऊस्कर, विनय तेंडुलकर यांच्यासह कुळे दूधसागर जीप टुर ऑपरेटर्सचे सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतली भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांची भेट. तानावडेंची यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी सकोल चर्चा. मुख्यमंत्री यासंदर्भात लवकरच तोडगा काढणार असल्याचे आश्वासन. दुधसागर पर्यटन हंगाम २ नोव्हेंबर पासून सुरू होण्याची शक्यता.

म्हापसा येथे काजू दुकानात चोरी, वीस हजारांचा मुद्देमाल लंपास

म्हापसा येथे काजू दुकानात चोरीची घटना उघडाकीस आली असून, वीस हजारांचा मुद्देमाल लंपास झाला आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून, अधिक तपास सुरु आहे.

Goa Rain: डिचोलीत पावसाचं धूमशान, दिवाळीच्या उत्साहावर फेरले पाणी

पावसाचा पुन्हा कहर. विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह डिचोलीत वादळी पावसाची हजेरी. भर दिवाळीच्या दिवशी उत्साहावर पावसाचे पाणी. बाजार विस्कळीत. विक्रेत्यांची उडाली तारांबळ.

मोरजीत जमावाच्या मारहाणीत मनोरुग्ण तरुणाचा मृत्यू

मोरजी येथे जमावाच्या मारहाणीत जखमी झालेला नितेश सदानंद परब (वय वर्ष 38) या मनोरुग्ण तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मांद्रे पोलिसांकडून तपास सुरु. मंगळवारी रात्री घटना घडली होती.

नोकरीसाठी पैसे मागणाऱ्यांपासून सावधान; मुख्यमंत्र्यांचे गोमंतकीयांना आवाहन

राज्यात नोकरी देण्याच्या बहाण्याने गोमंतकीयांच्या फसवणूकीचे प्रकरणे सातत्याने समोर येतायेत. याचीच दखल घेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नोकरीसाठी पैसे मागणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

धक्कादायक! पर्वरीत 18 वर्षीय तरुणीचा दुमजली इमारतीवरुन पडून मृत्यू

पर्वरी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 18 वर्षीय तरुणीचा दुमजली इमारतीच्या टेरेसवरुन पडून मृत्यू झाला.

Anjuna Fire: हणजूण येथे भूमिका मंदिराजवळील घराला भीषण आग, 2 लाखांचे नुकसान; जीवीतहानी टळली

हणजूण येथील भूमिका मंदिराजवळील एका घराला रात्री काल (30 ऑक्टोबर) 11.53 च्या सुमारास आग लागली. सब ऑफिसर डी. एस. सावंत यांच्या नेतृत्वाखालील म्हापसा अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी पोहोचले. आग यशस्वीपणे आटोक्यात आणण्यात आली. आगीत कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही. आगीत तब्बल 2 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

समुद्रकिनाऱ्यावर गैरव्यवहार करणाऱ्या 16 जणांना अटक; गोवा पोलिसांची कारवाई

पर्यटक पोलीस आणि कळंगुट पोलीस यांनी बागा ते सिक्वेरीपर्यंत राबवलेल्या विशेष मोहिमेत समुद्रकिनारी गैरप्रकार करणाऱ्या 9 दलाल आणि 7 महिला फेरीवाल्यांना अटक करण्यात आली.

Narkasur: नरकासूराचे कर्णकर्कश डीजे संगीत, जेष्ठ नागरिकांना मनस्ताप!

गोवा मानवाधिकार आयोगाने तंबी देऊनही पणजी, ताळगांव परिसरात रात्री 11 नंतर नरकासूरांच्या नावाने कर्णकर्कश डीजे संगीत सुरुच. पणजी, ताळगांवतील काही जेष्ठ नागरिकांवर रात्री झोपण्यासाठी इतरत्र जाण्याची वेळ. पोलिसांच्या भूमिकेवर अनेकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT