Goa Live Updates 31 December 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa News Updates 31 December: 2023 वर्षाचा शेवटचा दिवस विविध घटनांनी गाजला, वाचा एका क्लिकवर

Goa Breaking News 31 December 2023: पणजी, म्हापसा, मडगाव तसेच राज्यातील महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज...

Kavya Powar

सांगे वरकटो येथे भरधाव कारची विजेच्या खांबाला धडक; एकजण गंभीर

सांगे वरकटो येथे भरधाव अल्टो कार विजेच्या खांबाला धडकल्याची घटना रविवारी रात्रौ 10. 15 च्या सुमारास घडली. या कारमधून चौघेजण प्रवास करतअसल्याची माहिती समोर आलीय. या अपघातात कारमधली 10 वर्षांची मुलगी जखमी झाली असून तिला उपचारासाठी स्थानिकांनी सांगे आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. चालक किरकोळ जखमी झाला आहे.

खोर्ली ओल्ड गोवा येथे एका परप्रांतीयांची हत्या

खोर्ली ओल्ड गोवा येथे एका परप्रांतीयांची हत्या झाल्याची खळबळजनक माहिती समोर येतेय. ही व्याकळती आसामची असून सध्या भाडेतत्वावर खोली घेऊन ते खोर्ली ओल्ड गोवा येथे राहत असल्याचे समजतेय. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास सुरु आहे.

सरकार, प्रशासनाला सुबुद्धी दे - भोमा ग्रामस्थांनी घातले गाऱ्हाणे

भोमा गावातून महामार्ग गेल्यास काही लोकांची घरे, दुकाने तसेच ग्रामदेवतेच्या देवळाला धोका पोहोचण्याची ग्रामस्थांना भीती असून सरकारी अधिकारी ग्रामस्थांनी पर्याय दिलेला असतानाही अधिकारशाही चालवत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

या सर्वातून सुटका व्हावी तसेच देवस्थान आणि घरांना नुकसान पोहोचू नये यासाठी सरकारी अधिकारी, स्थानिक आमदार व पर्यायाने सरकारला सुबुद्धी द्यावी यासाठी भोमा येथील ग्रामस्थानी आज भोमा येथील नागझरकर देव तसेच फार्मागुडी येथील कटमगाळ दादाला गाऱ्हाणे घातले.

म्हापसा-शिवोली रस्त्यावर अपघातात दुचाकीस्वार जखमी

म्हापसा-शिवोली मार्गावरील झेवियर कॉलेज रोडवर इलेक्ट्रिक दुचाकी आणि अँप टॅक्सी मध्ये अपघात झालाय.

 सरकारी कार्यक्रमांवरचा बेहिशेबी खर्च थांबवा

गोव्यावरील एकूण कर्ज 35 हजार कोटींवर गेले आहे. त्यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी IANS शी बोलताना, राज्य सरकारने विशेषत: सरकारी कार्यक्रम, प्रचार आणि रोड शोवर होणारा फालतू खर्च थांबवावा, असा टोला लगावला आहे.

गोव्याचे कर्ज 35 हजार कोटींवर; राज्यातील प्रत्येक नागरीकावर 2.2 लाख रुपयांचा बोजा

गोव्याला दोन वर्षांनंतर कर्ज घेण्याची गरज भासणार नाही, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नऊ महिन्यांपूर्वी सांगितले होते. तथापि, आता गोव्यावरील एकूण कर्ज 35 हजार कोटींवर गेले आहे. त्यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

झर्मे सत्तरी येथील दोन गरीब कुटूंबांना आमदार देविया राणे यांनी बांधून दिली घरे...

झर्मे सत्तरी येथील निकीता गावस आणि विमल गावस या दोन गरीब कुटुंबांचे जुने मातीचे घर पडले होते. पंचांकडून ही माहिती पर्येच्या आमदार देविया राणे यांना कळल्यावर त्यांनी यात पुढाकार घेत स्वतःच्या पैशातून एका महिन्यात दोन घरे बांधून दिली आहेत. नुकतीच ही घरे गावस कुटूंबियांना सुपूर्द करण्यात आली.

कळंगुट-बागा पर्यटकांनी फुलले; पण गर्दी गतवर्षीपेक्षा निम्मीच...

गोव्यातील सुप्रसिद्ध बीच असलेल्या बागा आणि कळंगुट येथील किनारे नववर्षाच्या पार्श्वभुमीवर गर्दीने फुलले असले तरी ही गर्दी गतवर्षीपेक्षा अर्धीच आहे, असे मत येथील व्यावसायिक व्यक्त करत आहेत. नियमित येणाऱ्या पर्यटकांमध्ये घट झाल्याचे व्यावसायिकांचे मत आहे.

रविवारी नवीन वर्षाच्या रात्री कळंगुटमध्ये लोकांची गर्दी होण्याची अपेक्षा आहे. पण, या इयर एंडला तुलनेत कमी गर्दी दिसून येत आहे, असे पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक सांगतात. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

50 दिवस उलटले तरी दाबोळीत अजूनही इंधन गळती सुरूच..

दाबोळी चिखली माटवे व्हडले भाट परिसरात 50 दिवस पूर्ण होण्यास आले तरी, झुआरी इंडियन ऑईल अदानी वेन्चर कंपनीचे भूमिगत इंधन वाहिनीतील पेट्रोल-डिझेल मिश्रित इंधन अजूनही मोठ्या प्रमाणात सापडत आहे. त्यामुळे व्हडले भाट परिसरातील विहिरी व शेत जमिनी प्रदूषित झाल्या आहे.

मोरजी किनारी सागरी कासवाने दिली 98 अंडी

मोरजी किनारी ध्वनी प्रदूषणाचा मारा सहन करत 27 रोजी एका सागरी कासवाने 98 अंडी घातली. त्याला वन्य विभागाने सुरक्षा दिलेली आहे. या किनाऱ्यावर संगीत पार्ट्यांवर निर्बंध असूनही त्या सुरूच असतात.

मुख्यमंत्र्यांनी गोमंतकीयांना दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी समस्त गोवेकरांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कोलवामध्ये पश्चिम बंगालच्‍या पर्यटकाचा दुर्दैवी अंत! अनैसर्गिक मृत्‍यूची नोंद

गोव्यात फिरण्यासाठी आलेल्या पश्‍चिम बंगालमधील एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मयत पर्यटकाचे नाव दीपू चौधरी (४०) असे आहे. हा पर्यटक कोलवा येथील टुरिस्‍ट गेस्‍ट हाउसमध्‍ये उतरला होता.

गोव्यातील पेट्रोल-डिझेलच्या किमती...

North Goa ₹ 98.08

Panjim ₹ 98.08

South Goa ₹ 97.41

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.62

Panjim ₹ 90.62

South Goa ₹ 89.97

वेळेतच ‘सनबर्न’चे पॅकअप; मात्र वाहतूक कोंडीचा त्रास

ध्वनी नियंत्रणासाठी कार्यरत असलेल्या पथकाने पहिल्याच दिवशी मुख्य मंचावरील कार्यक्रम बंद पाडून दणका दिल्यानंतर उर्वरित दोन दिवसांत आवाजाची मर्यादा ओलांडण्याचे धाडस ‘सनबर्न’ आयोजकांनी केले नाही. गेल्या 17 वर्षांत अशा कारवाईला सामोरे जावे लागले नसल्याने निर्ढावल्याचे वातावरण होते, त्याची हवा या कारवाईने काढली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT