Goa Live Updates 30 January 2024 Dainik Gomantak
गोवा

Goa Updates 30 January 2024: दिवसभरतील घडामोडी वाचा एका क्लिकवर

Goa Breaking News 30 January 2024: पणजी, म्हापसा, मडगाव तसेच राज्यातील महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज

Kavya Powar

श्रीरामावर अपेक्ष पोस्ट केल्याप्रकरणी केरी सत्तरीतील एकाला अटक

श्रीरामावर अपेक्ष पोस्ट केल्याप्रकरणी केरी सत्तरी येथील अल्पवयीन युवक अल्फाज खान याला अटक, अपना घरमध्ये त्याची रवानगी करण्यात आली आहे.

राष्ट्रपती भवनासह अनेक राज्यांकडून पर्पल फेस्टची दखल

राष्ट्रपती भवनासह अनेक राज्यांकडून पर्पल फेस्टची दखल. राष्ट्रपती भवन देखील अशाप्रकारचे फेस्ट आयोजित करण्याच्या भूमिकेत- फळदेसाईंची माहिती

राज्यात कॉंग्रेसचा दिशाहीन कारभार, माझ्या विरुद्ध कटकारस्थान!

राज्यात कॉंग्रेस पक्षाचा दिशाहीन कारभार. माझ्या विरुद्ध पक्षात कटकारस्थान. लोकसभा निवडणुक लढविण्याची इच्छा बोलून दाखवूनही स्क्रिनींग कमिटीच्या बैठकीला मला मुद्दाम डावलण्यात आले. कॉंग्रेस नेते एल्विस गोम्स यांचा पक्षाला घरचा आहेर.

डिकाॅस्‍ता चांगले काम करीत असल्याने विरोधक अस्वस्थ

केपे मतदारसंघात आमदार एल्टन डिकाॅस्‍ता चांगले काम करीत असल्याने विरोधक अस्वस्थ झाले आहेत व त्‍यामुळेच त्यांच्या कामामध्ये ते व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते युरी अलेमाव यांनी केला.

ते आंबावली येथे आयोजित आधार कार्ड अपडेट शिबिराच्या कार्यक्रमावेळी बोलत होते. यावेळी त्यांच्याबरोबर आमदार एल्टन डिकाॅस्‍ता उपस्थित होते.

स्तनांच्या कॅन्सरवर 'फेसगो' हे इंजेक्शन मोफत- आरोग्यमंत्री

गोवा मेडिकल कॉलेज 4 फेब्रुवारीपासून स्तनांच्या कॅन्सरवरील 'फेसगो' हे इंजेक्शन मोफत देणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिलीय. त्यांनी केलेल्या या महत्वाच्या घोषणेमुळे रुग्णांसाठी दिलासादायक चित्र तयार झाले आहे

गांजा तस्करी प्रकरणी एकाला अटक!

ग्राहकाला गांजा पुरविण्यासाठी आलेल्या संशयित आरोपी इब्राहिम पस्तुनी (45, पर्वरी) याला कळंगुट पोलिसांकडून अटक. संशयिताजवळ 92 हजार रुपयांचा 920 ग्रॅम गांजा सापडला.

मोठी बातमी! मडगावात सापडलेल्या 'त्या' बेवारस मुलांच्या आईचा शोध लागला; मात्र...

मडगावमध्ये गेल्या आठवड्यात दोन मुलांना बेवारसरित्या सोडून देण्यात आले होते. यानंतर त्यांच्या पालकांचा शोध घेणे सुरू होते. अखेर हे गूढ आता उलगडले असून एक महिला मडगाव पोलिसांसमोर हजर झाली असून तिने मुलांची आई असल्याचा दावा केला आहे.

पंतप्रधान मोदींच्या सभेला किती लोक आणणार? मंडळ अध्यक्षांनी सांगितली संख्या

भाजप निवडणूक प्रभारी आशिष सूद यांच्याकडून पंतप्रधान मोदींच्या बैठकीचा आढावा. किती लोक सभेला आणणार? मंडळ अध्यक्षांनी सांगितली संख्या. मडगाव- 4 हजार, शिरोडा, नुवे आणि फातोर्ड्यातून प्रत्येकी तीन हजार. मुख्यमंत्र्यांच्या साखळी मतदारसंघातून 800 तर वाळपई आणि पर्येतून प्रत्येकी 500 लोकांची मंडळ अध्यक्षांनी दिली आकडेवारी.

एफसी गोवासमवेत मध्यरक्षक बोर्हा हेर्रेराचा सराव

एफसी गोवाचा नवा स्पॅनिश मध्यरक्षक बोर्हा हेर्रेराने संघासमवेत सराव सुरू केला आहे, परंतु गुरुवारी (ता. 1) हैदराबाद येथे होणाऱ्या हैदराबाद एफसीविरुद्धच्या आयएसएल सामन्यात तो बेंचवर राहण्याचे संकेत मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी दिले.

आशिष सूद यांनी साधला भाजप कार्यकर्त्यांशी संवाद! 

भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी आशिष सूद यांनी आज (30 जानेवारी) कार्यकर्त्यांची बैठक घेतली. कार्यकर्त्यांना जाणून घेण्यासाठी त्यांनी सर्वांशी संवाद साधला. तसेच 6 फेब्रुवारीला पंतप्रधानांच्या होणाऱ्या विकसित भारत यात्रेला यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचा सल्ला सूद यांनी कार्यकर्त्यांना दिला.

जत्रोत्सवानिमित्त वीजमंत्री सुदिन ढवळीकरांनी देव बोडगेश्वरांचे दर्शन घेतले.

गोव्यात होणार भाजपचे नवे सुसज्ज भव्य कार्यालय!

फोंडा-पणजी राष्ट्रीय महामार्गाशेजारी चिंबल येथे होणार भाजपचे नवे सुसज्ज आणि आधुनिक कार्यालय होणार. बांधकामासाठीच्या कायदेशीर बाबी पूर्ण. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या हस्ते होणार पायाभरणी. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडेंची माहिती.

गोव्यातील दोन आस्थापनांना कारणे दाखवा नोटीस

प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमाचे पालन न केल्यामुळे गोव्यातील दोन आस्थापनांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही कारवाई केली केली आहे.

मंडळाने गोव्यातील दोन संस्थांसह भारतभरातील एकूण 688 संस्थांना पुढील कृती करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

रावण-सत्तरी येथे शाळकरी मुलीच्‍या अपहरणाचा प्रयत्न

रावण-सत्तरी येथे सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलीचे अपहरण करण्‍याचा प्रयत्‍न झाल्‍याची तक्रार तिच्या पालकांनी केरी-सत्तरी पोलिस चौकीत दाखल केली आहे. रावण येथील सरकारी प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीत शिकणारी दक्षा दामोदर शेटकर ही मुलगी शनिवारी सकाळी 8 वाजता शाळेत गेली.

गोव्यातील इंधनाच्या किमतीत बदल; वाचा आजचे ताजे दर...

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.54

Panjim ₹ 97.54

South Goa ₹ 97.11

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.10

Panjim ₹ 90.10

South Goa ₹ 89.68

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chandra Grahan: 2025 मधलं भारतातलं पहिलं आणि अंतिम चंद्रग्रहण; कधी आणि कुठे दिसेल जाणून घ्या..

Green Cess Goa: धक्कादायक! 178 कोटींचा हरित कर थकीत; जिंदाल, झुआरी, अदानी, वेदान्‍तासह 26 कंपन्‍या थकबाकीदार

Rashi Bhavishya 28 July 2025: खर्च नियंत्रीत ठेवा, आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी ठेवा; कुटुंबात आनंदाचे क्षण येतील

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

SCROLL FOR NEXT