CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

गोवा-बेळगाव रस्त्याचे काम 5 महिन्यात पूर्ण होणार, लवकरच भाडेकरु पडताळणी कायदा अंमलात येणार; गोव्यातील ठळक बातम्या

28 November 2024 Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या घडामोडी

Akshata Chhatre

गोव्यात विदेशी चित्रपट चित्रीकरणासाठी 'सिंगल विंडो क्लिअरन्स' : मुख्यमंत्री

विदेशी चित्रपट निर्मात्यांनी गोव्यात चित्रीकरणासाठी यावे. आम्ही त्यांना 'सिंगल विंडो क्लिअरन्स' देऊ. इफ्फी समारोप सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची घोषणा.

वाळपईत पार्क केलेल्या दुचाकींना ट्रकची धडक!

वाळपई, सत्तरी बाजार इमरातीसमोर पार्क करुन ठेवलेल्या पीकअप ट्रकची दोन दुचाकींना धक्का. सुदैवाने जिवितहानी टळली.

गोवा भाडेकरु पडताळणी २०२४ कायद्याची १ डिसेंबरपासून अंमलबजावणी

गोवा भाडेकरु पडताळणी २०२४ कायद्याची १ डिसेंबरपासून अंमलबजावणी होणार आहे. गेल्या विधानसभा अधिवेशनात याबाबत कायदा मंजूर करण्यात आला होता. राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि त्यात परराज्यातील नागरिकांचा सहभाग विचारात घेता या कायद्याची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले होते. सर्व आमदारांनी एकमताने या कायद्याला समर्थन दिले होते.

ढवळीकरांनी दिल्या फडणवीसांना शुभेच्छा!

वीज मंत्री सुदीन ढवळीकरांनी देवेंद्र फडणवीसांचे केले अभिनंदन. विविध राजकीय विषयांवर दोघांनी केली चर्चा. (Sudin Dhavalikar Meets Devendra Fadanvis)

IFFI Goa 2024: इफ्फीत अवतरला शिगमोत्सव

५५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या परेडमध्ये पारंपारिक सांस्कृतिक वारसा लाभलेल्या 'शिगमोत्सवाचे' सादरीकरण.

वायंगण बायपास रोडच्या बांधकामासाठी जमिनीचे हस्तांतरण

मंत्रिमंडळाच्या निर्णय: वायंगण, मये बायपास रोडच्या बांधकामासाठी सरकारी जमीन हस्तांतरित करण्याची मुख्यमंत्र्यांची माहिती.

ध्वनी प्रदूषण केल्याने हणजूणमधल्या रेस्टॉरंटवर गुन्हा दाखल

परवानगीशिवाय मोठ्या आवाजात संगीत वाजवल्याप्रकरणी हणजूण पोलिसांनी माजलवाडो, हणजूण येथील रेस्टॉरंटविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 Fraud Case: 420 प्रकरणात आणखीन दोघांना अटक

मडगाव येथील रहिवाशाच्या तक्रारीवरून पोलिसांनी बाळा नंदेश्वर राव आणि शांती बाळा राव यांच्यावर कलम 420 अन्वये गुन्हा दाखल केला. दोघांनी अमेरिकेत नोकरी देण्याच्या बहाण्याने पैसे लुबाडले होते.

Goa Belgavi Road: गोवा-बेळगाव रस्त्याचे काम एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण होणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

गोवा-बेळगाव रस्ता तसेच तीनई घाट पट्ट्याचे काम एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे. तसेच, संबंधित डाव्हर्जन रस्त्यांची दुरुस्ती आणि देखभालीचे कामही कंत्राटदारांकडून सुरु असल्याचे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.

ई-सिगारेट बाळगल्याबद्दल रशियन नागरिकाविरुद्ध गुन्हा दाखल

वैध कागदपत्रांशिवाय ई-सिगारेट बाळगल्याबद्दल मोपा विमानतळ पोलिसांनी बुधवारी एका रशियन नागरिकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Mahanand Naik: दुपट्टा किलर महानंद नाईकची उच्च न्यायालयात याचिका

'दुपट्टा किलर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महानंद नाईकने तुरुंगातून सुटका नाकारण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT