आंध्रप्रदेशात पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमस्थळी शॉक लागून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरु

PM Modi In Andhra Pradesh: मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
15-Year-Old Dies at PM Modi’s Event in Andhra Pradesh
PM Modi IN Andhra PradeshPM Modi X - Handle
Published on
Updated on

आंध्रप्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमस्थळी शॉक लागून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. कुरनूळ जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमासाठी आरक्षित केलेल्या वाहनतळाच्या ठिकाणी ही घटना घडली. विविध विकास कामांच्या उद्धाटनासाठी मोदी आज (१६ ऑक्टोबर) आंध्र प्रदेशात आहेत.

कुरनूळ पोलिसांनी याबाबत एका इंग्रजी वृतपत्राला दिलेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय मुलगा ध्वज फडकविण्यासाठी हातात लोखंडी पाईप घेऊन आला होता. त्याच्या हातातील या पाईपचा विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने मुलाचा मृत्यू झाला. मुलगा पाईप उचलून धरण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

15-Year-Old Dies at PM Modi’s Event in Andhra Pradesh
PM Modi Diwali Celebration With Jawan's: ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा जल्लोष! पंतप्रधान मोदी गोव्यात नौदलाच्या सैनिकांसोबत साजरी करणार यंदाची दिवाळी

मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. कुरनूळ जिल्ह्यातील मुनागालापाडू गावातील तो रहिवासी होता. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करुन, तपास सुरु केला आहे.

15-Year-Old Dies at PM Modi’s Event in Andhra Pradesh
Inspirational Story: पुत्र व्हावा ऐसा... मुलाने आई - बाबांसाठी अमेरिकेत खरेदी केले आलिशान घर, कार; US दर्शनही घडवले Watch Video

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (गुरुवारी) आंध्रप्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्धाटन करण्यात आले. तर, अनेक कामांचे भूमिपूजन करण्यात आले. 

मोदींनी उद्धाटन केलेल्या विकासकामांमध्ये औद्योगिक क्षेत्र, वीज, रस्ते, रेल्वे वाहतूक, संरक्षण क्षेत्र आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस क्षेत्रातील कामांचा समावेश आहे. मोदींनी गुरुवारी १३,४३० कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com