गोव्याचा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुवर्णपदक विजेता बाबू गावकर याने भारतासाठी मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम रविवारी साधला.
नेपाळमधील काठमांडू येथे झालेल्या यूआयपीएम ग्लोबल लेझर रन सिटी टूर स्पर्धेत तो अग्रेसर ठरला. 8 मिनिटे 35 सेकंद वेळेसह त्याने सीनियर गटात अव्वल क्रमांक मिळविला.
डिचोलीत स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी स्वामी श्रीकांतानंदजी आणि महेशात्मानंदजी प्रमुख उपस्थित होते.
पंचायत सचिव निकिता परब यांच्या मनमानी कारभारामुळे काणका वेर्लाच्या ग्रामसभेत आज रविवारी ग्रामस्थ संतप्त झाले होते. यावेळी खवळलेल्या सभेला शांत राहण्याची विनंती सरपंच आरती च्यारी यांना करावे लागले.
निकीता परब यांची बदली करावी, अशी मागणी ग्रामस्थ सागर लिंगुडकर आणि इतर ग्रामस्थांनी केली. या वेळी उपसरपंच दिगंबर कळंगुटकर, वासुदेव कोरगांवकर सचिव निकीता परब उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य आणि कर्नाटक राज्यामधून प्रत्येकी दोन बॉम्ब शोध आणि निकामी पथके गोव्यात दाखल झाली आहेत.
जुने गोवे येथील नोव्हेनास, सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्त आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप समारंभाच्या पार्श्वभूमीवर घातपाती कारवाईंचा शोध घेण्यासाठी गोवा पोलिसांना ती मदत करणार आहेत, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली.
काणकोण तालुक्यातील लोलये ग्रामसभेत प्रस्तावित फिल्मसिटी प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध दर्शवला. उपस्थित 206 लोकांपैकी बहुतेकांनी विरोध दर्शविला आहे. डेनिस फर्नांडीस यांच्याकडून विरोधाचा प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न झाला.
मात्र नंतर प्रस्तावित फिल्मसिटीबाबत चर्चा करण्यासाठी खास ग्रामसभा बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
माझ्या भावाबाबत फिरत असलेल्या वृत्तांमुळे आम्ही कुटूंबीय दुःखी आहोत. ही घटना वैयक्तिक पातळीवर घडलेली आहे. यात रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचा काहीही संबंध नाही. कायदेशीर कारवाईत ढवळाढवळ करणार नाही. दोषी असेल त्याला शिक्षा मिळेलच.
अशा घटनांमध्ये माझा भाऊ असो वा इतर कुणीही अशा घटनांचे समर्थन करता येत नाही, असे मत आमदार वीरेश बोरकर यांनी व्यक्त केले आहे.
बोरकर यांच्या बंधुविरोधात एका महिलेने मारहाणीची तक्रार दाखल केली आहे.
डिचोली क्रिकेट क्लबने पणजी जिमखान्याच्या बांदोडकर करंडक बाद फेरी क्रिकेट स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावताना अंतिम लढतीत इक्बाल इलेव्हनवर ६८ धावांनी मात केली. विजेत्या संघाचा आलम खान अंतिम सामन्याचा मानकरी ठरला.
मॉन्सून परतून बरेच दिवस उलटून गेले असले तरी पुन्हा एकदा अवकाळी पावसाने राज्यात हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 27 नोव्हेंबरपर्यंत जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 1 ऑक्टोबरपासून आजअखेर 9.10 इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे.
वीज,पाणी,रस्ते,ध्वनी प्रदुषणावर मोरजी ग्रामसभेत गरमागरम चर्चा.आमदार जीत आरोलकरांची ग्रामसभेला उपस्थिती.खणलेले रस्ते त्वरीत बुजवावेत. मधलावाडा मोरजी येथे स्व.आमदार काशिवाथ शेटगांवकरांचा पुतळा उभारण्याबाबत ठराव संमत.
भोमा सरपंच आणि आंदोलकांच्या गटात वाद. शेवटी भोमा पंचायतीने महामार्ग रुंदीकरणाच्या विरोधात घेतला ठराव. केंद्र सरकार आणी सार्वजमीक बांधकाम खात्याला पाठवणार पत्र. मुख्यमंत्र्यांचीही घेणार भेट. सरपंच दामू नाईकांची ग्रामसभेत घोषणा.
महामार्ग विस्तारीकरणासाठी पाडण्यात येत असलेल्या घरांबाबत स्पष्टता न दिल्याने भोमा ग्रामस्थांनी सरपंच दामू नाईक यांना घेरले. सरकार ग्रामस्थांशी खोटे बोलत असून पंचयातीला याची जाणीव आहे का? ग्रामस्थांचा ग्रामसभेत सवाल.
वेर्ला काणका पंचायतीच्या सचीव निकीता परब यांची पंचायतीतली नेहमीची गैरहजेरी आणि अनियमीत कारभारावर लोक आणि पंचायत मंडळाचा संताप. निकीता परब यांची तात्काळ बदली करण्याची ग्रामसभेत मागणी.
मडगाव, नवेवाडे-वास्को येथे झालेल्या शिवानी राजावत व जयदेवी चौहान यांच्या मृत्यू प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले असून हा घातपात असून त्यामागे शिवानीच्या सासरच्या मंडळींचा हात आहे.
तिचा नवरा नौदलाचा अधिकारी अनुराग याचे दुसऱ्या मुलीशी संबंध होते. तसेच हुंड्यासाठी सासरच्या मंडळींचा छळ सुरू होता.
त्यामुळे या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करून दोषींना कडक शिक्षा करावी, अशी मागणी जयदेवी यांचे पती तथा शिवानीचे वडील दिलीपसिंह चौहान यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे.
पणजी इफ्फी चित्रपट महोत्सवात उपस्थित शेकडो सिनेप्रेमी आणि प्रतिनिधी ‘इफ्फी’च्या ठिकाणी खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवरील खाद्यपदार्थांच्या चढ्या किंमतींबद्दल अतिशय नाराज होते. अनेकांनी नेहमीच्या खाद्यपदार्थांवर अनावश्यक खर्च करण्यापेक्षा बाहेरचे खाणे पसंत केले.
५४ व्या इफ्फी दरम्यान, प्रतिनिधींना जेवण दिले जात नाही, जे मागच्या वर्षी देण्यात आले होते. यंदा आयनॉक्सच्या ठिकाणी खाद्यपदार्थांचे मोजके स्टॉल्स लावण्यात आले होते.
पण समस्या अशी आहे की या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर दाखवल्या जाणाऱ्या नियमित खाद्यपदार्थांची किंमत त्यांच्या वास्तविक किमतीपेक्षा अनेक पटीने जास्त आहे.
म्हादई पाणी वाटप प्रकरणात कर्नाटकने आडमुठे धोरण स्वीकारल्यानंतर गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. याचिकेवरील सुनावणी आता बुधवार 29 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.