मांद्रे येथे नाल्यात विदेशी पर्यटकाचा मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
शिवोलीत 3.5 लाख किंमतीच्या अमली पदार्थासह एकाला अटक करण्यात आली आहे. प्रणय मोरे (मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या छाप्यात संशयिताकडे 1.5 ग्रॅम वजनाचा कोकेन आणि गांजा आढळून आला.
शुक्रवारी (26 जानेवारी) सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सत्तरी तालुक्यातील ऐतिहासिक नाणूस किल्ल्यावर क्रांतिवीर दिपाजी राणे यांना मानवंदना देणार.
‘गोवा अॅग्रीकल्चर मार्केटिंग बोर्डा’ने आर्ले येथील मडगाव मुख्य यार्डाजवळ ‘ग्रामीण मार्केट’ सुरू केले आहे. भाजीपाल्याला चांगला भाव मिळावा आणि शेतकऱ्याला थेट ग्राहकांना भाजी विकता यावी यासाठी हे मार्केट सुरु करण्यात आले आहे.
फिरकी मनीष काकोडे (६-३६) याच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर कर्नल सी. के. नायडू करंडक २३ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात सांगे येथे गोव्याचा केरळवर १२१ धावांनी विजय. २७२ धावांच्या आव्हानासमोर केरळचा दुसरा डाव १५० धावांत आटोपला.
गोमंतकीयांचे श्रद्धास्थान म्हणजे म्हापशातील श्री बोडगेश्वर देवाचा यंदाचा 89वा महान जत्रोत्सव आज बुधवार (24 जानेवारी) पासून सुरू झाला आहे. पुढचे तेरा दिवस ही जत्रा चालणार आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT), कुंकळ्ळी
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स, दोनापावला
कमांडर नेव्ही कॉलेज, बेती
रोप वे पायाभरणी, रेईश मागुश
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, कुडचडे
100 एमएलडी प्लांट सेटिंग, साळावली धरण
3डी इमारत पायाभरणी, पाटो, प्लाझा
सरकारच्या चांगल्या कामांचा प्रचार करण्यासाठी तसेच विविध योजनांची माहिती अंत्योदय घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार सोशल मिडिया 'इन्फ्लुएन्सर्स' ना ऑनबोर्ड घेणार. माहिती आणि प्रसिध्दी खात्यातर्फे सरकारच्या या नव्या योजनेत सामील होण्यासाठी 14 फेब्रुवारीपर्यंत करता येणार अर्ज. फॉलोअर्स व स्बस्क्रायबर्स यांच्या आधारावर होणार निवड.
6 फेब्रुवारी पूर्वी उगवे राष्ट्रीय महामार्गाच्या अगोदर सर्व्हिस रस्ता व्यवस्थित करा, अन्यथा राष्ट्रीय महामार्ग रोखू काँग्रेस गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचा इशारा.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वतः कॉल करून विनंती केली म्हणून गोवा फॉरवर्डचे नेते, आमदार विजय सरदेसाई यांनी अधिकाऱ्यांसह 'कदंब' मधून फातोर्डा मधील रस्त्यांची पाहणी केली. ६ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी विकसित भारत रॅलीसाठी फातोर्डा केटीसी स्टॅण्ड येथे होणाऱ्या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी 2 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणाऱ्या आठव्या गोवा विधानसभेच्या सहाव्या अधिवेशनासाठी पाच खाजगी सदस्य ठराव मांडले आहेत. जर ठराव सभापती रमेश तवडकर यांनी दाखल करुन घेतले तर ते शुक्रवारी 9 फेब्रुवारी रोजी चर्चेसाठी येतील. सोडत पद्दतीने निवडलेल्या खासगी ठरावांची यादी 25 जानेवारी 2024 रोजी जारी केली जाईल.
कारापूर सर्वण पंचायतीची कारापूर येथील पंचायत इमारत पाडून त्याजागी नवीन इमारत उभारण्यात येणार असल्याने सध्या पंचायत कारापूर तिस्क येथे तात्पुरत्या जागेत स्थलांतर करण्यात आली आहे. त्यामुळे आता या पंचायतीचा कारभार कारापूर तिस्क येथे चालणार, अशी माहिती सरपंच दत्तप्रसाद खारकांडे यांनी दिली.
खाण व्यवसायामुळे उद्धवस्त झालेली आमची शेती पूर्ववत सुपीक करून आम्हाला द्या. पिळगावच्या शेतकऱ्यांची मागणी. डिचोलीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन. संयुक्त मामलेदारांनी निवेदन स्वीकारलं .
पैंगीण येथे काल (मंगळवारी) कर्नाटकातील एका तरुणाने भाड्याच्या खोलीत आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत काणकोणचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत गावस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
यंदा गोबी मंचुरियनच्या स्टॉलला पालिकेतर्फे परवानगी नाकारण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गोबी मंचुरियनचे स्टॉल धारक कोणत्याही प्रकारची स्वच्छता न बाळगता खाद्यपदार्थ विक्री करत असतात. त्यामुळे भाविकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता असते.
म्हणूनच आदेशानुसार हे स्टॉलधारक आपला स्टॉल तेव्हाच लावू शकतात जेव्हा त्यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासनाची परवानगी असेल. अन्यथा त्यांना बोडगेश्वराच्या जत्रेमध्ये आपला स्टॉल लावता येणार नाही.
अँजिओप्लास्टि झाल्यानंतर डॉक्टरांच्या देखरेखाली गोमेकॉत विश्रांती घेत असलेले मंत्री बाबूश यांना 'स्मार्ट सिटी' च्या कामांची काळजी दिसून आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळी महानगरपालिका अधिकारी मंत्री बाबूश यांना विचारपूस करण्यासाठी गेले होते.
परंतु यावेळी बाबूश यांनी त्यांच्याकडे स्मार्ट सिटीच्या कामांची विचारणा केली. रविवारी रात्री हृदय विकाराचा हलका झटका आल्याने बाबूश यांना गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.