अंकुर, सुतीर्थ यांचा जलवा, टेबल टेनिसनमध्ये पटकावले विजेतेपद Dainik Gomantak
गोवा

Goa News: अंकुर, सुतीर्थ यांचा जलवा, टेबल टेनिसनमध्ये पटकावले विजेतेपद; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Latest News: कला अकादमीच्या दुरुस्तीसाठी नेमलेल्या टास्क फोर्स शिष्टमंडळाने संकुलाची पाहणी केली. अकादमीत ध्वनी यंत्रणा, बांधकाम, एसी अशा विविध गोष्टीत त्रुटी आढळल्या.

गोमन्तक डिजिटल टीम

अंकुर, सुतीर्थ यांचा जलवा, टेबल टेनिसनमध्ये पटकावले विजेतेपद

आशियाई महिला दुहेरीतील कांस्यपदक विजेत्या सुतीर्थ मुखर्जीने महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले, तर अंकुर भट्टाचार्जीने यूटीटी राष्ट्रीय रँकिंग टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियमवर ही स्पर्धा पार पडली.

'गोवा विद्यापीठात ही पदे भरु देणार नाही'; गोवा फॉरवर्ड पक्षाने घेतला आक्रमक पवित्रा

गोवा विद्यापीठात रिमोट सेन्सिस आणि जीआयएस अभ्यासक्रमासाठी जाहिरात करण्यात आलेल्या पदांबाबत कुलगुरुंनी अद्याप समाधानकारक उत्तर दिले नसल्याचे गोवा फॉरवर्डकडून सांगण्यात आले. पक्षाने

कला अकादमी संकुलातील त्रुटी सुधारणायोग्य : विजय केंकरे

कला अकादमीच्या दुरुस्तीसाठी नेमलेल्या टास्क फोर्स शिष्टमंडळाने संकुलाची पाहणी केली. अकादमीत ध्वनी यंत्रणा, बांधकाम, एसी अशा विविध गोष्टीत त्रुटी आढळल्या असून त्याचा सविस्तर अहवाल बनणार. मात्र या त्रुटी दुरुस्ती होण्यायोग्य आहेत, असे विजय केंकरे यांनी सांगितले.

'जोपर्यंत भूतानी प्रकल्पाची परवानगी रद्द होत नाही तोपर्यंत...'; सांकवाळवासीयांचं बेमुदत उपोषण

भूतानी प्रकल्पाविरोधात सांकवाळवासीयांचा विरोध वाढत चालला आहे. भूतानी प्रकल्पाला चुकीच्या पद्धतीने परवानगी देण्यात आली. सांकवाळवासीय पंचायतीबाहेर बेमुदत उपोषणावर बसले आहेत. जोपर्यंत पंचायत भूतानी प्रकल्पाची परवानगी रद्द करत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

साहित्य अकादमीच्या कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याचा ग्लोबल कोकणी संस्थेचा निर्णय!

साहित्य अकादमीच्या सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याचा ग्लोबल कोकणी, मांड सोबान मंगळुरु संस्थांचा निर्णय. 26 ऑक्टोबर रोजी रवींद्र भवन मडगावच्या बाहेर करणार मूक निदर्शने.

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यात गोव्याने साधली लक्षणीय प्रगती

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी देशपातळीवर गोव्याने लक्षणीय प्रगती केली. गोवा सरकारच्या वतीने सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. त्याचबरोबर तात्काळ प्रकरणांचे निराकरण करण्यात येत आहे.

सरकार टिकवण्याऐवजी जमीन विकतयं, आमदार सरदेसाईंचा घणाघात

'नो मेन लँड' जमिनीवर सरकार प्रकल्पाची योजना आखत आहे. लोक त्याला कडाडून विरोध करतील. गाव आणि लोकांसाठी ते फायदेशीर नसल्याने सरकार जमीन जतन न करता ती विकत असल्याचा घणाघात गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख आणि आमदार विजय सरदेसाई यांनी केला.

नागरी पुरवठा विभागातर्फे राशन दुकानदारांची बैठक; केंद्राच्या सूचनांचे पालन करण्यासाठी घेतला 'हा' निर्णय

नागरी पुरवठा विभागातर्फे राशन दुकानदारांची बैठक आयोजित करण्यात आली. या संवाद मेळाव्यात उत्तर गोव्यातील सुमारे 250 राशन दुकानदार उपस्थित होते. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विभागाने प्रत्येक गावात रास्त भाव दुकाने प्रमाणित कलर कोडमध्ये रंगवण्याचा निर्णय घेतला. असाच मेळावा दक्षिण गोव्यातील रास्त भाव दुकानदारांसाठी 24 ऑक्टोबर रोजी रवींद्र भवन मडगाव येथे आयोजित केला जाणार आहे.

दुधसागर जीप समितीचे माजी अध्यक्ष व इतरांच्या विरोधात पोलिस तक्रार!

जीटीडीसीच्या वाढीव दरामुळे दुधसागर धबधब्यावरील पर्यटक हंगामात घट. ऑनलाईन वेबसाईट आम्हाला पुन्हा देऊन, जीटीडीसी काऊंटर बंद करावा. यापूर्वीच्या समितीने कोणालाही विश्वासात न घेता, वेबसाईट जीटीडीसीला दिल्या बद्दल त्यांच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल करण्यात आलीये अध्यक्ष निलेश वेळीप यांची माहिती.

महाराष्ट्रात भाजपची युती पूर्ण बहुमताने सत्ता स्थापन करणार!! विश्वजित राणे

पक्षाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात निवडणुकीची कामे सुरु आहेत. महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीचे सरकार बहुमताने सत्तेवर येईल कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे काम तळागाळात पाहायला मिळते गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे प्रतिपादन.

पैसे देऊन सरकारी नोकरी मिळवण्याला बळी पडू नये मुख्यमंत्र्यांचे आवाहन

"लोकांनी सतर्क होत पैसे देऊन नोकरी मिळविण्याच्या आमिषांना बळी पडू नये. पूजा नाईक यांना सर्वप्रथम मीच अटक करून दिली होती. ही फसवी लोकं माझ्यासोबत असलेले फोटो सामान्य लोकांना दखवतात व सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून पैसे उकळतात. सरकारी नोकऱ्या अशा मिळत नाहीत." - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.

कर्नाटकातून गोव्यात गोमांसाची तस्करी; मोले चेकपोस्टवर संशयितांना पकडले

कर्नाटकमधून गोव्यात आणले जाणारे गोमांस पोलिसांनी पकडले. इको गाडीतून वाहतूक करताना मोले चेकपोस्टवर कुळे पोलिसांनी दोन संशयीताना गोमांस घेऊन येताना ताब्यात घेतले. कुळे पोलिसांनी पशुसवर्धन खात्याच्या डॉ.चौगुले यांच्या उपस्थित पंचनामा केला.

हरवळे पंचायत निवडणूक निकाल जाहीर; पंचायत मुख्यमंत्र्यांची!!

हरवळे पंचायत निवडणूकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या समर्थकांची सरशी. प्रभाग-१ देमगो मळीक (बिनविरोध), प्रभाग-२ अजय मळीक, प्रभाग-३ ममता दिवकर, प्रभाग-४ गौरवी नाईक आणि प्रभाग-५ मधून अस्मिता मळीक विजयी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार!म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

Rashi Bhavishya 22 November 2024: व्यवसायात चांगला फायदा होईल, प्रेम प्रकरणात यश मिळेल; पण कोणाला?

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

SCROLL FOR NEXT