Naga Chaitanya Sobhita at IFFI Goa Dainik Gomantak
गोवा

Goa News: नागा चैतन्य आणि शोबिताची इफ्फीत ग्रँड एन्ट्री

21 November 2024 Marathi Breaking News: गोव्यात घडणाऱ्या ताज्या घडामोडींच्या अपडेट्स

Akshata Chhatre

नागा चैतन्य आणि शोबिताची इफ्फीत ग्रँड एन्ट्री

आजकाल चर्चेत असणाऱ्या दक्षिणी चित्रपटांमधील नावाजलेला चेहरा, नागा चैतन्य याने वडील नागार्जुन, होणारी बायको शोबिता आणि संपूर्ण परिवारासोबतआयनॉक्स पणजी येथे रेड कार्पेटवर हजेरी लावली.

इफ्फीच्या रेड कार्पेटवर अवतरली फौजी-2 ची टीम

गौहर खानसोबत गुरुवारी (दि. 21 नोव्हेंबर) रोजी टीम फौजी-2 ने रेड कार्पेटवर हजेरी लावली.

पर्यावरणीय मान्यता देण्यास प्राधिकरणाचा नकार, कायदेशीर रेती उत्खननाला होणार पुन्हा विलंब!

पारंपारीक पद्धतीने कायदेशीर रेती उत्खननाला होणार पुन्हा विलंब. जिल्हा सर्वेक्षण अहवालात (डीएसआर) रेती काढण्यासाठीचे झोन आणि गावांचा घोळ. राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाकडून पर्यावरणीय मान्यता देण्यास नकार. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आणि खाण संचालनालयाला डीएसआर पुन्हा नव्याने करण्याचा प्राधिकरणाचा आदेश.

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र पार्थिवाची भव्य मिरवणूक

सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र अवशेष बॅसिलिका ऑफ बॉम जिझस ते से कॅथेड्रल चर्चपर्यंत मिरवणुकीतून नेण्यात आले. आता पुढील ४५ दिवस हे अवशेष प्रदर्शन सोहळ्यासाठी ठेवले जाणार आहेत.

शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी डिचोलीत बैठक

पिळगावमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बैठक घेतली जात आहे. डिचोलीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात सध्या ही बैठक सुरु आहे. बैठकीसाठी शेतकरी आणि 'वेदांता'च्या अधिकाऱ्यांसह खाण खात्याचे अधिकारी उपस्थित आहेत.

भारतीय पॅनोरमा फीचर फिल्मचे ज्युरी रेड कार्पेटवर दाखल

भारतीय पॅनोरमा फीचर फिल्मचे ज्युरी 55 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) च्या रेड कार्पेटवर आयनॉक्स पणजी येथे दाखल झाले आहेत.

काणकोण येथे चारचाकीचा भीषण अपघात; एक विदेशी पर्यटक गंभीर जखमी

देवबाग, काणकोण येथे एका अपघाताची नोंद झाली असून या अपघातात चारचाकी झाडावर आदळल्याने पलटी झाली. अपघातापूर्वी आगोंद-पाळोले जंक्शनजवळ याच गाडीने दोन विदेशी पर्यटकांना धडक दिली होती ज्यात एक विदेशी पर्यटक गंभीर जखमी झाला होता.

गोव्यात संत झेवियर यांच्या शव प्रदर्शनाला सुरुवात

गोव्यात गुरुवार (दि. २१ नोव्हेंबर) पासून संत फ्रान्सिस झेवियर यांच्या शव प्रदर्शन सोहळयाला सकाळी ९:३० पासून सुरुवात झाली आहे.

बंगळूरु-मंगळूरु महामार्गावरील भीषण अपघातात पर्वरीतील दोन सख्खे भाऊ ठार!

बंगळूरु-मंगळूरु महामार्गावरील मंड्या येथे फॉर्चूनर कार आणि लॉरीचा भीषण अपघात. आल्तो पर्वरी येथील रोस आणि डॅरील हे सख्खे भाऊ ठार. अन्य दोघे जखमी. चौघेही गोव्याहून कोइम्बतूरला जात होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT