कुचबिहार करंडक 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत गोव्याच्या गोलंदाजांसाठी सामन्याच्या पहिला दिवस कठीण ठरला. अवेस खान याच्या खणखणीत 140 धावांच्या बळावर मुंबईने पहिला डाव शुक्रवारी 9 बाद 403 धावांवर घोषित केला.
आग्रा ते सुरत, गोवा, डेहराडून आणि गुवाहाटी या शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती आग्रा विमानतळ सल्लागार समितीच्या बैठकीत देण्यात आली. सध्या आग्रा येथून सहा शहरांसाठी उड्डाणे सुरू आहेत.
इंडिगो एअरलाइन्सच्या दररोज 2,000 उड्डाणांचे लक्ष्य पूर्ण झाल्याबद्दल आग्रा विमानतळावर केक कापून साजरा करण्यात आला.
ओल्ड गोव्यातील बॉम जीझस बॅसिलिका चर्च येथे सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्त 25 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2023 या कालावधीत होणार आहे. 25 नोव्हेंबर रोजी नोव्हेनास सुरू होईल, आणि 4 डिसेंबर रोजी वार्षिक फेस्त साजरा होईल.
कोकण रेल्वेच्या मडगाव स्थानकात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी कोकण रेल्वेने शुल्क घेण्यास सुरुवात केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. वाहन 10 मिनिटे थांबल्यास शुल्क आकारले जाईल. स्थानकावर पार्किंग रेटचा बोर्डवर लावला असून त्यावर कुठल्या वाहनासाठी किती शुल्क आकारणी केली जाईल याची माहिती देण्यात आली आहे.
खोर्ली-म्हापसा येथे घराला लागलेल्या आगीत होरपळलेल्या 75 वर्षीय निशा कोरगावकर यांचे गोमेकॉत शुक्रवारी उपचारादरम्यान निधन. ही घटना गुरुवारी (ता.9 नोव्हेंबर) पहाटे 4 वा.च्या सुमारास घडली. या दुर्घटनेत त्या 60 टक्के भाजल्या होत्या.
मुंबई-गोवा महामार्गावर कार आणि दुचाकीचा अपघात झाला या अपघातात दुचाकी चालकाचे निधन झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव ओटव फाटा खालची मुस्लिमवाडी येथे गुरुवारी (दि.16) हा अपघात झाला.
गोव्याहून पुणे येथे जाताना टाटा नेक्झोनची धडक बसून हा अपघात झाला.
वागातोर अपघात प्रकरणातील महत्वाची माहिती. संशयित एसयूव्ही कारचालक सचिन कुरूप याचा आरोग्य सेवा संचालनालय, पॅथॉलॉजी विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालात रक्तातील अल्कोहोलची पातळी शून्य. या अपघातात रेमेडिया उर्फ रोमी आल्बुकेर्क (56) यांचा मृत्यू झाला होता.
पणजी, तीन अल्पवयीन मुलांना बेसबॉल बॅटने मारहाण केल्याप्रकरणी पणजी बालन्यायालयाने पेडण्याचे माजी नगराध्यक्ष वासुदेव राजेंद्र देशप्रभू यांना तीन महिने साधी कैद व १ लाख १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
या शिक्षेला आव्हान देण्यासाठी देशप्रभू यांना संधी मिळावी म्हणून बालन्यायालयाच्या अध्यक्ष सायोनारा तेलीस यांनी ही शिक्षा १२ डिसेंबरपर्यंत स्थगित ठेवली आहे. मारहाणीची ही घटना दहा वर्षापूर्वी घडली होती.
तळसाय धारबांदोड्यात ब्लॅक पॅंथरची दहशत कायम. काल रात्री (16 नोव्हेंबर) एका घराबाहेर पॅंथर आला. त्याला पाहून कुत्रा घरात शिरल्यानंतर घरच्यांच्या सर्व प्रकार लक्षात आला. दरम्यान, घरातले बाहेर आल्यानंतर पॅंथरने तिथून धूम ठोकली.
राज्यात पुन्हा एकदा डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी चिखली वास्कोमधील 6 वर्षीय मुलीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याने हा विषय आता परत डोके वर काढत आहे. माहितीनुसार, गोवा मेडिकल कॉलेजमध्ये या वर्षभरात डेंग्यूमुळे झालेल्या इतर 16 संशयित मृत्यूंचे या महिन्याअखेर ऑडिट करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य खात्याच्या वेक्टर-बोर्न रोगनियंत्रण विभाग प्रमुख डॉ. कल्पना महात्मे यांनी दिली.
मडगाव, राज्यात डेंग्यूची साथ नियंत्रणात येत असली तरी वास्को, कुठ्ठाळी आणि वेर्णा या तीन ठिकाणी जिथे मोठ्या प्रमाणावर कामगार वस्ती आहे, तिथेच डेंग्यूचे डास अजून सक्रिय असल्याचे दिसून आले आहे.
याचे महत्वाचे कारण म्हणजे, उघड्यावर साठवून ठेवलेले पाणी हेच असल्याचे उघड झाले आहे. हे पाणी साठवून ठेवण्यास आवश्यक असलेले उपाय न घेतल्यामुळेच पाऊस संपूनही या भागात डेंग्यू सक्रिय आहे.
लग्नाला काही दिवस उरले असताना काणकोण येथून एक युवक बेपत्ता झाला आहे. लोलिये, पोळे समुद्रकिनारी त्याची बाईक, चप्पल आणि इतर साहित्य सापडले आहे. कारवार आणि काणकोण पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आला असून, पोलीस शोध घेत आहेत.
आनंद विनायक जोगळेकर (वय 34, रा. कारवार, मूळ उर्से) असे बेपत्ता युवकाचे नाव आहे.
युवक 14 तारखेला गावाला आला होता, त्यानंतर तो बेपत्ता झाला. दरम्यान, लोलिये, पोळे समुद्रकिनारी त्याची बाईक, चप्पल आढळून आली आहे. पोलिसांनी शोध मोहिम सुरु केली असून, अद्याप तो मिळून आलेला नाही. युवकाच्या नातेवाईकांनी कारवार आणि काणकोण पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी युवकाचा फोटो प्रसिद्ध केला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.