Utpal Parrikar Dainik Gomantak
गोवा

उत्पल पर्रीकरांनी पहिल्यांदाच दिला मंत्री बाबूशना पाठिंबा, दिवसभर गाजले Cash For Job Scam प्रकरण; वाचा ठळक बातम्या

Goa Today's Breaking News 15 November 2024: राज्यात दिवसभर घडणाऱ्या ताज्या घडामोडींच्या अपडेट्स.

Akshata Chhatre

मंत्री बाबूश यांना माझा पाठिंबा; सर्वच घोटळ्यांची व्हावी न्यायालयीन चौकशी - उत्पल पर्रीकर

कॅश फॉर जॉब प्रकरणात मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी न्यायालयीन चौकशीची मागणी केलीय. या मागणीला उत्पल पर्रीकर यांनी पाठिंबा दिला असून, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्याची मागणी मान्य करावी अशी मागणी केलीय. तसेच, कला अकादमी आणि झुवारी जमीन घोटाळ्याची देखील चौकशी करण्याची मागणी पर्रीकर यांनी केलीय.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे गोव्यात स्वागत

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचे गोव्यात आगमन झाले आहे आणि मंत्री माविन गुदिन्हो यांनी त्यांचे स्वागत केले.

सतीश धुमाळ धारगळचे नवीन सरपंच

धारगळ पंचायतीच्या सरपंचपदी सतीश धुमाळ यांची बिनविरोध निवड.

परतीच्या पावसाचा पुन्हा तडाखा!

राज्यात गुरुवारी रात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे बोर्डे, डिचोली येथील काही भागात भातपीकांवर परिणाम. बळीराजा चिंतेत.

सुखी, समाधानी, समृद्ध गोवेकर हेच आमचे ध्येय!

गोव्याच्या संस्कृतीचा ऱ्हास सुरु आहे. गोव्याच्या खऱ्या संस्कृतीची ओळख जगाला करुन देण्याच्या उदिष्ठ्यानेच बिरसा मुंडा जनजातीय गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आलेय. एक सुखी, समाधानी, समृद्ध गोवेकर तयार करण्याचे आमचे ध्येय आहे. पेडणे पत्रादेवी स्मारकाकडून 5 दिवसांच्या यात्रेच्या शुभारंभावेळी सभापती रमेश तवडकरांचे प्रतिपादन.

धारबांदोडयात आधारकार्ड करेक्शनची पूर्णवेळ सेवा

धारबांदोडा तालुक्यात आधारकार्ड करेक्शन करण्यासाठी पूर्णवेळ कार्यालय उघडणार.आमदार डॉ.गणेश गांवकर याची माहिती.

पुन्हा धर्मांतरण खपवून घेणार नाही!

60 वर्षानंतरही काहीजण लोकांना फसवून धर्मांतरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाप्रकारच्या व्यक्तींपासून लोकांनी जागरूक राहावे. या पद्धतीचे धर्मांतरण पुन्हा एकदा आम्ही खपवून घेणार नाही : मुख्यमंत्री

भगवान बिरसा मुंडा गौरव यात्रेला आजपासून सुरुवात

बिरसा मुंडा जयंतीनिमित्त गोवा सरकारने पत्रादेवी ते काणकोण अशी भगवान बिरसा मुंडा सांस्कृतिक गौरव यात्रा आयोजित केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि सभापती रमेश तवडकर यांच्या उपस्थितीत आजपासून या यात्रेची सुरुवात होणार आहे.

वाळपईत पावसाचं धूमशान

वाळपईत पावसानं धूमशान घातलं. गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड प्रमाणात उष्णता वाढली होती आणि सकाळपासून ढगाळ वातावरण होतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT