Pramod Sawant: गोव्यात पुन्हा धर्मांतर खपवून घेणार नाही; मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा रोख नेमका कुणाकडे?

Birsa Munda Jayanti Goa: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचा गौरव केला तसेच गोवामुक्तीनंतर आता पुन्हा धर्मांतरण खपवून घेणार नाही असे विधान केले.
Birsa Munda Jayanti Goa: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचा गौरव केला तसेच गोवामुक्तींनंतर आता पुन्हा धर्मांतरण खपवून घेणार नाही असे विधान केले.
Pramod Sawant Birsa Munda Jayanti GoaDainik Gomantak
Published on
Updated on

साखळी: आदिवासी कल्याण संचालनालय, गोवा सरकार यांच्या वतीने यंदा गोवा राज्यात मोठ्या उत्साहात थोर स्वातंत्र्य सेनानी तसेच आदिवासी नेते भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात येत आहे.

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त साखळी येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थितांना संबोधित केले, यावेळी त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचा गौरव केला तसेच गोवामुक्तीनंतर आता पुन्हा धर्मांतरण खपवून घेणार नाही असे विधान केले.

"60 वर्षानंतरही काहीजणं लोकांना फसवून धर्मांतरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाप्रकारच्या व्यक्तींबद्दल लोकांनी जागरूक राहावे. या पद्धतीचे धर्मांतरण पुन्हा एकदा आम्ही खपवून घेणार नाही.

Birsa Munda Jayanti Goa: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचा गौरव केला तसेच गोवामुक्तींनंतर आता पुन्हा धर्मांतरण खपवून घेणार नाही असे विधान केले.
Birsa Munda Jayanti: बिरसा मुंडा जयंतीनिमित्त भव्य रॅलीचे आयोजन; पेडण्यातून होणार शुभारंभ

आदिवासी सामाज्यासासारख्या लोकांच्या आर्थिक व शैक्षणिक पातळीवरील दुर्बलतेचा फायदा उठवत देशात ब्रिटिशांनी तर गोव्यात पोर्तुगीजांनी धर्मांतरण केले होते. आता गोवा मुक्तीच्या 60 वर्षांनंतरही "आलेलुया" म्हणून अशाच दुर्बल घटकांना लक्ष्य बनवत धर्मांतरण करण्याचा प्रयत्न काही ठिकाणी सुरू आहे आणि यापासून लोकांनी सावध रहावे" असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचा आढावा घेताना त्यांनी समाजाचे व आपण राहत असलेल्या परिसराचे जंगलाचे रक्षण करण्याच्या हेतूने बिसरा मुंडा यांनी केलेले काम प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन केले. ब्रिटिशांच्या काळात आदिवासी समाजातील लोकांना मशिनरी शाळेत प्रवेश देत शिक्षणांच्या बहाण्याने त्यांच्या आर्थिक बिकट परिस्थितीचा फायदा उठवत त्यांचे धर्मांतरण करण्याचे षडयंत्र ब्रिटिश सरकारतर्फे रचले जात होते.

बहुतेक वेळा आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या विशेषतः आदिवासी लोकांना या पध्दतीने धर्मपरिवर्तीत करण्यासाठी लक्ष्य बनविले जात होते. देशभरात हे षडयंत्र ब्रिटिशांनी सुरु केले तर गोव्यात हेच कारस्थान पोर्तुगीजांनी केले याची जाणीव सर्वांना आहे आणि आता अशा नवीन कारस्थानपासून गोमंतवासीयांनी सावध राहावे असे मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com