Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: गोव्याच्या किनारी फोटोग्राफी भोवली, बिहारच्या तरुणाकडून 25 हजार दंड वसूल; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Latest News Update: गोव्यात दिवसभर विविध क्षेत्रात घडणाऱ्या ताज्या आणि ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा.

Akshata Chhatre

Cash For Job Scam; मडगाव पोलिसांकडून दोन महिला ताब्यात

कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरणात नवी अपडेट आली असून, मडगाव पोलिसांनी या प्रकरणी दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. विशा गावडे आणि सोनिया आचारी असे ताब्यात घेण्यात आलेल्या दोन महिलांचे नाव असून, त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाण्यात आले आहे.

गोव्याच्या किनारी फोटोग्राफी भोवली, बिहारच्या तरुणाकडून 25 हजार दंड वसूल

कांदोळी येथे समुद्रकिनाऱ्यावर परवानगी न घेता फोटोग्राफी करणाऱ्या तरुणाला पर्यटक पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे रितसर परवाना नसल्याने पर्यटन खात्याने त्याच्याकडून २५ हजार रुपये दंड वसूल केला आहे.

वाल्लोर!! गोव्याने रचला इतिहास; रणजी क्रिकेटमध्ये अरुणाचल प्रदेशवर मिळवली 551 धावांनी मात

गोव्याने आंध्रप्रदेशच्या विरोधात 551 धावांनी विजय मिळवला आहे आणि यानंतर गोव्याच्या संघाने रणजी करंडक इतिहासात एक नवीन विक्रम प्रस्थापित केलाय. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील जागतिक स्तरावर हा दुसरा सर्वोत्तम विजय ठरला.

स्नेहल-कश्यपची नाबाद 606 धावांची पार्टनरशिप

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत स्नेहल कवठाणकर (नाबाद 314) आणि कश्यप बखले (नाबाद 300) यांनी अरुणाचल प्रदेश विरुद्ध प्लेट डिव्हिजन क्रिकेट सामन्यात तिसऱ्या विकेटसाठी 606 धावांच्या पार्टनरशिपसह सर्वोच्च भागीदारीचा विक्रम केला.

गोव्यात पुन्हा पावसाचे सावट; दोन दिवसांसाठी यलो अलर्ट

IMD ने 14 नोव्हेंबर आणि 15 नोव्हेंबर रोजी गोव्याला यलो अलर्टचा इशारा दिला आहे. दरम्यान राज्यात विजा आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास) सह गडगडाटी वादळ होण्याची शक्यता आहे.

फर्मागुडी आयआयटीत बॉम्ब ठेवल्याचे पत्र!

आयआयटी फर्मागुडी येथे बॉम्ब ठेवल्याचे अज्ञातकडून पोलिसांना पत्र. फोंडा पोलिसांचा आयआयटी इमारतीजवळ मोठा फौजफाटा तैनात. बॉंब शोधकांना पाचरण.

रणजीमध्ये गोव्याची यशस्वी घोडदौड सुरु; अरुणाचल विरोधात कश्यपने झळकवले द्विशतक

अरुणाचल प्रदेश विरुद्ध पर्वरी येथे खेळल्या जात असलेल्या रणजी ट्रॉफी प्लेट डिव्हिजन क्रिकेट सामन्यात गोव्याच्या कश्यप बखलेने शानदार द्विशतक झळकावले आणि ही कामगिरी करणारा तो गोव्याचा आठवा फलंदाज ठरला.

मोले येथे ट्रक कलंडला!

गोव्याहून कर्नाटकला जाणारा ट्रक बुधवारी (दि.१३ नोव्हेंबर) रोजी रात्री मोले येथे भगवान महावीर समोरील मुख्य रस्त्यावर कलंडला, यामध्ये चालक जखमी झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: रेल्वे ट्रॅकवर बसलेल्या आजोबांचा थरारक व्हिडिओ व्हायरल, थोडक्यात बचावले; नेटकरी म्हणाले, 'बाबांचं यमराजासोबत उठणं-बसणं दिसतयं!'

IND vs AUS 2nd ODI Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार दुसऱ्या वनडेचा थरार! फ्रीमध्ये लाईव्ह मॅच कधी, कुठे आणि कशी पाहायची? जाणून घ्या!

"तो फक्त सेटिंग करतो, गोव्याला लुटायला आलाय", हणजूण किनारा वाद; मंत्री लोबो यांचा परबांवर शाब्दिक हल्ला

गोसेवेसाठी गोशाळांना मदत करण्यास सरकार तत्पर; Watch Video

IND vs AUS ODI Playing XI: मालिका वाचवण्यासाठी टीम इंडिया सज्ज; वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा आऊट? दुसऱ्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार मोठा बदल

SCROLL FOR NEXT