Goa Assembly Budget Session 2024 3rd Day: गोवा विधानसभेचा तिसरा दिवस विविध कारणांनी गाजला. मंत्री गावडे यांच्या विरोधातील घोटाळ्यांच्या आरोपावर विरोधकांनी आणलेल्या स्थगन प्रस्ताव सभापती तवडकरांनी फेटाळला. त्यानंतर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या खर्चावरुन विरोधी पक्षातील आमदारांनी गावडेंना घेरले.
स्पर्धेच्या प्रसिद्धी आणि जाहिरातीसाठी केलेल्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी आमदार वेंझी व्हिएगस आणि युरी आलेमाव यांनी केली.
नगरनियोजन खात्याने सादर केलेल्या 39A सुधारणा विधेयकावरुन देखील सभागृहात गोंधळ झाला. मतदानाच्या मागणीवर गोंधळ घातल्याने वेंझी आणि मार्शलनी उचलून बाहेर काढले.
दरम्यान, अखेरच्या सत्रात राज्यपालांच्या अभिभाषणावर काही सदस्यांनी भाषण केले. सदस्यांच्या भाषणाला मुख्यमंत्री सावंत यांनी उत्तर दिले.
गावडे-तवडकर वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत एकूण प्रकरणावर सखोल चर्चा. गावडेंना मी 'राजीनामा द्या आणि निवडून येऊन दाखवा' असे सांगितलेले नाही. ही माहिती चुकीची - सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष
मोपा येथील आंतराष्ट्रीय विमानतळावर 1,800 रोजगार संधी निर्माण केल्याचा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला. पण, गोंयकारांसाठी रोजगाराच्या एवढ्या संधी निर्माण केल्याच नाहीत, केली असल्यास दाखवून द्यावे, माझे मुख्यमंत्री सावंत यांना चॅलेंज आहे, असे वीरेश बोरकर म्हणाले.
कारापूर येथे बुधवारी भर लोकवस्तीजवळ काजू बागायतीला आग. दोन लाखापेक्षा अधिक रुपयांचे नुकसान. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोनदा प्रयत्न करून आग आणली नियंत्रणात
मुख्यमंत्री प्रमोद सवांत, सुभाष फळदेसाई छत्रपती शिवाजी महाराजांना खूप मानतात. पण, फार्मागुडी किल्ल्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे, असे विजय सरदेसाई म्हणाले.
Goa Assembly Session: सरकारने हर घर जल योजना राज्यात 100 टक्के यशस्वी झाल्याचा दावा केला. पण, राज्यात काणकोण, पेडणे, सांगे अशा अनेक ठिकाणी नळही नाही आणि पाणीही नाही अशी स्थिती आहे, असे विजय सरदेसाई म्हणाले.
Online Casino Goa: गोव्यात राज्यातील ऑनलाईन कॅसिनोचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव ऑनलाईन गेमिंगवर बंदीची मागणी केली. यावरुन पंचायत मंत्री माविन गुदिन्हो आणि आलेमाव आमनेसामने आले. गोव्यात कॅसिनो कोणी आणले असा प्रश्न उपस्थित केला.
TCP सुधारणा विधेयक मतदान न घेता मंजूर करण्यात आले. या विधेयकाच्या मतदानासाठी विरोधी आमदार वीरेश बोरकर, युरी आलेमाव, वेंझी व्हिएगस, कार्लुस फेरेरा आणि एल्टन डिकॉस्ता वेलमध्ये गेले.
गोंधळात वीरेश आणि वेंझी वेलमध्येच खाली बसले. दरम्यान, यावेळी मार्शलांनी आमदार वेंझी यांनी उचलून सभागृह बाहेर गेले.
Goa Assembly Session: TCP सुधारणा विधेयकासाठी मतदानाची मागणी विरोधी पक्षातील आमदारांनी केली. या मागणीसाठी विरोधी पक्षनेते युरी, आमदार वीरेश बोरकर या मागणीसाठी वेलमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला आहे.
39A दुरुस्ती विधेयक 16B ची रिप्लेसमेंट असल्याचे स्पष्टीकरण नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी दिले.
मयेतील भावकई खाजन कुळ संघटनेची निवडणूक दुसऱ्यांदा रद्द. बुधवारी बोलविण्यात आलेल्या बैठकीस केवळ दोनच सभासद होते उपस्थित. 31 जानेवारीच्या बैठकीतही कोरमअभावी निवडणूक झाली नव्हती.
गावात आठ दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने कुपार ग्रामस्थांनी केपे पाणीपुरवठा विभागाचे सहायक अभियंता प्रशांत कामत यांच्याकडे घेराव घातला. आधीच कोरडे पडलेल्या झऱ्याचे पाणी ग्रामस्थ पीत आहेत. नारळाच्या शेंड्याचा वापर झऱ्यातून पाणी काढण्याची नामुष्की ग्रामस्थांवर ओढवली आहे. कुपार टाकीतून कावरे गावाकडे पाणी वळवणे हे पाणीपुरवठा टंचाईचे प्रमुख कारण असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.
युरी आलेमाव यांनी नेहरू स्टेडियमवरील खर्चावरून गावडे यांना घेराव घातल्यावर मुख्यमंत्र्यांनी यावर उत्तर दिले. 9 वर्षानंतर जर तिथे खेळाचे आयोजन होत असेल तर तिथे रंगकाम केले जाणारच, असा प्रतिवाद त्यांनी केला.
विमान प्रवास महागला असून हॉटेलचे दर वाढल्याने गोव्यातील पर्यटकांची संख्या रोडावली आहे. डिसेंबरअखेर गोव्यात देशी पर्यटकांचा भरणा होता, मात्र त्यांना पर्यटक म्हणता येणार नाही. दर्जेदार पर्यटक झाडाखाली बसून जेवण किंवा वडापाव खात नसतात. मात्र गोव्यात हे चित्र सर्वत्र दिसते आणि यातून पर्यटनाचा दर्जा खालावतो : मायकल लोबो
राष्ट्रीय खेळांच्या आयोजनामध्ये गावडेंनी घोटाळा केल्याचा दावा वेंझी व्हिएगस यांनी सभागृहात केला. वेगवेगळ्या एजन्सींना सारखी कामे दिल्याचा आरोप. 23 कोटींच्या निधीची चौकशीची केली मागणी
मंत्री गावडे वादग्रस्त ऑडिओ प्रकरण : मंत्र्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी अशी अपमानास्पद भाषा वापरणे चुकीचे. यातून तुम्ही इतरांना विशेषतः शालेय मुलांना चुकीची शिकवण व उदाहरण मिळते. मंत्र्यांनी संबंधित संचालकांची माफी मागितली पाहिजे. याप्रकरणी मुख्यमंत्री किंवा पक्ष आवश्यक दखल घेतील. मायकल लोबो यांचे वक्तव्य
मंत्री गोविंद गावडे आपल्या व्हायरल झालेल्या त्या ओडियोबाबत म्हणाले की, या सगळ्यात काहीच तथ्य नाही. हे सगळे खोटे आरोप आहेत.
विठ्ठलनामाच्या जयघोषात कारापूरहून चाळीस वारकरी चालत पंढरपूरला रवाना. श्री शांतादुर्गा ज्ञानेश्वर वारकरी मंडळाच्या पायीवारीला बुधवारी प्रारंभ. तेरा दिवस करणार पायी प्रवास.
सभापती रमेश तवडकर यांनी मंत्र्यावर केलेला भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध करावा, अन्यथा त्यांनी आपले पद सोडावे. मंत्री आणि सभापतींनी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचा सहारा घेतल्याने त्यांचाही यात सहभाग आहे का? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते विजय भिके यांनी केला आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने आज पणजी पोलिस स्थानकात मंत्री गोविंद गावडे यांच्याविरोधात लेखी तक्रार दिली. याप्रसंगी जॉन नाझारेथ, श्रीपाद धोंड, ॲड. जितेंद्र गावकर, प्रणव परब यांची उपस्थिती होती
गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील अवयव प्रक्रिया जीव वाचवणारी ठरत आहे. ब्रेन डेड रुग्णाने दान केलेल्या अवयवांचे प्रत्यारोपण केल्याने चार जणांचे प्राण वाचले असल्याची घटना या आधी एकदा घडली होती. तशीच एक घटना पुन्हा एकदा घडली असून यामुळे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव चांगलेच चर्चेत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.