Baba Vanga Predection: ट्रम्प यांचा 'तो' एक आदेश अन् बाबा वेंगाचं भाकित ठरणार खरं? लवकरच जगासमोर येणार 'सीक्रेट फाईल्स'

Baba Vanga Alian Predection: बुल्गेरियाच्या प्रसिद्ध भविष्यवेत्या बाबा वेंगा यांनी दशकांपूर्वी केलेली एक भविष्यवाणी सध्या संपूर्ण जगात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.
Baba Vanga & Donald Trump
Baba Vanga & Donald TrumpDainik Gomantak
Published on
Updated on

Baba Vanga Alian Predection: बुल्गेरियाच्या प्रसिद्ध भविष्यवेत्या बाबा वेंगा यांनी दशकांपूर्वी केलेली एक भविष्यवाणी सध्या संपूर्ण जगात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संरक्षण मंत्री पीट हेगसेथ आणि पेंटागनला एलियन्स तसेच यूएफओशी (UFO) संबंधित गुप्त सरकारी फाईल्स सार्वजनिक करण्याचे आदेश दिल्याने या चर्चेला उधाण आले आहे.

विशेष म्हणजे, माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी एका मुलाखतीत एलियन्सचे अस्तित्व नाकारता येणार नाही, असे विधान केले होते. ट्रम्प यांनी ओबामांच्या या वक्तव्यावर टीका करत माहिती उघड केल्याचा ठपका ठेवला असला, तरी आता स्वतः ट्रम्प यांनीच या विषयावर जाहीर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भाष्य करण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे जगभरातील संशोधक आणि सामान्य नागरिकांमध्ये एलियन्सच्या अस्तित्वाबाबत मोठी उत्सुकता आणि खळबळ निर्माण झाली आहे.

Baba Vanga & Donald Trump
Baba Vanga Predictions: तिसऱ्या महायुद्धाची नांदी? बाबा वेंगा यांची भविष्यवाणी ठरणार खरी? अमेरिका-व्हेनेझुएला संघर्षामुळे जग दहशतीत!

अहवालानुसार, बाबा वेंगा यांच्या समर्थकांचा असा दावा की, नोव्हेंबर 2026 मध्ये मानवाचा परग्रहावरील सजीवांशी (एलियन्स) पहिला संपर्क होईल. या भविष्यवाणीनुसार, एक अवाढव्य अंतराळ यान पृथ्वीच्या (Earth) वातावरणात प्रवेश करेल, ज्यामुळे एलियन्सच्या अस्तित्वाचा निर्विवाद पुरावा जगासमोर येईल. बाबा वेंगा यांनी या यानाचा उद्देश काय असेल, याबाबत स्पष्ट काही सांगितले नसले तरी, भविष्यातील मानवी प्रगतीबाबत काही रंजक गोष्टी मांडल्या होत्या. त्यांच्या मते, इसवी सन 2130 पर्यंत मानव एलियन्सच्या मदतीने पाण्याखाली शहरे वसवण्यास सुरुवात करेल, तर 2288 मध्ये परग्रहावरील सजीवांच्या पुन्हा भेटीनंतर 'टाईम ट्रॅव्हल' म्हणजेच काळप्रवासाचा शोध लागण्याची शक्यता आहे.

Baba Vanga & Donald Trump
Baba Vanga Predictions: 2026 मध्ये 'या' 5 राशीचे लोक होणार मालामाल, बाबा वेंगांची 'अफाट धनलाभा'ची भविष्यवाणी; शनिदेवाची राहणार कृपा!

मात्र, या सर्व भविष्यवाण्यांबाबत एक महत्त्वाची बाब म्हणजे बाबा वेंगा यांनी स्वतः कोणतेही लिखित पुरावे मागे ठेवलेले नाहीत. 1996 मध्ये त्यांच्या निधनानंतर त्यांची पुतणी क्रासिमिरा स्टोयानोवा आणि इतर अनुयायांनी त्यांच्या दर्शनांच्या आधारे ही माहिती संकलित केल्याचे सांगितले जाते. टीकाकारांच्या मते, काळाच्या ओघात या भविष्यवाण्यांचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे किंवा त्या अतिशयोक्ती करून मांडल्या गेल्या आहेत. ट्रम्प यांनी यूएफओ फाईल्स उघड करण्याचे आदेश दिल्याने सोशल मीडियावर असा युक्तिवाद केला जात आहे की, ही 2026 च्या मोठ्या घटनेची नांदी तर नाही ना? सरकारी फाईल्समध्ये असे काही खुलासे होतील का, ज्यामुळे बाबा वेंगा यांचे शब्द खरे ठरतील?

Baba Vanga & Donald Trump
Baba Vanga Predictions: सर्वनाश होणार? बाबा वेंगा यांच्या 2023 च्या भाकिताने...!

दुसरीकडे, बाबा वेंगा यांच्या अनेक भविष्यवाण्या यापूर्वी चुकीच्या ठरल्या आहेत, हेदेखील वास्तव आहे. उदाहरणार्थ, 2010 ते 2016 दरम्यान आण्विक युद्धाची किंवा 2016 पर्यंत युरोप खंड ओसाड पडण्याची त्यांनी केलेली भविष्यवाणी प्रत्यक्षात आली नाही. तसेच, 2025 मध्ये एखाद्या मोठ्या घटनेवेळी यूएफओ दिसण्याच्या दाव्याबाबतही अद्याप ठोस काही घडलेले नाही. अमेरिकन सरकारनेही आजवर अधिकृतपणे असेच मानले आहे की, एलियन्स किंवा यूएफओच्या अस्तित्वाचा कोणताही ठोस भौतिक पुरावा त्यांच्याकडे उपलब्ध नाही. तरीही ट्रम्प यांच्या नव्या निर्णयामुळे गूढवादाची ही चर्चा नव्या वळणावर येऊन ठेपली असून संपूर्ण जगाचे लक्ष पेंटागनच्या त्या गुप्त फाईल्सकडे लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com