Goa Live Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Live Updates: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा स्थळांचे बांधकाम निकृष्ट, कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार; चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी

Goa Breaking News 04 November 2023: पणजी, म्हापसा, मडगाव तसे इतर शहरातील महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज

Kavya Powar

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा स्थळांचे बांधकाम निकृष्ट, कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार; चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या विविध स्टेडियम आणि स्पर्धा स्थळांच्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात आले असून त्यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

उपराष्ट्रपतींचा गोवा दौरा, बांबोळीतील दुकाने राहणार बंद

37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप सोहळ्यासाठी भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनकर गोव्यात हजेरी लावणार आहेत. यानिमित्ताने 9 नोव्हेंबरला बांबोळीतील दुकाने 12 ते 06 या वेळेत बंद राहणार आहेत. उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश काढले आहेत.

तिकीट दरवाढीविरोधात राशोल फेरी पॉईंटवर RG च्यावतीने निदर्शने

Revolutionary Goans Party

म्हापशात तरुणीने चुलत बहिणीचीच केली बदनामी, बनावट फेसबूक अकाऊंटवरून पाठवले अश्लील फोटो

बनावट फेसबूक अकाऊंट तयार करून आपल्याच चुलत बहिणीची बदनामी केल्याची घटना म्हापसा येथून समोर आली आहे. तरुणीने बनावट फेसबूक अकाऊंटद्वारे बहिणीचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो आणि मोबाईल नंबर फ्रेन्डलिस्ट मधील संपर्कांना पाठवला. 11 सप्टेंबर 2023 पूर्वी हा प्रकार घडला.

मोपा विमानतळ मार्गावर ट्रक- चारचाकी यांच्यात अपघात; तीन गंभीर जखमी

मोपा विमानतळ रोडवर भरधाव ट्रक आणि चारचाकीत अपघात झाला आहे. या घटनेत चारचाकीतील तीन प्रवासी आणि चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी रोज 1 हजार लिटर दूध, 900 किलो पनीर, 750 किलो चिकन, 800 किलो मासे!

पणजी, राज्यात सुरू असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी देशभरातून १० हजारांहून अधिक खेळाडू दाखल झाले असून या स्पर्धेतील खेळाडूंसाठी आयोजकांनी खास बडदास्त ठेवली आहे. खेळाडूंना संतुलित आहार मिळावा, यासाठी रोज हजारो हात दिवसरात्र झटत आहेत.

एक वेळचा नाश्ता, दुपारची ‘हॉट टी’ आणि दोन वेळचे जेवण यांसाठी आयोजक कुठेही कमी पडताना दिसत नाहीत. स्वयंपाकासाठी रोज ९०० किलो पनीर, ७५० किलो चिकन तर ८०० किलो मासे, १ हजार लिटर दूध, १५ हजार केळी, १,२५० किलो सफरचंद शिवाय इतरही जिन्नस वापरले जातात.

उल्लेखनीय म्हणजे, सर्व भाजी ही गोव्यातीलच असून त्यासाठी ४२ शेतकऱ्यांकडून थेट पुरवठा केला जात असल्याची माहिती ‘थॉमस कुक’च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘गोमन्तक’ला दिली.

मुंबईची फ्लाईट रद्द केली नाही म्हणून पसरवली बॉम्बची अफवा, मोपा विमानतळावर एकजण ताब्यात

उत्तर गोव्यातील मनोहर पर्रीकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन एक विचित्र घटना समोर आली आहे. मुंबईची फ्लाईट रद्द केली नाही म्हणून विमानतळावर बॉम्ब असल्याची अफवा पसरवल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. 02 नोव्हेंबर रोजी ही घटना उघडकीस आली.

प्रथमेश शेवाळे (वय 30, रा. मुंबई) असे याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 02 नोव्हेंबर रोजी मोपावरुन मुंबईला जाणारी फ्लाईट होती. फ्लाईटला विलंब होत असल्याने प्रथमेशने विमानतळावर फोन करुन 02 ऐवजी 03 नोव्हेंबर रोजी फ्लाईट बुक करावी अशी विनंती. मात्र, ऐनवेळी फ्लाईट रद्द केली जाऊ शकत नाही, असे विमानतळाच्या वतीने कळविण्यात आले.

गोव्याच्या महिला संघाने कबड्डी लीग मधली पहिली फेरी जिंकली

Kabaddi

हणजूण येथे बार अँड रेस्टॉरंटच्या स्टोर रूमला आग

हणजूण येथील बारडो बार अँड रेस्टॉरंटच्या स्टोर रूमला भीषण आग. यामध्ये दीड लाखांचे नुकसान. तर म्हापसा अग्निशमन दलाला 10 लाख रुपयांची मालमत्ता वाचवण्यात यश.

वुशू मध्ये गोव्याला तिसरे पदक

वुशू मध्ये गोव्याला तिसरे पदक मिळाले आहे. तावलू प्रकारात गोव्याच्या शेर बहादूर याने जिंकले रौप्यपदक. 2 रौप्य व 1 कांस्य अशी एकूण 3 पदके या प्रकारात गोव्याच्या खात्यात जमा झाली आहेत.

कांपाल स्टेडियम फुल्ल! दर्शकांची झाली गर्दी

आजपासून (4 नोव्हेंबर) कांपाल येथील इनडोअर स्टेडियममध्ये कब्बडी स्पर्धा सुरू झाल्या आहेत. स्टेडियम फुल्ल झाल्यामुळे दर्शकांची बाहेर गर्दी झाली. यामध्ये क्रीडा स्पर्धेचे स्वयंसेवक, विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांना देखील बाहेरच राहावे लागले.

Campal Indoor Stadium

पर्रा येथे चारचाकीचा स्वयंअपघात 

पर्रा-माडानी येथे एका चारचाकीचा स्वयंअपघात झाला. महिला चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार विद्युत खांबाला धडकली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला वाहन चालवताना व्हिडिओ काढत असल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, सदर घटनेत कोणत्याही प्रकरणी दुखापत झाली नसल्याचे कळते

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 4 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर ट्रायथलॉन खेळासाठी मिरामार- करंजाळे मार्ग बंद करण्यात येणार असल्याची माहिती उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिली.

नागराजची गोवा कबड्डी पुरुष संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपडी नियुक्ती

डिचोलीतील नागराज गोडेकर याची ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोवा कबड्डी पुरुष संघासाठी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Nagaraj B Godekar

सुवर्णपदके जिंकणारा आनंद राज्यात उपेक्षित! गोव्यात अजूनही नोकरीच्या शोधात

आनंद पंडियाराजन याने शुक्रवारी फोंडा क्रीडा संकुलात ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील तायक्वांदोत गोव्यासाठी सुवर्णपदक जिंकले आणि राज्य क्रीडा क्षेत्रात नवा इतिहास रचला गेला. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांत तीन सुवर्णपदके जिंकणारा तो गोव्याचा पहिला क्रीडापटू ठरला.

मात्र देदीप्यमान कामगिरी बजावूनही तो राज्यात नोकरीबाबत उपेक्षित असून रोजगारासाठी त्याला गुजरातचा रस्ता धरावा लागला, तेथे तो कंत्राटी पद्धतीवर तायक्वांदोतील प्रशिक्षक आहे.

तायक्वांदोत गोव्याला दोन सुवर्णपदके

गुजरातमध्ये गतवर्षी झालेल्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तायक्वांदो खेळास वगळण्यात आले होते, परिणामी गोव्याला पदके हुकली होती. गोव्यातील ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत या खेळाने पुनरागमन केले आणि राज्याने दोन सुवर्ण व एक रौप्य अशी तीन पदकांना गवसणी घातली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT