Goa Live Update Dainik Gomantak
गोवा

व्याघ्र संरक्षित क्षेत्र सरकाराला अधिसुचीत करावेच लागणार; न्यायालयाकडून दिलेली मुदत संपली

Pramod Yadav

व्याघ्र क्षेत्र अटळ !

व्याघ्र संरक्षित क्षेत्र सरकाराला अधिसुचीत करावेच लागेल. उच्च न्यायालयाकडून दिलेली मुदत संपली. न्यायालयाकडून पुन्हा मुदतवाढ नाही.

धक्काबुक्की झाली नाही; ज्येष्ठ नागरिकाच्या मुलाचे स्पष्टीकरण

वास्कोत ज्येष्ठ नागरिकासोबत, हेड कॉन्स्टेबलने दादागिरी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या ज्येष्ठ नागरिकाच्या मुलाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

धक्काबुक्की झाली नसून, वडील पोलीस कर्मचार्‍याला प्रश्न विचारत राहिल्यामुळे कॉन्स्टेबलने त्यांना बाजूला केले, असे तो म्हणाला.

आशियाई पदक विजेता मिथुन मंजुनाथ पराभूत

बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीत कर्नाटकाच्या मिथून मंजूनाथ या स्टार बॅटमिंटनपटूला पराभवाचा सामना करावा लागला. तेलंगणच्या एम थरुण या नवख्या शटलरने उपांत्य फेरीत मिथूनला मात दिली. एम थरुणने 2-1 असा विजय मिळवत अंतिम फेरीत धडक दिली.

पर्पल फेस्ट 2024 चा शुभारंभ

पर्पल फेस्ट 2024 चे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते शुभारंभ. पर्पल फेस्टची दुसरी आवृत्ती 8 ते 13 जानेवारी 2024 या कालावधीत सुरू होणार आहे. या प्रसंगी लोगो, वेबसाइट, ब्रोशर आणि टी-शर्टही लॉन्च करण्यात आले.

पणजी महानगरपालिकेत 25 कंत्राटी कर्मचारी कायमस्वरूपी सेवेत

पणजी महानगरपालिकेने आज 25 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेतले. महापौर रोहित मोन्सेरात आणि आयुक्त क्लेन मेदेरा यांनी त्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण केले.

ढवळी येथे कार आणि पीकअपचा अपघात

ढवळी येथे कार व पीकअप यांच्यात समोरासमोर धडक. या अपघातात यश पालयेकर ( १८, फोंडा) व सिद्धी नाईक (१९, कुडचडे) जखमी झाले. जखमीना उपचारासाठी जीमसीमध्ये दाखल करण्यात आहे आहे.

बॅडमिंटनमध्ये गतविजेतीला पराभवाचा धक्का

37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीत गतविजेती छत्तीसगडची आकर्षी कश्यप उपांत्य फेरीत पराभूत झाली. तिच्यावर हरियानाच्या चौथ्या मानांकित अनुपमा उपाध्याय हिने मात केली. दुसऱ्या उपांत्य लढतीत उत्तराखंडच्या अदित भट हिने तेलंगणाच्या मेघना रेड्डी हिला हरविले. सुवर्णपदकासाठी अनुपमा व अदिती यांच्यात लढत

दिल्लीने गोव्याला नमविले

37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या बास्केटबॉल स्पर्धेत दिल्लीने गोव्यावर 81-61 असा 20 गुणफरकाने विजय नोंदविला. स्पर्धेला सोमवारपासून नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये सुरवात झाली.

वाळपई नगराध्यक्षपदी प्रसन्ना प्रशांत गावस यांची बिनविरोध निवड

वास्कोत 'ट्रॅफिक सेल' हेड कॉन्सटेबलची दादागिरी, पाहा व्हिडिओ

बेतोडा येथे हिताची मशीनला दुचाकीची धडक; चालकाचा मृत्यू

बेतोडा येथील रस्त्यावर पार्क केलेल्या हिताची मशीनला दुचाकीची धडक बसून चालकाचा मृत्यू. रविवारी रात्री हा अपघात झाला. कंत्राट दाराच्या हलगर्जीपणामुळे अपघात झाल्याचा आरोप केला जात आहेे.

Goa Accident

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Transport Director Issue: सरकार अपघातांबाबत खरंच गंभीर आहे का? मग गोव्याला पूर्णवेळ संचालक का नाहीत?

गोव्याचा अपरिचित इतिहास! कदंब आणि यादव राज्यकर्त्यांचे संबंध; तत्कालीन परकिय आक्रमणांविषयी जाणून घ्या

Goa Driving Licence: गोव्यात 18 ऐवजी 16व्या वर्षीच लायसन्स दिले असते, काँग्रेस नेत्याचे विधान; परदेशात वयोमर्यादा काय?

Calangute News: लवकरच कळंगुटमध्ये होणार प्रशस्त कॉम्प्लेक्स आणि बसस्थानक; टाटा ट्रेन्सच्या साहाय्याने पंचायतीचा पुढाकार

..आता कडक कारवाईच! कचरा फेकणाऱ्यांचा फोटो काढून पोलिसांत तक्रार द्या; गोवा सरकार स्वच्छतेसाठी ॲक्शन मोडवर

SCROLL FOR NEXT