Goa Live Update 14 January 2024 Dainik Gomantak
गोवा

Goa News 14 January 2024: 22 पर्वरीत फ्लायओव्हरचे काम, चोरी- अपघातांसह अन्य घडामोडी वाचा...

Goa Breaking News 14 January 2024: पणजी, म्हापसा, मडगाव तसेच राज्यातील महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज...

Kavya Powar

पर्वरीत फ्लायओव्हरचे काम सुरु असताना मुख्य जलवाहिनी फुटली

 रविवारी दुपारी गिरी-सांगोल्डा जंक्शन येथे राष्ट्रीय महामार्गावर काम सुरु असताना 1000 एमएमची मुख्य जलवाहिनी फोडण्याचा प्रकार घडला. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले असून, ते रात्री उशिरापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

बांबोळी येथे कार चालकाची विजेच्या खांबाला धडक; चालक गंभीर जखमी

बांबोळी येथे भाडेतत्वावर घेतलेल्या कारच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार विजेच्या खांबाला धडकून अपघात घडलाय. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून त्याला जीएमसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर त्याच्या सोबतचे 3 प्रवासी प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

घाडीवाडा-कारापूर राहत्या घराला आग

घाडीवाडा-कारापूर येथे दत्तप्रसाद नार्वेकर यांच्या राहत्या घराला आग लागल्याची घटना घडली असून या आगीत लाखो रुपयांची हानी झाल्याच्या प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय.

रात्रौ 10 नंतर संगीत पार्ट्यांविरोधात मोरजी ग्रामस्थ संतप्त

कासवांच्या घरट्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मोरजी आणि मांद्रे किनारपट्टी आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलीय.

किनाऱ्यानजीकच्या हॉटेल्स, पबमध्ये रात्रौ 10 नंतर कानठळ्या बसवणारे संगीत आणि हुल्लडबाजीचे प्रकार सध्या मोरजी-मांद्रे भागात नियमितपणे घडत असल्याने स्थानिकांनी या विरोधात पुन्हा एकदा आवाज उठवला आहे.

विशेष म्हणजे पोलिसांना या सर्व प्रकाराबद्दल कळवून देखील पोलिसांनी घटनास्थळी येऊन बघण्याची तसदीही घेतली नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

घरे कायदेशीर करण्यास कोमुनिदाद संस्थांचा प्रखर विरोध!!

कोमुनिदाद जमिनीतील घरे कायदेशीर करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विचाराला कोमुनिदाद संस्थांचा प्रखर विरोध, उलट कोमुनिदाद संस्थांच्या एटर्नींना बेकायदेशीर घरांवर कारवाईसाठी अधिकचे अधिकार देण्याची मागणी.

दिव्यांगांची ओळख त्यांच्या सामर्थ्यावर अवलंबून : मुख्यमंत्री सावंत

पणजी, दिव्यांग व्यक्तींची ओळख ही इतर कोणत्याही बाबीवर अवलंबून नसते तर ती त्यांच्या सामर्थ्यावर अवलंबून असते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.

पोलीस कोठडीत असलेली सूचना मुलाचा फोटो पाहून होते भावूक! सोमवारी होणार गोमेकॉत डीएनए चाचणी

म्हापसा कोर्टाने संशयित सूचनाला दिलेल्या या सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान सूचना अनेकदा ओक्साबोक्शी रडल्याचे पोलिसांनी सांगितले. सुरुवातीला तिच्याकडून कोणतेची सहकार्य पोलिसांना मिळाले नाही.

मात्र नंतर ती फक्त पोलीस निरीक्षक परेश यांच्याशी बोलू लागली आणि हळूहळू गोष्टींचा उलघडा होऊ लागला. यावेळी अनेकदा तिने पोलिसांकडे मुलाचा फोटो दाखवण्याची मागणी केली. जेव्हा पोलीस तिला मोबाईलवर चिन्मयचा फोटो दाखवत तेव्हा-तेव्हा तिच्या अश्रूंचा बांध फुटे.

22 तारखेला सगळ्यात मोठी दिवाळी सत्तरीतच!

22 तारखेला अयोध्येत राम मंदीर प्रतिष्ठापना होत आहे. यादिवशी सर्वांनी आपल्या घरी, मंदीरात दिवाळी साजरी करावी. गोव्यात या दिवशी सगळ्यात मोठी दिवाळी सत्तरी आणि उसगावात साजरी होईल - विश्वजीत राणे, आरोग्य मंत्री

कोमुनिदादेच्या अधिवेशनात गावकऱ्यांना परवानगी नाही!

कोमुनिदादेच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी गावकऱ्यांना परवानगी नाकारली. ही बैठक फक्त कोमुनिदादच्या सदस्यांसाठीच असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत गावकऱ्यांनी एनआयओ दोनापावला इथे निदर्शन केले. कोमुनिदादच्या संहितेशी संबंधित महत्त्वपूर्ण मुद्दे मांडण्याची परवानगी न मिळाल्याने गावकरी नाराज

डिचोलीत बिबट्या जेरबंद!

मागील काही दिवसांपासून डिचोलीत फिरत असलेला बिबट्या अखेर वन खात्याने लावलेल्या सापळ्यात अडकला. लोकांनी सोडला सुटकेचा श्वास.

Leopard

ताळगावात कार चोरीप्रकरणी रत्नागिरीतील एकाला अटक

राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढत चालले आहेत. ताळगाव कम्युनिटी सेंटरजवळील मोकळ्या जागेतून पार्क केलेली कार चोरल्याप्रकरणी रत्नागिरीतील एका 32 वर्षीय व्यक्तीला पणजी पोलिसांनी अटक केली.

राज सुहेद्रे असे आरोपीचे नाव असून तो मूळचा रत्नागिरी, सिंधुदुर्गचा आहे. तो सध्या ताळगाव येथे राहतो. त्याच्याकडून चोरलेली कारही जप्त करण्यात आली आहे.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.37

Panjim ₹ 97.37

South Goa ₹ 97.56

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 89.97

Panjim ₹ 89.97

South Goa ₹ 89.68

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Airport: मंत्री गुदिन्‍होंनी 'दाबोळी'बाबत राजनाथ सिंगांना का पत्र लिहिले? सरदेसाईंकडून सरकारवर हल्लाबोल

Gogol Gulistan Masjid: सुन्नी गुलिस्तान मशीद अखेर खुली! पोलीस बंदोबस्त राहणार, कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आवाहन

America Iran Tension: "तुमच्या युद्धनौकांना समुद्रात गाडून टाकू!" ट्रम्प यांच्या आक्रमकतेवर खामेनेईंचा पलटवार; इराणची अमेरिकेला थेट विनाशाची ताकीद

Guru Margi 2026: करिअरमध्ये मोठी झेप अन् व्यवसायात भरभराट, 'या' भाग्यवान राशींसाठी गुरु ठरणार वरदान; स्वप्नपूर्तीचा काळ आला!

OLA CEO Goa Case: ‘ओला’चे सीईओ भाविश अग्रवालना दिलासा! गोवा खंडपीठाक़डून ‘वॉरंट’ला स्थगिती; पुढील सुनावणी 6 मार्च रोजी

SCROLL FOR NEXT